वजन कमी करण्यासाठी आपण विविध पदार्थ खाऊन पाहत असतो. मात्र त्याचा फायदा होतोच असे नाही. (A special drink made from traditional satu flour, easy to make and even faster for weight loss)आपल्या भारतीय पारंपारिक पदार्थांचा उपयोग करुन वजन कमी करण्यासाठी छान पदार्थ तयार करता येतात. फक्त एखादं पेय पिऊन वजन कमी होत नाही. त्यामुळे तसे दावे करणाऱ्या कंपनींचे प्रॉडक्ट्स कधीच वापरू नका. नियमित व्यायाम करा. त्याबरोबर योग्य आहार घ्या. हे सारे केल्यावर काही पदार्थ वजन पटकन कमी करण्यात मदत करतात. जसे की ज्वारी, बाजरी सारखी पिठे असतील किंवा सातूचे पीठ असेल. सातूच्या पिठाचे लाडू लहान मुलांना खायला दिले जातात. त्यामध्ये पोषण असते. तसेच सातूच्या पिठात थंडावा असतो. सातूच्या पिठाचे विविध पदार्थ खाण्याचा फायदाच होतो. शिवाय चवीलाही हे पदार्थ चांगलेच असतात.
हे सातूचे ड्रिंक अगदी चांगले आहे. (A special drink made from traditional satu flour, easy to make and even faster for weight loss)वजन कमी करण्यात मदत करेल. तसेच हायड्रेटेड राहण्यासाठीही उपयुक्त ठरेल. करायला अगदीच सोपे आहे. रोज एक ग्लास हे पेय प्या. पोटाला आराम मिळेल.
साहित्य
सातूचे पीठ, पाणी, दही, सैंधव मीठ, धणे पूड, जिरे पूड, आलं, कोथिंबीर
कृती
१. एका खोलगट भांड्यात दोन चमचे सातूचे पीठ घ्या. आजकाल सातूचे पीठ विकत मिळते. विकतचे नाही तर मग तुम्हीही दळायलाही देऊ शकता. सातूचे पीठ दोन चमचे घेतल्यावर त्यात दोन चमचे दही घाला. दही आणि पीठ एकजीव करुन घ्या. घुसळणीचा वापर करा आणि दही व पीठ मिक्स करुन घ्या.
२. त्यात चमचाभर सैंधव मीठ घाला. तसेच चमचाभर जिरे पूड घालायचे. चमचाभर धणे पूड घालायची. आल्याचा लहानसा तुकडा छान किसून घ्या. किसलेले आले त्या मिश्रणात घाला. सगळे मिश्रण घुसळणीने एकजीव करून घ्यायचे. मग त्यात पाणी ओतायचे. गरजे पुरते पाणी घ्या. अति पातळ करू नका.
३. कोथिंबीर निवडून घ्या. छान बारीक चिरून घ्या. मग ती चिरलेली कोथिंबीर मिश्रणात घाला आणि ढवळून घ्या. त्यात हवं तर गार पाणी ओतू शकता. नाही तर तसेच प्या.