Join us
Daily Top 2Weekly Top 5

फोडणीचा भात करण्याची चमचमीत रेसिपी - एकदा या पद्धतीने करुन पाहा, नेहमीपेक्षा वेगळा आणि जास्त चविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2025 15:03 IST

A delicious recipe for fried rice - try it this way, it's different and tastier than usual : लसणाची फोडणी देऊन करा हा चविष्ट भात. पाहा सोपी रेसिपी.

नाश्त्यासाठी केल्या जाणाऱ्या खास पदार्थांपैकी एक म्हणजे फोडणीचा भात. हा पदार्थ झटपट होतो. उरलेला भातही वापरला जातो. तसेच चवीला फोडणीचा भात अगदीच मस्त लागतो. विविध प्रकारे हा भात करता येतो. एकदा या पद्धतीने करुन पाहा. लसूण घालून केलेला हा पदार्थ अगदीच मस्त लागतो.(A delicious recipe for fried rice - try it this way, it's different and tastier than usual) करायला अगदीच सोपा आहे. पाहा करण्याची सोपी पद्धत.  

साहित्य भात, लसूण, मीठ, लाल तिखट, कांदा, बटाटा, तेल, मोहरी, कडीपत्ता, लाल मिरची, कोथिंबीर, लिंबू 

कृती१. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. लसूण भरपूर वापरायचा. लसणाच्या पाकळ्या ठेचण्यासाठी भांड्यात घ्यायच्या. त्यात चमचाभर मीठ घालायचे. तसेच दोन ते तीन चमचे लाल तिखट घालायचे. लसूण , मीठ आणि लाल तिखट ठेचून घ्यायचे. त्याची पेस्ट करायची नाही. फक्त थोडाच ठेचायचा. 

२. कोथिंबीरीची ताजी जुडी आणायची आणि निवडायची. बारीक चिरायची. कांदा घ्यायचा, सोलायचा आणि बारीक चिरायचा. लाल मिरचीचे तुकडे करायचे. एक बटाटा सोलून घ्या आणि चिरुन घ्या. 

३. कढईत थोडे तेल घ्यायचे. तेल जरा तापल्यावर त्यात भरपूर मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्यात कडीपत्ता घालायचा. कडीपत्ताही परतायचा, लाल मिरचीचे तुकडे घालायचे. आणि नंतर त्यात बटाटा घालायचा. बटाटाही मस्त परतून घ्यायचा. जरा कुरकुरीत करायचा. त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदाही गुलाबी - खमंग परतून घ्यायचा. त्यात ठेचलेला लसूण घालायचा आणि ढवळून घ्यायचे. वाटल्यास आणखी थोडे लाल तिखट घालायचे. फोडणी मस्त खमंग झाल्यावर त्यात भात घालायचा. मोकळा छान राहील असा ढवळायचा. 

४. भातात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. लिंबाचा रस घालायचा. ढवळायचे आणि एक वाफ काढायची. भात छान परतून घ्यायचा. पाणी वगैरे घालू नका. ओलाव्यासाठी लिंबाचा रस पुरेसा आहे. गरमागरम भात खा. भात फोडणीत घातल्यावर जास्त वेळ गॅस चालू ठेवू नका. तो जळण्याची शक्याता जास्त असते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Spicy Fried Rice Recipe: A Delicious and Unique Twist

Web Summary : Make flavorful fried rice quickly with leftover rice, garlic, and spices. Sauté mustard seeds, curry leaves, chilies, and potatoes. Add onions and garlic paste. Mix in rice, coriander, and lemon juice. Steam briefly. Enjoy this simple, tasty dish.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स