Lokmat Sakhi >Food > परफेक्ट जाळीदार मऊ हलका ढोकळा करण्यासाठी ४ टिप्स, ढोकळा कधीच बिघडू शकत नाही

परफेक्ट जाळीदार मऊ हलका ढोकळा करण्यासाठी ४ टिप्स, ढोकळा कधीच बिघडू शकत नाही

4 tips to make perfect soft and fluffy Dhokla, Dhokla can never go wrong with these tips : ढोकळा करताना लक्षात ठेवा या टिप्स. ढोकळा होईल मस्त मऊ.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2025 18:13 IST2025-08-19T18:12:42+5:302025-08-19T18:13:23+5:30

4 tips to make perfect soft and fluffy Dhokla, Dhokla can never go wrong with these tips : ढोकळा करताना लक्षात ठेवा या टिप्स. ढोकळा होईल मस्त मऊ.

4 tips to make perfect soft and fluffy Dhokla, Dhokla can never go wrong with these tips | परफेक्ट जाळीदार मऊ हलका ढोकळा करण्यासाठी ४ टिप्स, ढोकळा कधीच बिघडू शकत नाही

परफेक्ट जाळीदार मऊ हलका ढोकळा करण्यासाठी ४ टिप्स, ढोकळा कधीच बिघडू शकत नाही

ढोकळा हा नुसता नाश्त्यालाच नाही तर कधीही खाण्याला छान असा पदार्थ आहे. हलका, फुललेला , मऊ चवीला अगदी मस्त ढोकळा आणि तिखट तललेली मिरची एक नंबर कॉम्बिनेशन आहे. (4 tips to make perfect soft and fluffy Dhokla, Dhokla can never go wrong with these tips )ढोकळा कसा तोंडात विरघळला पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतं. पण ढोकळा करताना अनेकदा तो फसतो. अगदीच जाड होतो तसेच घट्ट किंवा पिठाच्या गोळ्यासारखा होतो. आतून कच्चा राहतो त्यामुळे खाताना नुसते पीठ लागते. ढोकळा करताना हे टाळायचं असेल तर काही साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. ढोकळा अगदी मस्त होतो.

१. पिठाची तयारी योग्यच करायला हवी. बेसन किंवा रवा वापरत असाल तर तो बारीक चाळून घ्या म्हणजे त्यात गुठळ्या राहणार नाहीत. ढोकळ्याला मऊपणा आणण्यासाठी पिठामध्ये थोडं दही घालून पाच-दहा मिनिटं झाकून ठेवणं महत्वाचं आहे. दह्याची आंबटसर चव फुलण्यास मदत करते. पाणी घालताना जास्त पातळ किंवा खूप घट्ट होऊ नये याची काळजी घ्या. पीठ मस्त ढवळून घ्यायचे. त्यात थोडा सोडा घालायचा. किंवा इनो घाला. 

२.ढोकळा फुलण्यासाठी इनो किंवा खाण्याचा सोडा घालताच पीठ वाफवायला ठेवा.. जास्त वेळ ठेवलं तर पीठ बसून जातं आणि ढोकळा घट्ट होतो. इनो टाकल्यानंतर हलक्या हाताने दोन तीनदा ढवळा आणि लगेच साच्यात ओता. साचा आधी तेल लावून तयार ठेवावा म्हणजे पीठ चिकटत नाही. सोडा घालून ठेवल्यामुळे ढोकळा फसतो.  

३. वाफवताना मध्यम आचेवरच ठेवा. गॅस जास्त मोठा ठेवला तर ढोकळा वरुन शिजला तरी आतून कच्चा राहतो. आणि मंद आचेवर ठेवला तर ओलसर आणि मस्त होतो. साधारण पंधरा ते वीस मिनिटांत ढोकळा छान तयार होतो. शिजला की नाही हे बघण्यासाठी टूथपिक किंवा सुरी घालून पाहा, ती कोरडी बाहेर आली की ढोकळा शिजला असं समजावं.

४. वाफवून झाल्यावर लगेच झाकण उघडू नका. थोडा वेळ तसेच ठेवले तरढोकळ्याला हवा लागून तो अजून हलका होतो. कापताना सुरीला तेल लावा म्हणजे तुकडे छान कापले जातात. नंतर फोडणी करताना तेल जरा गरम करून त्यात मोहरी, कडीपत्ता, हिरवी मिरची आणि साखरेची चिमटी घाला म्हणजे ढोकळा मस्त होतो. 
 

Web Title: 4 tips to make perfect soft and fluffy Dhokla, Dhokla can never go wrong with these tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.