lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > अभिनेत्री यामी गौतमने केला बनाना केक, लाडक्या भाच्यासाठी तिने केलेल्या केकची बघा खास रेसिपी

अभिनेत्री यामी गौतमने केला बनाना केक, लाडक्या भाच्यासाठी तिने केलेल्या केकची बघा खास रेसिपी

How To Make Banana Cake: अभिनेत्री आणि त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या रेसिपी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आता सध्या अभिनेत्री यामी गौतम हिने केलेली बनाना केकची (Yami Gautam made banana cake) रेसिपी अशीच व्हायरल झाली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2022 06:13 PM2022-10-31T18:13:05+5:302022-10-31T18:17:36+5:30

How To Make Banana Cake: अभिनेत्री आणि त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या रेसिपी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आता सध्या अभिनेत्री यामी गौतम हिने केलेली बनाना केकची (Yami Gautam made banana cake) रेसिपी अशीच व्हायरल झाली आहे.

Actress Yami Gautam made banana cake, look at the viral recipe of banana cake | अभिनेत्री यामी गौतमने केला बनाना केक, लाडक्या भाच्यासाठी तिने केलेल्या केकची बघा खास रेसिपी

अभिनेत्री यामी गौतमने केला बनाना केक, लाडक्या भाच्यासाठी तिने केलेल्या केकची बघा खास रेसिपी

Highlightsमागे असाच मीरा राजपूतचा काजुकतली करतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता.तशीच आता चर्चा आहे ती यामी गौतम हिने केलेल्या बनाना केकची

काही काही अभिनेत्रींना कुकींगची खरोखरच आवड असते. नेहमीच्या त्यांच्या व्यस्त शेड्यूलमुळे एरवी स्वयंपाक घरात रमण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसला, तरी काही खास प्रसंगी अनेक अभिनेत्री त्यांच्या स्वयंपाक घरात नक्कीच काहीतरी रेसिपी करताना दिसतात. मागे असाच मीरा राजपूतचा काजुकतली करतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता. अभिनेत्री इशा देओल हिनेही पोंगल सणानिमित्त पारंपरिक पदार्थ केला होता. अनुष्का शर्माने एकदा टोमॅटो सॉस कसा करायचा, याची रेसिपी शेअर केली होती. तशीच आता चर्चा आहे ती यामी गौतम हिने केलेल्या बनाना केकची (Special banana cake recipe by Actress Yami Gautam). 

 

यामीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिच्या बहिणीचा दिड ते दोन वर्षांचा एक गोंडस मुलगा दिसतो आहे. "Donut & his maasi" अशी कॅप्शन तिने या व्हिडिओला दिली असून ती लाडाने तिच्या भाच्याला डोनट म्हणत असावी,

इन्स्टंट नूडल्स करताना लक्षात ठेवा ३ खास गोष्टी, नेहमीच्याच नूडल्स होतील आणखी चवदार!

असं यावरून दिसतं. यामी केक बनविताना अतिशय उत्साहात दिसत असून तिने केलेला केकही परफेक्ट झाला असावा, असं या व्हिडिओवरून दिसतं. केकसाठी कोणता पदार्थ किती प्रमाणात घेतला, याची सविस्तर माहिती तिने दिलेली नाही. पण साधारण कोणकोणते पदार्थ घेतले आहेत, हे समजू शकतं.

 

यामी गौतमने कसा बनवला बनाना केक?
बनाना केक करण्यासाठी यामीने सगळ्यात आधी केळी घेतली आणि ती व्यवस्थित मॅश केली. त्यानंतर त्यात वितळवून घेतलेलं बटर, मैदा, व्हॅनिला इसेंन्स, कोको पावडर, पिठी साखर, क्रिम आणि दूध घातलं.

दिवाळीनंतर खूप दिवसांनी व्यायामाला सुरुवात करताय? ४ चुका करू नका, तज्ज्ञ सांगतात..

हे सगळं मिश्रण केक पॅनमध्ये टाकलं. त्यानंतर त्यावरून काही सुकामेव्याचे तुकडे टाकले आणि मायक्रोवेव्हमध्ये बेक करायला ठेवून दिलं. यानंतर तयार झालेला जो केक तिने दाखवला होता, तो खरोखरंच दिसायला अगदी उत्तम होता. 

 

Web Title: Actress Yami Gautam made banana cake, look at the viral recipe of banana cake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.