लहान मुलांच्या आवडीची भाजी म्हणजे भेंडी. कितीही खाल्ली तरी त्यांना ती आवडते. जर तुम्हीही भेंडीची भाजी आवडीने खाता तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे. भेंडीची भाजी एकदा या पद्धतीने करुन पाहा. अगदी सोपी रेसिपी आहे. (A slightly different recipe for making children's favorite okra - make it crispy and delicious in ten minutes)मस्त कुरकुरीत होते. एकदा नक्की करुन पाहा. त्यासाठी केलेला मसाला इतरही भाजींसाठी वापरु शकता. भात आणि पोळी दोन्हीसोबत एकदम मस्त लागते. पाहा कशी करायची.
साहित्य चणाडाळ, शेंगदाणे, काश्मीरी लाल मिरची, जिरे, लसूण, भेंडी, कांदा, कडीपत्ता, लाल तिखट, मीठ, तेल, कोथिंबीर
कृती१. एका कढईत थोडे तेल घ्यायचे. त्यात अर्धी वाटी चणाडाळ घ्यायची. त्यात अर्धी वाटी चणे घ्यायचे. दोन्ही पदार्थ मस्त परतून घ्यायचे. त्यात दोन ते तीन काश्मीरी लाल मिरची घालायच्या. मसाला छान परतून घ्यायचा. नंतर एका मिक्सरच्या भांड्यात मिश्रण घ्यायचे. गार करायचे मग मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. त्यात लसणाच्या काही सोललेल्या पाकळ्या घ्यायच्या.
२. लसूण परतायचा नाही. नाहीतर चटणी पातळ होईल. कच्चा लसूण जास्त छान लागतो. जरा जाडसर असा मसाला वाटून घ्यायचा. एका कढईत तेल घ्यायचे जरा जास्त तेल घ्या. त्यात बारीक चिरलेली भेंडी तळून घ्यायची. कुरकुरीत करायची.
३. एका कढईत फोडणी तयार करायची. त्यासाठी थोडे तेल घ्या. तेलात जिरे घाला. जिरे मस्त फुलू द्यायचे. मग त्यात कडीपत्ता घालायचा. कडीपत्ताही परतायचा. मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा छान गुलाबी परतायचा. तळलेली भेंडी घालायची. त्यात तयार केलेला मसाला घालायचा आणि चवीपुरते मीठ घालायचे. भाजी मस्त खमंग परतायची. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. वाफ काढू नका. म्हणजे भेंडी कुरकुरीत राहील. चवीला फार मस्त लागते.
Web Summary : Make crispy okra quickly with this simple recipe! Fry okra, prepare a flavorful spice mix with lentils, peanuts, and spices, then combine for a delicious dish with rice or roti.
Web Summary : इस आसान रेसिपी से कुरकुरी भिंडी जल्दी बनाएं! भिंडी को भूनें, दाल, मूंगफली और मसालों के साथ एक स्वादिष्ट मसाला मिश्रण तैयार करें, फिर चावल या रोटी के साथ परोसें।