घरी आलू पराठा (Aal00 Paratha) करतो तेव्हा अनेक अडचणी येतात. ढाब्यावर मिळतो तसा आलू पराठा होत नाही. पराठा लाटताना तुटतो अशी बऱ्याचजणांची तक्रार असते (Al00 Paratha Making Tips). आलू पराठा लाटताना फुटू नये, सारण बाहेर येऊ नये यासाठी काही टिप्स तुम्ही फॉलो करू शकता. यामुळे पराठे मऊ, लुसलुशीत होतील आणि सहजच लाटता येतील. पराठा करण्याच्या सोप्या स्टेप्स पाहूया. (How To Make Aal00 Paratha)
1) पराठ्यासाठी वापलेलं गव्हाचं पीठ नेहमी मऊ आणि लवचीक असाववं. चपातीसाठी मळता त्यापेक्षा थोडं अधिक मऊ असावं. पीठ मळताना त्यात २ चमचे तेल किंवा तूप घाला. पीठ मळून झाल्यानंतर त्यावर हलकं तेल लावून ३० मिनिटं झाकून ठेवा. यामुळे पराठा लाटताना तुटत नाही.
2) पराठ्याचे सारण करण्यापूर्वी बटाटे शिजवून पूर्णपणे थंड करा. गरम बटाट्यांमध्ये ओलावा जास्त असतो. ज्यामुळे सारण चिकट होते आणि पराठा फाटतो.
3) सारणामध्ये पाणी किंवा ओलावा अजिबात नसावा. कांदे वापरल्यास ते किसून चिरून, पिळून घ्या किंवा तळून वापरा. ओलाव शोषण्यासाठी सारणात भाजलेले बेसन किंवा ब्रेड क्रम्ब्स १ चमचा मिसळा.
4) बटाट्याच्या सारणात मोठे तुकडे राहू नयेत. सारण एकदम मऊसूत आणि एकसमान असावे. मोठे तुकडे असल्यास पराठा नीट लाटता येत नाही. पराठा फुटू नये यासाठी पीठ आणि सारण यांचे प्रमाण जवळपास समान ठेवा. जास्त सारण भरल्यास लाटताना बाहेर येतं.
भाकरी करण्यासाठी कोणता तवा वापरायचा? मऊ-गोल-फुगलेल्या भाकऱ्यांची खास ट्रिक
5) पिठाच्या वाटीत सारण भरल्यावर कडा दाबून गोळा व्यवस्थित बंद करून घ्या. वरून जास्तीचे पीठ असल्यास काढून टाका. पराठा लाटण्यापूर्वी गोळा सुक्या पिठात घोळवा. यामुळे तो पोळ पोटाला चिकटत नाही आणि लाटताना सहज सरकतो.
थंडीत करा गरमागरम कढी; तोंडाला येईल चव, पाहा सोपी रेसिपी-अजिबात कढी फुटणार नाही
6) पराठा लाटण्यासाठी हलक्या हातानं दबाव द्या. मध्यभागी कमी दाब देऊन कडांकडून लाटण्यास सुरूवात करा. एकाच दिशेनं दाब न देता, पराठा फिरवून समान दाब देत राहा.
7) आलू पराठा हा चपातीपेक्षा थोडा जाड ठेवावा. जास्त पातळ केल्यास सारण बाहेर येते. पराठा दोन्ही बाजूंनी भाजून झाल्यावरच तेल किंवा तूप लावून भाजा.
