Join us

सिमला मिरची आणि कांद्याची सोपी पण भन्नाट रेसिपी, सिमला मिरची प्रचंड आवडायला लागेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2025 09:20 IST

A simple yet delicious recipe made of capsicum and onion : सिमला मिरचीची अशी भाजी करा. कांदा घालायचा म्हणजे चव दुप्पट. जरा वेगळी आणि भन्नाट रेसिपी.

सिमला मिरचीची अशी भाजी नक्की कधी खाल्ली नसेल. एकदा करा आणि खाऊन पाहा. (A simple yet delicious recipe made of capsicum and onion)चवीला अगदी मस्त आणि करायला सोपी ही भाजी पौष्टिकही आहे.  

साहित्य कांदा, सिमला मिरची, दही, हिरवी मिरची, आलं, जिरे, मोहरी, हळद, लाल तिखट, कोथिंबीर, तूप, बेसन, दाण्याचे कुट, हिंग 

कृती१. कांदा सोलून घ्यायचा आणि लांब-लांब चिरून घ्यायचा. अगदी पातळ काप करायचे. जास्त जाड काप करु नका. तुटणार नाहीत एवढेच जाड ठेवायचे. सिमला मिरचीच्या बिया काढून घ्यायच्या. सिमला मिरचीही लांब लांब चिरायची. सिमला मिरची मात्र जास्त पातळ चिरु नका. तिचा लगदा होतो. हिरव्या मिरचे बारीक तुकडे करायचे. कोथिंबीरीची छान ताजी जुडी घ्यायची. कोथिंबीर निवडायची. स्वच्छ धुवायची. आणि मग बारीक चिरायची. आले छान किसायचे. तसेच लसणाच्या काही पाकळ्या सोलायच्या. त्या पाकळ्यांचे बारीक तुकडे करायचे किंवा ठेचून घ्यायचे.  

२. एका खोलगट पातेल्यात सिमला मिरचीचे काप घ्यायचे. तसेच चिरलेला कांदा घ्यायचा. त्यात दाण्याचे कुट घालायचे. दाणे जरा जाडसर असतील तर भाजी जास्त छान लागते. सरसरीत कुट नका घेऊ. त्यात थोडे मीठ घालायचे. चमचाभर लाल तिखट घालायचे. थोडी हळद घालायची. चमचाभर बेसन घालायचे. बेसन अगदी चमचाभरच घ्यायचे. सगळे पदार्थ छान एकजीव कारयचे. हळद आणि लाल तिखट सगळ्या पदार्थांना नीट लागले की मिश्रण थोडा वेळ बाजूला ठेवायचे. 

३. एका कढईत चमचाभर तूप घ्यायचे. तेल घेतले तरी चालेल. त्यावर जिरे घालायचे आणि छान फुलू द्यायचे. जिरे फुलल्यावर त्यात चमचाभर मोहरी घालायची. मोहरी तडतडू द्यायची. मोहरी तडतडल्यावर त्यात चमचाभर हिंग घालायचे. छान परतायचे आणि मग किसलेलं आलं घालायचे. बारीक चिरलेली लसूण घालायची. छान परतायचे. लसूण परतून झाल्यावर त्यावर तयार करुन ठेवलेले मिश्रण घालायचे आणि मस्त मिक्स करायचे. फोडणी आणि भाज्या छान मिक्स झाल्यावर त्यात दही घालायचे आणि ढवळायचे. दही छान गोड वापरायचे. एक वाफ काढायची भाजी जरा घट्ट होऊ द्या. मग त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि ढवळा.    

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स