त्वचेची काळजी आपण कायमच घेतो. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जरा जास्त घ्यावी लागते. फक्त त्वचाच नाही तर संपूर्ण शरीराचीच काळजी घ्यावी लागते. (A special drink that softens the skin, can be taken to the office too )उन्हाच्या त्रासामुळे अनेक आजार उद्भवतात. शरीराला हायड्रेटेड ठेवणं फार गरजेचं असतं. त्यासाठी विविध फळे खाणे गरजेचे असते. भरपूर पाणी पिणे गरजेचे असते. काही घरगुती उपाय असतात ते ही आपण करतो.
असाच एक घरगुती उपाय म्हणजे हे पेय. याचे काहीच दुष्परिणाम होणार नाहीत. फायदेच होतील. चवीलाही छान लागते. शरीराला दिवसभरासाठी लागणारी ऊर्जा या ड्रींकमधून मिळते. (A special drink that softens the skin, can be taken to the office too )करायला अगदीच सोपे आहे. तसेच रोज प्यायलाही हरकत नाही. ऑफीसला जाताना बाटलीमध्ये भरून न्यायचे. दिवसभरात थोडे थोडे प्यायचे. त्वचा अगदी सुंदर होईल. तसेच शरीराला थंडावा मिळेल.
साहित्यबीट, मध, पाणी, लिंबू, सब्जा, चाट मसाला, काळे मीठ, पुदिना
कृती१.एका बाटलीमध्ये पाणी घ्या. त्यामध्ये सब्जा टाका आणि झाकून ठेवा. दाहा ते पंधरा मिनिटांमध्ये बिया फुलतात. मग त्यामध्ये लिंबाचा रस पिळा. २. त्यामध्ये दोन चमचे मध घाला. व्यवस्थित ढवळून घ्या. नंतर त्यामध्ये काळे मीठ घाला. तसेच चाट मसालाही घाला.३. पुदिन्याची जुडी छान धुऊन घ्या. नीट निवडून घ्या. मग पुदिन्याची पाने जरा कुसकरा आणि मग त्या पाण्यामध्ये टाका. एक बीट मस्त किसून घ्या. किंवा बारीक चिरुन घ्या. ते ही बाटलीमध्ये टाका.४. बाटलीचे झाकण लावा आणि ढवळून घ्या. गार प्यायचे असेल तर त्यामध्ये थोडा बर्फ घाला किंवा फ्रिजमध्ये ठेवा. गार झाल्यावर प्या.
हे सगळे पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील पाण्याची पातळी सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात. तसेच गरजेची असणारी पोषणतत्त्वे या पदार्थांमध्ये असतात. उन्हाळ्यामध्ये काही तरी गार प्यायची इच्छा झाली की आपण विकतचे कोल्ड्रींग पितो. ते शरीरासाठी फार हानिकारक असते. त्यामुळे त्या ऐवजी असे पेय पिणे कधीही फायद्याचे ठरेल.