Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > रोज एक ग्लास बिटाचा रस पोटासाठी अमृतच, चवीलाही मस्त आणि तब्येतीच्या अनेक तक्रारी होतात गायब

रोज एक ग्लास बिटाचा रस पोटासाठी अमृतच, चवीलाही मस्त आणि तब्येतीच्या अनेक तक्रारी होतात गायब

A glass of beetroot juice every day is medicine for the stomach, tastes great and many health complaints disappear : आरोग्यासाठी फार फायद्याचे ठरतो बिटाचा रस.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2025 19:29 IST2025-10-01T18:57:19+5:302025-10-01T19:29:30+5:30

A glass of beetroot juice every day is medicine for the stomach, tastes great and many health complaints disappear : आरोग्यासाठी फार फायद्याचे ठरतो बिटाचा रस.

A glass of beetroot juice every day is medicine for the stomach, tastes great and many health complaints disappear. | रोज एक ग्लास बिटाचा रस पोटासाठी अमृतच, चवीलाही मस्त आणि तब्येतीच्या अनेक तक्रारी होतात गायब

रोज एक ग्लास बिटाचा रस पोटासाठी अमृतच, चवीलाही मस्त आणि तब्येतीच्या अनेक तक्रारी होतात गायब

अनेक सामान्य त्रासांचे उपाय आपल्या स्वयंपाकघरातच असतात. बीट आहारात असणे फार गरजेचे असते. रोज सकाळी बिटाचा रस पिणे आरोग्यासाठी फारच फायद्याचे ठरु शकते. रोज थोडा बिटाचा रस घेतल्याने शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. बिटामध्ये भरपूर प्रमाणात लोह, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम, पोटॅशियम, जीवनसत्त्व सी, फायबर तसेच अँटी ऑक्सिडंट्स आढळतात. (A glass of beetroot juice every day is medicine for the stomach, tastes great and many health complaints disappear.)ही पोषणसत्त्व शरीराची ताकद वाढवतात आणि रक्तशुद्धीकरिता उपयुक्त ठरतात. विशेषतः रक्ताची कमतरता असलेल्या लोकांसाठी बिटाचा रस फायदेशीर मानला जातो, कारण त्यात असलेले लोह नवीन रक्तपेशी निर्माण करण्यास मदत करते. त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी सुधारते आणि थकवा कमी होतो. रक्ताचा काही त्रास असेल तर मग बिटचा रस रोज प्यायलाच हवा. 

बिटाचा रस त्वचेच्या आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. त्यातील अँटी ऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व सी त्वचेतील घाण व टॉक्सिन्स बाहेर टाकतात, ज्यामुळे त्वचा उजळ आणि तजेलदार दिसते. नियमित प्यायल्यामुळे पिंपल्स कमी होऊ शकतात आणि चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते. तसेच बिटातील फॉलिक अॅसिड केसांच्या मुळांना पोषण देते, त्यामुळे केस गळणे कमी होते. त्वचेसाठी बिटाचा रस चेहऱ्याला लावणेही फायद्याचे ठरते.तसेच रोज हा रस थोडा प्यायल्याने हळूहळू त्वचा सुंदर होते. 

हृदयासाठी देखील बिटाचा रस खूप फायदेशीर आहे. त्यातील नायट्रेट्स रक्तवाहिन्यांसाठी फायद्याचे असतात. तसेच ते रक्तदाब नियंत्रित ठेवतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. खेळाडूंसाठी बिटाचा रस ऊर्जा वाढवणारा मानला जातो, कारण तो सहनशक्ती वाढवतो व स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळवून देतो. पचनशक्ती सुधारण्यासाठी बिटातील फायबर मदत करते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

बिटामध्ये नैसर्गिक डिटॉक्सिफायिंग गुणधर्म आहेत, ज्यामुळे यकृताची कार्यक्षमता सुधारते आणि शरीरातील हानिकारक द्रव्ये बाहेर टाकली जातात. नियमित बिटाचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते आणि आजारपणापासून संरक्षण मिळते. म्हणूनच बिटाचा रस हा फक्त चविष्टच नाही तर पौष्टिक खजिना आहे. रोज थोडा रस घेतल्याने शरीर, त्वचा आणि मन या तिन्हीमध्ये सकारात्मक बदल जाणवतो.

 

Web Title : चुकंदर का रस: स्वास्थ्य, स्वाद और कल्याण के लिए एक दैनिक गिलास

Web Summary : चुकंदर का रस एक शक्ति केंद्र है, जो रक्त शोधन, त्वचा के स्वास्थ्य और हृदय क्रिया के लिए महत्वपूर्ण पोषक तत्वों से भरपूर है। यह प्रतिरक्षा को बढ़ाता है, पाचन में सहायता करता है, यकृत को विषमुक्त करता है और समग्र कल्याण को बढ़ाता है।

Web Title : Beetroot juice: A daily glass for health, taste, and wellness.

Web Summary : Beetroot juice is a powerhouse, rich in nutrients vital for blood purification, skin health, and heart function. It boosts immunity, aids digestion, detoxifies the liver, and enhances overall well-being.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.