Lokmat Sakhi >Food > रोज ब्लॅक कॉफी पिण्याचे ७ फायदे, वाचून म्हणाल चला १ कप कॉफ प्यायलाच हवी!

रोज ब्लॅक कॉफी पिण्याचे ७ फायदे, वाचून म्हणाल चला १ कप कॉफ प्यायलाच हवी!

7 benefits of drinking black coffee every day : कॉफी शरीरासाठी चांगली आहे. एक कप पिणे ठरते फायदेशीर.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2025 15:21 IST2025-02-21T15:19:43+5:302025-02-21T15:21:27+5:30

7 benefits of drinking black coffee every day : कॉफी शरीरासाठी चांगली आहे. एक कप पिणे ठरते फायदेशीर.

7 benefits of drinking black coffee every day | रोज ब्लॅक कॉफी पिण्याचे ७ फायदे, वाचून म्हणाल चला १ कप कॉफ प्यायलाच हवी!

रोज ब्लॅक कॉफी पिण्याचे ७ फायदे, वाचून म्हणाल चला १ कप कॉफ प्यायलाच हवी!

चहा की कॉफी हा वाद काही कधी संपणार नाही. चवीचं माहिती नाही, पण शरीरासाठी कॉफी चहापेक्षा नक्कीच चांगली असते. (7 benefits of drinking black coffee every day)कॉफी पिण्याचे काही फायदे आहेत. पण आपण जसी कॉफी पितो तशी नाही. साधी ब्लॅक कॉफीच. ते ही  योग्य प्रमाणात प्यायल्यास शरीरासाठी उपयुक्त ठरेल. अति कॉफी चांगली नाही. त्यात जर साखर घालत आहात किंवा क्रिम वापरत आहात तर, त्याचा शरीरासाठी काही उपयोग नाही. (7 benefits of drinking black coffee every day)अशाने चांगले नाही तर वाईटच परिणाम होतील. 

कॉफी पिण्याचे फायदे

१. कॉफीमध्ये कॅफेन असते ज्यामुळे तरतरी येते. आळस दूर होतो. म्हणून जागरण करून काम करणारे लोक कॉफी पितात. शरीराच्या कार्यक्षमतेला कॅफेनमुळे उत्तेजन मिळते.

२. कॉफी वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी चहाऐवजी कॉफी प्यायला सुरवात करा. रोज एक किंवा दोन कपच प्या. कॉफीचा अतिरेक नको.(7 benefits of drinking black coffee every day)

३. रक्तामध्ये एड्रेनालाईन नामक एक रस असतो. जो हार्मोन, ताणतणाव तसेच रक्त प्रवाहाचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतो. एड्रेनालाईनचे कार्य नीट चालावे यासाठी कॉफीचा फायदा  होतो. 

४. मधुमेहाचा धोका कॉफी प्यायल्याने कमी होतो. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे. त्यांच्यासाठी कॉफी हा एक चांगला पर्याय आहे. असे काही अभ्यासांमधून सिद्ध झाले आहे.     

५. रेडक्लिफेबल.कॉम यांच्या मते कॉफी प्यायल्याने स्मरणशक्ती वाढते. गोष्टी विसरण्याची सवय असलेल्या लोकांनी कॉफी प्यावी. तसेच आकलन शक्ती ही कॉफीने वाढते. लक्ष केंद्रित करण्यासाठी कॉफी उपयुक्त असते. 

६.  लिव्हरचा त्रासही कॉफीमुळे कमी होतो. पोटासाठीही कॉफी चांगली असते.  डोपामाइनची पातळी संतुलित ठेवण्यासाठी कॉफी उपयुक्त ठरते. 

७. त्वचेसाठी कॉफी चांगली असते. म्हणूनच कॉफीपासून म्हणजेच कॅफेनपासून तयार केलेले अनेक प्रॉडक्ट बाजारात मिळतात. कॉफी पावडरचा वापर करून चेहर्‍यासाठी लेपही तयार करता येतो. कॉफीमध्ये पाणी घालून त्यात कोरफडीचा अर्क घालायचा. चेहर्‍यासाठी स्क्रब म्हणून वापरायचा. नंतर कोमट पाण्याने धुवून टाकायचा. त्वचा स्वच्छ होते.  
 

Web Title: 7 benefits of drinking black coffee every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.