Join us
Daily Top 2Weekly Top 5

५ किरकोळ चुका घालवतात पदार्थांची चव-फसतो स्वयंपाक; तुम्हीही रोज करताय ‘या’ चुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2026 17:59 IST

5 minor mistakes that ruin the taste of food - cooking goes wrong; You too make these mistakes every day : या चुका टाळा. स्वयंपाक करताना घ्या काळजी.

स्वयंपाक ही रोजची गोष्ट असली तरी घाईगडबडीत किंवा सवयीने काही छोट्या चुका होतात. या चुका फार मोठ्या नसल्या तरी चव, पोषणमूल्य आणि वेळ यावर परिणाम करतात. (5 minor mistakes that ruin the taste of food - cooking goes wrong; You too make these mistakes every day)विशेष म्हणजे या सगळ्या चुका अगदी रिलेटेबल आहेत, कारण आपण सगळेच कधी ना कधी या करतोच!

सर्वात सामान्य चूक म्हणजे भाजी धुतल्यानंतर लगेच चिरणे आणि मग बराच वेळ तशीच ठेवणे. आपण अनेकदा आधीच सगळ्या भाज्या चिरुन ठेवतो, पण त्यामुळे त्यातील पोषक घटक कमी होऊ शकतात. शक्यतो भाजी शिजवण्याच्या आधीच चिरावी आणि जास्त वेळ उघडी ठेवू नये. दुसरी चूक म्हणजे तेल किंवा मसाले अंदाजाने टाकणे. थोडंसं अजून घालते, म्हणता म्हणता पदार्थ खूपच खट होतो. यासाठी मोजून साहित्य वापरण्याची सवय लावावी. म्हणजे अंदाज पक्का होत जातो. 

अनेकदा आपण गॅसची फ्लेम खूप मोठी ठेवतो. पटकन काम आटपावं म्हणून मोठ्या आचेवर स्वयंपाक करतो. पण त्यामुळे भाजी वरून शिजल्यासारखी दिसते आणि आतून कच्ची राहते किंवा जळते. मध्यम आचेवर शिजवल्यास पदार्थ चांगला शिजतो आणि चवही टिकते. आणखी एक सामान्य चूक म्हणजे गरम भांड्यावर लगेच थंड पाणी टाकणे. त्यामुळे भांड्याचा दर्जा खराब होऊ शकतो. भांडं थोडं थंड होऊ द्यावं आणि मगच स्वच्छ करावं.

डाळ किंवा तांदूळ धुताना काही वेळा खूप वेळ पाण्यात भिजत ठेवल्या जातात. जास्त वेळ भिजवल्यास काही पोषक घटक निघून जाऊ शकतात. योग्य वेळासाठीच भाज्या धुवाव्यात . फ्रिजमधील उरलेले अन्न वारंवार गरम करणे हीदेखील एक चूक आहे. त्यामुळे चव आणि पोषणमूल्य दोन्ही कमी होतात. जेवढं आवश्यक आहे तेवढंच गरम करावं. काही वेळा आपण चव बघण्यासाठी चमचा वापरतो आणि तोच पुन्हा भांड्यात ठेवतो. ही सवय आरोग्यासाठी योग्य नाही. चव पाहण्यासाठी वेगळा चमचा वापरावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे घाईगडबडीत स्वयंपाक करणं. तणावात किंवा रागात केलेला स्वयंपाक अनेकदा बिघडतो. शांतपणे, नियोजन करून स्वयंपाक केल्यास चव आणि समाधान दोन्ही वाढते.

English
हिंदी सारांश
Web Title : Avoid these minor cooking mistakes; they ruin the taste of food!

Web Summary : Common cooking errors like cutting vegetables too early, using imprecise measurements, or cooking on high heat can negatively impact food's taste and nutritional value. Reheating food repeatedly and tasting with the same spoon are also detrimental.
टॅग्स :किचन टिप्सअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.हेल्थ टिप्स