महाराष्ट्रात सगळ्या प्रकारचे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. मात्र काही ठराविक आपले मराठमोळे पदार्थ असतात जे फारच लोकप्रिय आहेत. जसे की पिठलं भाकरी. गावोगावी खाल्ली जातो. पौष्टिक , परवडणारे आणि पचणारे तसेच पोटभर खातात येणारे अन्न. (A slightly different and unique recipe for making peethla, must try recipe )पिठलं भात असो किंवा भाकर आवडीनेच खाल्ली जाते. घरोघरी करायची पद्दत मात्र जरा वेगळीच. पिठलं तर नक्कीच करत असाल, एकदा हे तिखट असे फोडणी दिलेले पिठलं करुन पाहा. चवीला जबरदस्त आणि करायला सोपे.
साहित्य बेसन, पाणी, मीठ, हळद, लाल तिखट, कांदा, लसूण, हिरवी मिरची, तेल, मोहरी, जिरं, आलं, कडीपत्ता, कोथिंबीर
कृती१. लसूण सोलून घ्यायचा. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. कोथिंबीर निवडायची आणि स्वच्छ धुवायची. नंतर बारीक चिरायची. कांदा सोलून घ्यायचा. मस्त बारीक चिरायचा. आल्याचा तुकडा , लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरचीचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचे.
२. पॅनमध्ये तेल गरम करायचे. तेल तापल्यावर मोहरी घालून परतायची. मोहरी तडतडली की त्यात कडीपत्ता घालायचा. कडीपत्ता छान फुलल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला आणि खमंग गुलाबी परतून घ्या. कांदा छान परतून झाल्यावर त्यात तयार केलेला ठेचा घालायचा. तेल सुटेपर्यंत परतायचा. छान खमंग परतायचा. मग त्यात थोडे पाणी घालायचे. पाणी उकले की मीठ घालायचे. हळद घालायची आणि चमचाभर असे करत थोडे थोडे बेसन घालायचे. बेसन ढवळत राहायचे गुठळ्या होऊ देऊ नका.
३. ढवळून छान घट्ट पिठलं तयार करा. जास्त घट्ट नको मध्यम घट्ट पिठलं तयार करायचे आणि मग झाकून एक वाफ काढून घ्यायची. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ढवळायचे आणि छान शिजल्यावर गॅस बंद करायचा. एका फोडणी पात्रात थोडे तेल घ्यायचे. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे आणि लाल तिखट घालून छान फोडणी तयार करायची. पिठल्यात ओतायची आणि मिक्स करायचे.
Web Summary : Peethla Bhakri is a popular, nutritious, and filling Maharashtrian dish. This recipe offers a flavorful twist with a spicy tempering. Simple to make, it involves preparing a special thecha and then cooking it with besan and spices for an amazing taste.
Web Summary : पिठलं भाकरी एक लोकप्रिय, पौष्टिक और पेट भरने वाला महाराष्ट्रीयन व्यंजन है। यह रेसिपी मसालेदार तड़के के साथ एक स्वादिष्ट मोड़ प्रदान करती है। बनाने में आसान, इसमें एक विशेष ठेचा तैयार करना और फिर बेसन और मसालों के साथ पकाना शामिल है, जो अद्भुत स्वाद देता है।