दही हे पचनासाठी चांगले मानले जाते. त्यातील उपयुक्त जिवाणू पोटातील पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. दही वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही उपयुक्त असते. त्यामुळे आहारात दही नक्की असावे. मात्र दही योग्य पद्धतीने खाल्ले तरच त्याचा फायदा होतो. दही खाताना काही चुका केल्या तर त्याचा पचनासाठी उपयोग तर होत नाहीच शिवाय त्याचा फायदा होण्याऐवजी पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो. (5 mistakes while eating curd can worsen stomach and cause skin diseases, see what to avoid )अनेक वेळा दही खाताना होणाऱ्या काही चुका पचन सुधारण्याऐवजी ते आणखी बिघडवतात. त्यामुळे दही खाताना कोणत्या चुका टाळाव्यात हे समजून घेणे गरजेचे आहे. १. सर्वात सामान्य चूक म्हणजे अतिशय गरम भातासोबत दही खाणे. दही भात पोटाला आराम देणारा आणि पचनासाठी फायद्याचा पदार्थ आहे. मात्र गरम भात आणि थंड दही एकत्र केल्यावर पचनसंस्थेवर अचानक ताण येतो. थंड आणि गरम एकत्र पोटाला त्रासाचे ठरते. त्यामुळे पोट फुगणे, गॅस, जडपणा किंवा आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच दही भात करताना शिळा भात किंवा गार भातच वापरला जातो.
२. दुसरी चूक म्हणजे दह्यात साखर घालून खाणे. दही साखर हे मिश्रण फार चविष्ट लागते मात्र ते आरोग्यदायी अजिबात नाही. दह्यात साखर घातल्यावर त्याचा पचनासाठी फारसा फायदा होत नाही. साखर दह्यातील उपयुक्त जिवाणूंचा प्रभाव कमी करु शकते आणि रक्तातील साखरेची पातळीही अचानक वाढते. पचन सुधारायचे असेल तर दही साखरेऐवजी थोडे मीठ, जिरे पूड किंवा हिंग घालून खाणे जास्त योग्य ठरते.
३. अनेक जण रात्री उशिरा दही खातात, हीदेखील एक वाईट सवय आहे. रात्री पचनशक्ती कमी झालेली असते. अशावेळी दही खाल्ल्यास कफ वाढणे, घसा बसणे किंवा सर्दी होणे असे त्रास होतात. दही दुपारी किंवा दुपारच्या जेवणासोबत खाल्ले तर ते पचनाला अधिक मदत करते.
४. खूप थंड दही थेट फ्रिजमधून काढून खाणेही पचनासाठी योग्य नाही. थंड दही पोटातील अग्नी मंदावू शकते. दही थोडावेळ बाहेर ठेवून सामान्य तापमानाला आल्यावर खाल्ले तर त्याचा पचनावर चांगला परिणाम होतो.
५. दह्याचे प्रमाणही महत्त्वाचे असते. गरजेपेक्षा जास्त दही खाल्ल्यास कफ वाढतो. रोज थोड्या प्रमाणात आणि गरजेनुसार दही खाणेच फायदेशीर ठरते.
थोडक्यात सांगायचे तर दही हे आरोग्यासाठी उपयुक्त असले तरी ते कसे आणि कधी खाल्ले जाते यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो. गरम भातासोबत दही खाणे, दह्यात साखर घालणे, रात्री उशिरा किंवा फार थंड दही खाणे अशा चुका टाळल्या तर दही पचन सुधारण्यास नक्कीच मदत करु शकते.
Web Summary : Eating curd incorrectly can harm digestion. Avoid hot rice, sugar, late nights, and excessive amounts. Consume at room temperature for optimal benefits.
Web Summary : गलत तरीके से दही खाने से पाचन खराब हो सकता है। गर्म चावल, चीनी, देर रात और अत्यधिक मात्रा से बचें। बेहतर लाभ के लिए कमरे के तापमान पर सेवन करें।