पदार्थ किती ही छान तयार केला तरी त्याची चव वाढवण्यासाठी त्यात मसाले घालावेच लागतात. (add this homemade masala to food, the taste is absolutely delicious!!)मीठाशिवाय अन्न जसे अळणी लागते तसेच मसाल्यांशिवाय अन्न फिके लागते. लाल तिखट, हळद, गोडा मसाला, गरम मसाला इतरही काही मसाले असतात. जे आपण रोजच पदार्थांत घालतो. काही मसाले असे ही असतात जे घरी केले जातात. मसाला ही एखाद्याची खासियतही असते. एखाद्याने तयार केलेला मसाला तसाच दुसर्याला जमतोच असे नाही. लोणच्यासाठी केला जाणारा मसालाही प्रत्येकाचा वेगळाच असतो.
ताक, रायता, कोथिंबीर करताना त्यातही चाट मसाला आपण घालतो. (add this homemade masala to food, the taste is absolutely delicious!!)मात्र फक्त चाट मसाला नाही तर इतरही काही मसाले असतात जे पदार्थांची चव वाढवतात. हा मसाला उन्हाळ्यात तसेच पावसाळ्यात करायलाच हवा. सरबतात घातल्यावर सरबताची चवही वाढते. मस्त भजी केल्यावर त्यावरही हा मसाला भुरभुरायचा. चव अगदी मस्त लागेल. पाहा सोपी रेसिपी.
साहित्य
जिरे, धणे, काश्मीरी लाल मिरची, बडीशेप, हिंग, मीठ, सैंधव मीठ, काळी मिरी, आमचूर
कृती
१. गॅसवर एक पॅन तापत ठेवा. पॅन नसेल तर कढई ठेवा. जरा गरम झाला की त्यात अर्धी वाटीभर जिरे घाला. जिरे घातल्यावर त्यात अर्धी वाटी धणे घालायचे. नंतर अर्धी वाटी बडीशेप घाला. त्यात चार चमचे काळी मिरी घालायची. छान परतून घ्यायचे.
२. मसाले परतून झाल्यावर त्यात काश्मीरी लाल मिरचीचे काही तुकडे घालायचे. सुकेच घाला भिजवू नका. जास्त मिरची घेऊ नका चवीसाठी म्हणून थोडीच घ्यायची. काश्मीरी लाल मिरची जरा कुरकुरीत झाली की गॅस बंद करायचा. मसाले मस्त खमंग परतले गेले पाहिजेत.
३. परतलेले मसाले मस्त गार करुन घ्यायचे. गार झाल्यावर मसाले मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. त्यात चमचाभर सैंधव घाला. तसेच चमचाभर मीठ घालायचे. चमचाभर आमचूर पावडर घाला. सगळे छान वाटून घ्यायचे. मसाला एकजीव झाला पाहिजे त्याची सरसरीत अशी पूड करुन घ्यायची. वाटून झाल्यावर एका हवाबंद डब्यात काढून घ्यायची.