आजकाल बदललेल्या जीवनशैलीमुळे हाडे कमकुवत होणे, सांधेदुखी, केस गळणे किंवा हार्मोनल असंतुलन यांसारख्या समस्या लहान वयातही जाणवू लागल्या आहेत. अशा वेळी निसर्गाने दिलेले काही साधे पण अत्यंत पोषक घटक आपल्या आहारात नियमितपणे समाविष्ट करणे गरजेचे ठरते. तीळ, भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या बिया, अळशी, खजूर आणि शेवगा हे असे काही सुपरफूड्स आहेत जे शरीराला आतून मजबूत ठेवतात.
तीळामध्ये नैसर्गिक कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. हे दोन्ही घटक हाडे आणि सांधे मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. विशेषतः महिलांमध्ये हार्मोनल बदलांमुळे हाडांची झीज वाढू शकते, अशा वेळी तीळाचे सेवन फायदेशीर ठरते. भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या बियांमध्ये झिंक आणि व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. हे घटक केसांची मुळे मजबूत करतात, केस गळती कमी करण्यास मदत करतात आणि त्वचा तसेच रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास उपयुक्त ठरतात.
अळशी ही ओमेगा-३ फॅटी अॅसिड्सचा उत्तम स्रोत आहे. ओमेगा-३ शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते आणि टाळूचे आरोग्य सुधारून केसांची वाढ चांगली ठेवते. खजूर नैसर्गिक गोडवा देत असल्यामुळे साखरेऐवजी आरोग्यदायी पर्याय ठरतो. त्यातील फायबर आणि खनिजे पचन सुधारतात आणि शरीराला झटपट ऊर्जा देतात. हे लाडू फार पौष्टिक आहेत .
साहित्य पांढरे तीळ, भोपळ्याच्या बिया, सुर्यफुलाच्या बिया, अळशी, खजूर, मोरींगा पूड, वेलची पूड
कृती१. एका पसरट भांड्यात अर्धी वाटी पांढरे तीळ घ्यायचे. त्यात अर्धी वाटी भोपळ्याच्या बिया घालायच्या. तसेच त्यात सुर्यफुलाच्या बियाही घालायच्या. अर्धी वाटी अळशी घ्यायची आणि मस्त भाजून घ्यायचे. अगदी फक्त पाच मिनिटे भाजायचे. नंतर गार करत ठेवायचे.
२. गार झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आणि वाटून घ्यायचे. जाडसर पूड तयार करायची. खजूराच्या बिया काढून घ्यायच्या. मिक्सरच्या भांड्यात खजूर आणि अगदी चमचाभर मोरींगा पूड घालायची. थोडी वेलची पूड घालायची आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचे. मिश्रण काढून घ्यायचे आणि त्याला लाडूचा आकार द्यायचा. छान गोलाकार लाडू वळायचे आणि हवाबंद डब्यात साठवून ठेवायचे. रोज एक लाडू खा. नक्कीच फायदा होतो.
Web Summary : This ladoo, packed with sesame, pumpkin, sunflower seeds, flaxseeds, dates, and moringa, combats bone weakness, hair fall, and hormonal imbalances. These superfoods strengthen bones, improve hair health, boost immunity, and provide sustained energy. A daily ladoo offers holistic health benefits.
Web Summary : तिल, कद्दू, सूरजमुखी के बीज, अलसी, खजूर और मोरिंगा से भरपूर यह लड्डू हड्डियों की कमजोरी, बालों के झड़ने और हार्मोनल असंतुलन से लड़ता है। ये सुपरफूड हड्डियों को मजबूत करते हैं, बालों के स्वास्थ्य में सुधार करते हैं, प्रतिरक्षा को बढ़ावा देते हैं और निरंतर ऊर्जा प्रदान करते हैं। रोजाना एक लड्डू समग्र स्वास्थ्य लाभ प्रदान करता है।