उन्हाचा तडाखा आता चांगलाच जाणवायला लागलेला आहे. घराच्या बाहेर पडलं नाही तरीही घरात बसूनही उष्णतेच्या झळा जाणवू लागलेल्या आहेत. उन्हाळ्याचा असा त्रास व्हायला लागला की थंडगार पेयं प्यावी वाटतात. त्यात लिंबू सरबत, पन्हं, कोकम सरबत, शिकंजी अशा पारंपारिक पेयांची तर मजाच न्यारी.. म्हणूनच तुमचा उन्हाळा आल्हाददायक होण्यासाठी माधुरी दीक्षितचे (Madhuri Dixit) पती डॉ. श्रीराम नेने यांनी शिकंजी करण्याची एक सोपी रेसिपी (Dr. Shriram Nene Shared Shikanji Recipe) शेअर केली आहे. (simple and easy recipe of making shikanji)
शिकंजी करण्याची रेसिपी
साहित्य
२ ग्लास पाणी
१ ते दीड लिंबाचा रस
१ टीस्पून गूळ
शरीरातली Vitamin B12 ची कमतरता भरून काढणारे ५ शाकाहारी पदार्थ, तब्येत सांभाळायची तर...
१ टीस्पून काळं मीठ
पाव टीस्पून मिरेपूड
पुदिन्याची काही पाने
१ टीस्पून भिजवलेला सब्जा
२ टीस्पून आल्याचा रस
कृती
शिकंजी करण्यासाठी तुम्ही मिक्सरचा किंवा हँड ब्लेंडरचा वापर करू शकता.
९ महिने अंतराळात राहून सुनीता विल्यम्स यांनी काय केलं- कसा घालवला वेळ? बघा रंजक माहिती
मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घाला आणि त्या पाण्यात आल्याचा रस, लिंबाचा रस, मिरेपूड, काळं मीठ, पुदिन्याची काही पाने, गूळ असं सगळं घाला.
मिक्सरमधून फिरवून हे सगळे पदार्थ छान एकजीव करून घ्या. यानंतर हे मिश्रण एका भांड्यात काढा आणि त्यात उरलेलं पाणी घाला. सगळ्यात शेवटी भिजवलेला सब्जा घाला. सगळं एकदा व्यवस्थित हलवून घेतलं की त्यात बर्फाचे काही तुकडे घालून गारेगार शिकंजी स्वत:ही प्या आणि घरी आलेल्या पाहुण्यांनाही पिऊ घाला.