lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > जेनेलिया देशमुखने मुलांसाठी केलं शाकाहारी ऑम्लेट, बघा हा पदार्थ नेमका असतो काय?

जेनेलिया देशमुखने मुलांसाठी केलं शाकाहारी ऑम्लेट, बघा हा पदार्थ नेमका असतो काय?

Genelia Deshmukh's Recipe for Plant Based Omelette: अंड नसणारं शाकाहारी ऑम्लेट कसं तयार करायचं, असा प्रश्न पडला असेल तर अभिनेत्री जेनेलिया डिसुझा देशमुख हिने तिच्या स्वयंपाकघरात नेमका कोणता प्रयोग केला तो बघायला हवा.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2022 03:57 PM2022-10-18T15:57:46+5:302022-10-18T15:58:51+5:30

Genelia Deshmukh's Recipe for Plant Based Omelette: अंड नसणारं शाकाहारी ऑम्लेट कसं तयार करायचं, असा प्रश्न पडला असेल तर अभिनेत्री जेनेलिया डिसुझा देशमुख हिने तिच्या स्वयंपाकघरात नेमका कोणता प्रयोग केला तो बघायला हवा.. 

Actress Genelia D'souza Deshmukh prepares plant based omelette for her kids  | जेनेलिया देशमुखने मुलांसाठी केलं शाकाहारी ऑम्लेट, बघा हा पदार्थ नेमका असतो काय?

जेनेलिया देशमुखने मुलांसाठी केलं शाकाहारी ऑम्लेट, बघा हा पदार्थ नेमका असतो काय?

Highlightsअभिनेत्री जेनेलिया डिसुझा ही देखील वेगन डाएट पाळत असून तिने तिच्या स्वयंपाकघरात नुकताच शाकाहारी ऑम्लेट बनविण्याचा प्रयोग केला आहे.

हल्ली फिटनेस- डाएट याबाबत सर्वसामान्य लोकही अतिशय जागरुक झाले आहेत. व्यायाम, आहार यांना महत्त्व देत आहेत. त्यामुळेच तर वेटलॉस मार्केटमध्ये नेहमीच डाएटचे, फिटनेसचे वेगवेगळे फॉर्म्युला येत असतात. वेगन डाएट हा त्यातलाच एक प्रकार. अनेक सेलिब्रिटींनी मांसाहार सोडून आधी शाकाहार स्विकारला आणि त्यानंतर ते शाकाहारवरून वेगन डाएटवर आले आहेत. वेगन डाएटमध्ये (Vegan diet) दुध आणि दुग्धजन्य पदार्थही वर्ज्य असतात. अभिनेत्री जेनेलिया डिसुझा ( Genelia D'souza Deshmukh) ही देखील वेगन डाएट पाळत असून तिने तिच्या स्वयंपाकघरात नुकताच शाकाहारी ऑम्लेट (plant based omelette recipe) बनविण्याचा प्रयोग केला आहे. 

 

जेनेलियाने काही दिवसांपुर्वी इन्स्टाग्राम स्टोरी म्हणून हा पदार्थ शेअर केला होता आणि तो चांगलाच व्हायरल झाला.

ॲल्यूमिनियम किंवा लोखंडाच्या कढईला कसं बनवायचं नॉनस्टिक, बघा कुणाल कपूर यांनी सांगितलेली खास ट्रिक

"कोण म्हणतं की शाकाहारी अंड नाही बनू शकत? यशस्वी होईपर्यंत प्रयत्न करू या", असं कॅप्शनही तिने या स्टोरीला दिलं होतं. स्टोरीच्या पुढच्या भागात तिने प्लान्ट बेस्ड ऑम्लेटचा एक फोटोही शेअर केला होता. त्याच्या पुढच्या फोटोत तिची मुलं ब्रेडच्या स्लाईसमध्ये टाकून या पदार्थाचा आस्वाद घेताना दिसली. #myplantbasedbabies असं कॅप्शन तिने मुलांच्या फोटोसाठी दिलं होतं. 

 

कसं करतात शाकाहारी ऑम्लेट?
१. टोमॅटो ऑम्लेट हा शाकाहारी प्रकार आपण ऐकलेला आहेच. जवळपास त्याच्या सारख्याच पद्धतीने प्लान्ट बेस्ड ऑम्लेट करतात.

महागड्या क्रीम कशाला, खोबऱ्याचे २ सोपे उपाय करा, हिवाळ्यातही त्वचा होईल सुंदर- कोमल

२. शाकाहारी ऑम्लेट करण्यासाठी पाव कप हरबरा डाळीचे पीठ किंवा बेसन, पाऊण कप पाणी, १ टेबलस्पून यीस्ट, पाव टीस्पून मीठ किंवा काळं मीठ, पाव कप तुमच्या आवडीच्या बारीक चिरलेल्या भाज्या आणि १ टेबलस्पून तेल एवढं साहित्य लागतं.  

३. तेल वगळता अन्य सगळं मिश्रण एकत्र करून अर्धा तास ठेवा आणि त्यानंतर हे पीठ तव्यावर टाकून त्याच्या आजूबाजूला तेल सोडून त्याचं ऑम्लेट किंवा धीरडं तयार करा. 

 

Web Title: Actress Genelia D'souza Deshmukh prepares plant based omelette for her kids 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.