फळांचा राजा असे आंब्याला म्हटले जाते. वर्षातून एकदाच आपल्या भेटीला अगदी राजेशाही थाटात येतो. आंब्याचा सिझन आला की एखादा उत्सव आल्याप्रमाणे आंबा प्रेमी खुष होतात. (Add 2 ingredients to the amrasa, Forget about the problem of heat )मग रोज आंब्याचे पदार्थ तयार करून खायचे. वर्षातून एकदाच तर खायला मिळतो म्हणून आमरसाच्या वाट्यांवर वाट्या संपवायच्या. आंबा कितीही खाल्ला तरी मन काही भरत नाही. पण आंबा जास्त खाणे शरीरासाठी चांगले नाही. (Add 2 ingredients to the amrasa, Forget about the problem of heat )कारण आंबा प्रचंड उष्ण असतो. आंबा खाल्ला की चेहर्यावर फोड उठतात. ते एक वेळ ठीक आहे, मात्र गळू झाल्यावर अवघड जागेचे दुखणे होऊन बसते. तरीसुद्धा एका वाटीवर कोणी थांबत नाही. आमरस मनसोक्त पितात.
शरीराला होणारा हा त्रास टाळता येतो. काही अगदी सोपे घरगुती रामबाण उपाय आहेत. तुम्हाला ते माहितीही असतील. कारण महाराष्ट्रामध्ये घरोघरी हे उपाय केले जातात. आता या काही गोष्टी लक्षात ठेवा आणि पोटभर अगदी ढेकर येईपर्यंत आमरस प्या. कारण आमरस बाधणार नाही.
अनेक पदार्थ असे असतात, जे एखाद्या खाद्यपदार्थामध्ये वापरले जातात हे आपल्याला माहिती असते. मात्र ते वापरण्यामागील कारण आपल्याला ज्ञात नसते. तसेच आमरसाचेही आहे. आमरसावरही काही पदार्थ घालून नंतरच आमरस पिण्याची पद्धत आहे. आपल्याला ते पदार्थ आमरसावर का घातले जातात, याचे कारण माहित नसते म्हणून आपण आमरस योग्य पद्धतीने खात नाही. पाहा आमरस खाण्याची योग्य पद्धत.
आमरसावर तुपाची धार सोडली जाते. काही जण आमरसाची चव बदलेल किंवा आमरसाला तुपाची काय गरज असे म्हणून तूप घेत नाहीत. आमरसावर तूप घेतले जाते कारण तुपामुळे आमरस बाधत नाही.(Add 2 ingredients to the amrasa, Forget about the problem of heat ) तुपामध्ये ब्यूटिरिक अॅसिड असते जे पचनाची क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करते. वरण पचायला जरा जड असते. त्यामुळे वरण भात आणि तूप असे एकत्र खाल्ले जाते. तुपामुळे डाळ पटकन पचते. त्याचप्रमाणे आमरस पचायला जड असतो. त्यावर थोडे तूप घालून मग आमरस खाल्यावर तो पचायला जरा हलका जातो. संभाव्य त्रास टाळता येतो.
आमरसावर काळी मिरी पूड भुरभुरली जाते. काही जणांना असे वाटते की गोडवा बॅलेन्स करण्यासाठी मिरी पूड वापरली जाते. मात्र तसे नसून मिरी पूड वापरल्यावर आमरसाचा त्रास होत नाही. काळी मिरी अपचनाचे त्रास तसेच गॅस सारख्या समस्या दूर करते. म्हणून मिरी पूड वापरली जाते.