Join us

काही केल्या कारल्याचा कडूपणा जात नाही? ३ टिप्स- कडू कारलं खमंग हाेऊन सगळ्यांनाच आवडेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2025 17:46 IST

5 Easy Tips To Remove Bitterness From Bitter Gourd: कारल्याचा कडूपणा काही केल्या कमी होत नसेल तर हे काही सोपे उपाय करून पाहा..(how to make delicious sabji of karela?)

ठळक मुद्देकारल्याचा कडूपणा कमी होण्यास निश्चितच मदत होईल आणि कारल्याची भाजी अधिक खमंग, चटपटीत लागेल.

कारल्याची भाजी खायला अनेक जण नाक मुरडतात. पण कडू कारलं अतिशय गुणकारी असतं. शिवाय ज्या लोकांना मधुमेह असतो, त्यांच्यासाठी तर कडू कारलं खूपच पौष्टिक ठरतं. कारल्यामध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि खनिजेही भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे कारलं खाणं आरोग्यासाठी चांगलंच आहे. पण अनेकांना त्याचा कडवटपणा सहन होत नाही (how to reduce bitterness of karela). म्हणूनच कारल्याची भाजी करताना या काही टिप्स लक्षात ठेवा (5 Easy Tips To Remove Bitterness From Bitter Gourd). यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होण्यास निश्चितच मदत होईल आणि कारल्याची भाजी अधिक खमंग, चटपटीत लागेल.(how to make delicious sabji of karela?)

 

कारल्याचा कडूपणा कमी होण्यासाठी टिप्स..

१. कारल्याचा कडूपणा कमी होण्यासाठी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी एक ट्रिक सांगितली होती. त्यानुसार कारले चिरून घ्या. त्यानंतर त्यांच्यावर थोडा लिंबाचा रस टाका.

केसांवर मेहंदी, डाय लावायला नको वाटते? 'हा' घरगुती हर्बल रंग लावा- पांढरे केस होतील काळे

लिंबाच्या रसामध्ये कारले व्यवस्थित घोळले जातील याकडे लक्ष द्या. त्यानंतर अर्ध्या तासाने या कारल्याच्या फोडी पाण्यात टाकून काढून घ्या आणि यानंतर त्याची भाजी करा. असे केल्याने भाजी अजिबात कडू होणार नाही.

 

२. कारल्याचा कडूपणा कमी करण्याची दुसरी पद्धत म्हणजे तुम्हाला पाहिजे त्या आकारात कारले चिरून घ्या.

काठापदराच्या साड्या-कपाळी कुंकू-केसांत गजरा, ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धक पोहोचल्या थेट ‘या’ मंदिरात! पाहा फोटो

त्यानंतर त्यांच्यातल्या बिया काढून टाका आणि हे कारले १५ ते २० मिनिटे मिठाच्या पाण्यात घालून ठेवा. कारल्यांचा कडवटपणा पुर्णपणे निघून जाईल.

 

३. पनीरची भाजी किंवा पनीरचा एखादा पदार्थ करण्यापुर्वी आपण पनीर मॅरिनेटेड करतो. त्याचप्रमाणे करल्याची भाजी करण्यापुर्वी कारल्याच्या फोडी मॅरिनेटेड करा.

गुलाबी गाल-चेहऱ्यावर चमक आणि परफेक्ट फिगर! आलिया भटच्या सौंंदर्यांचं सिक्रेट- फक्त ५ गोष्ट

म्हणजेच कारल्याच्या फोडी चिरून घ्या आणि त्या १० ते १५ मिनिटे पाण्यात घालून ठेवा. यानंतर फोडी पाण्यातून काढून घ्या. त्याला तिखट, मीठ, दही, जिरेपूड, धनेपूड, चाटमसाला असं सगळं काही मिनिटे लावून ठेवा. यानंतर १५ ते २० मिनिटांनी या फोडींची भाजी करा. कारल्याची भाजी अतिशय चवदार होईल. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सभाज्या