Lokmat Sakhi >Food > 'या' डाळींमधून मिळतं सगळ्यात जास्त प्रोटीन, महागड्या प्रोटीनच्या मागे लागूच नका! पचणारं प्रोटीन तब्येतीसाठी

'या' डाळींमधून मिळतं सगळ्यात जास्त प्रोटीन, महागड्या प्रोटीनच्या मागे लागूच नका! पचणारं प्रोटीन तब्येतीसाठी

High Protein Rich Pulses : प्रोटीन मिळवण्यासाठी तुम्ही मांसाहारच केला पाहिजे असं काही नाही. अशात आज आम्ही तुम्हाला पाच अशा डाळींबाबत सांगणार आहोत ज्यात भरपूर प्रोटीन असतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 14:14 IST2025-05-16T10:18:19+5:302025-05-16T14:14:27+5:30

High Protein Rich Pulses : प्रोटीन मिळवण्यासाठी तुम्ही मांसाहारच केला पाहिजे असं काही नाही. अशात आज आम्ही तुम्हाला पाच अशा डाळींबाबत सांगणार आहोत ज्यात भरपूर प्रोटीन असतं.

5 Dals With Highest Protein Content | 'या' डाळींमधून मिळतं सगळ्यात जास्त प्रोटीन, महागड्या प्रोटीनच्या मागे लागूच नका! पचणारं प्रोटीन तब्येतीसाठी

'या' डाळींमधून मिळतं सगळ्यात जास्त प्रोटीन, महागड्या प्रोटीनच्या मागे लागूच नका! पचणारं प्रोटीन तब्येतीसाठी

High Protein Rich Pulses : भारतीय घरांमध्ये रोज वेगवेगळ्या डाळी खाल्ल्या जातात. तुरची डाळ, मसूरची डाळ, मूगाची डाळ या डाळी तर नेहमीच खाल्ल्या जातात. या डाळींमधून शरीराला भरपूर पोषक तत्व मिळतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, या डाळींमधून भरपूर प्रोटीन सुद्धा मिळतं. म्हणजे प्रोटीन मिळवण्यासाठी तुम्ही मांसाहारच केला पाहिजे असं काही नाही. अशात आज आम्ही तुम्हाला पाच अशा डाळींबाबत सांगणार आहोत ज्यात भरपूर प्रोटीन असतं.

मसूरची डाळ

मसूरची डाळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. प्रोटीनसाठी मसूरची डाळ तुम्ही सालीसोबत किंवा सालीशिवायही खाऊ शकता. मसूरच्या डाळीमध्ये प्रोटीनसोबतच फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६, व्हिटॅमिन बी२, फोलिक अ‍ॅसिड, कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशिअम असे पोषक तत्वही भरपूर असतात.

तूर डाळ

तूर डाळीमध्येही प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. त्याशिवाय या डाळीमध्ये फायबर फोलिक अ‍ॅसिड, आयर्न आणि कॅल्शिअमही भरपूर असतं. ही डाळ रोज खाल्ल्याने शरीरातील प्रोटीन वाढतं. तसेच तूर डाळीच्या सेवनाने डायबिटीस आणि हृदयरोग कंट्रोल करण्यासही मदत मिळते. इतकंच नाही तर तूर डाळीचं पाणी प्यायल्याने शरीराला एनर्जी मिळते.

चण्याची डाळ

चण्याची डाळ प्रोटीनने भरपूर असते. तसेच ही डाळ खाल्ल्याने आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. प्रोटीनसोबतच या डाळीमध्ये फायबरही भरपूर असतं, ज्यामुळे पचनक्रिया चांगली होते आणि पोटही साफ राहतं. इतकंच नाही तर चण्याच्या डाळीने ब्लड प्रेशर कंट्रोल राहण्यास मदत मिळते. तसेच या डाळीने शरीरात लाल रक्तपेशी वाढण्यासही मदत मिळते. 

मूग डाळ

तूर डाळीनंतर मूग डाळ ही सगळ्यात फायदेशीर मानली जाते. ही डाळ खाल्ल्याने  शरीराला प्रोटीन तर मिळतंच, सोबतच तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते. मूग डाळी पचायला हलकी असल्याने पोटाच्या अनेक समस्याही दूर होतात. तसेच या डाळीने शरीरात ब्लड सर्कुलेशनही सुरळीत होतं.

उडीद डाळ

उडीद डाळ अनेक दृष्टीने शरीरासाठी फायदेशीर मानली जाते. या डाळीमध्ये प्रोटीनसोबतच व्हिटॅमिन बी सुद्धा भरपूर असतं. जर प्रोटीनची कमतरता दूर करायची असेल तर या डाळीचा रोजच्या आहारात समावेश करावा. तसेच या डाळीमध्ये फोलिक अ‍ॅसिड, आयर्न, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमसारखे पोषक तत्वही भरपूर असतात. ज्यामुळे तुमचं पचन तंत्र मजबूत राहतं.

प्रोटीन कमी झाल्याची लक्षणं

शरीरात प्रोटीनची कमतरता (Protein Deficiency) झाली तर आरोग्याला धोका होऊ शकतो. शरीरात प्रोटीन कमी झालं तर शरीर काही संकेत देतं. 

अवयवांवर सूज

शरीराच्या कोणत्याही अवयवाव सूज येऊ लागली तर मेडिकल भाषेत याला एडिमा असं म्हणतात. डॉक्टर सांगतात की अवयवयांमध्ये सूज ह्यूमन सीरम एल्बुमिनच्या कमतरतेमुळे होते. जे  ब्लड किंवा ब्लड प्लाज्माच्या लिक्विड पार्टमध्ये असलेलं प्रोटीन आहे. यामुळे शरीराच्या कोणत्याही अवयवात सूज आली असेल तर दुर्लक्ष करू नका.

लिव्हरची समस्या

शरीरात प्रोटीनची कमतरता झाली तर लिव्हरसंबंधी समस्याही वाढू लागतात. प्रोटीनच्या कमतरतेमुळे लिव्हरच्या कोशिकांमध्ये फॅट जमा होऊ लागतं. याने लिव्हरमध्ये सूज, जखमा किंवा लिव्हर फेलची शक्यता वाढते. लठ्ठपणा किंवा अल्कोहोलचं अत्याधिक सेवन करणाऱ्यांमध्ये ही समस्या जास्त आढळते.

त्वचा, केस आणि नखं

प्रोटीनची कमतरता झाली तर याचा प्रभाव आपल्या त्वचेवर, केसांवर आणि नखांवरही स्पष्टपणे दिसू लागतो. प्रोटीनची कमतरता झाली तर त्वचा फाटू लागते. त्वचेवर लाल चट्टे किंवा डाग दिसू लागतात. केस कमजोर होऊन गळू लागतात. नखं पातळ होतात आणि त्यांचा आकार बदलू लागतो.

कमजोर स्नायू

स्नायू मजबूत बनवण्यात प्रोटीनची सर्वात मोठी भूमिका असते. शरीरात प्रोटीनची कमतरता झाली तर शरीर बॉडी फंक्शन आणि आवश्यक कोशिकांसाठी हाडांमधून प्रोटीन घेऊ लागतं. याने स्नायू कमजोर होण्यासोबतच हाडं फ्रॅक्चर होण्याचाही धोका असतो.

Web Title: 5 Dals With Highest Protein Content

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.