Lokmat Sakhi >Food > ब्लॅक टी आणि लेमन टी करण्यासाठी २ स्पेशल टिप्स- दुधाचा चहा विसराल इतकी भारी चव

ब्लॅक टी आणि लेमन टी करण्यासाठी २ स्पेशल टिप्स- दुधाचा चहा विसराल इतकी भारी चव

2 special tips for making black tea and lemon tea - a taste so strong that you'll forget about milk tea : कोरा चहा करायची मस्त सोपी रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2025 17:05 IST2025-09-18T17:04:06+5:302025-09-18T17:05:32+5:30

2 special tips for making black tea and lemon tea - a taste so strong that you'll forget about milk tea : कोरा चहा करायची मस्त सोपी रेसिपी.

2 special tips for making black tea and lemon tea - a taste so strong that you'll forget about milk tea | ब्लॅक टी आणि लेमन टी करण्यासाठी २ स्पेशल टिप्स- दुधाचा चहा विसराल इतकी भारी चव

ब्लॅक टी आणि लेमन टी करण्यासाठी २ स्पेशल टिप्स- दुधाचा चहा विसराल इतकी भारी चव

चहाला व्यसनच समजले जाते. ज्यांना चहा प्यायची सवय असते. त्यांना वेळेवर चहा लागतोच. ते चहाशिवाय नाही राहू शकत. मात्र चहा पिणे आरोग्यासाठी फार चांगले नाही. तरी चहा प्यायची तलप चहाप्रेमींना येतेच. (2 special tips for making black tea and lemon tea - a taste so strong that you'll forget about milk tea)शहरात जसा चहा, कॉफी, उकाळा मोठ्या प्रमाणावर प्यायला जातो, तसाच गावाकडे कोरा चहा प्यायची पद्धत आहे. तसेच कालापानी म्हणजे लिंबू चहा प्यायला लोकांना जास्त आवडते. हे चहाचे प्रकार पचायला जास्त हलके असतात. तसेच चवही छान असते. लिंबाचा चहा दुधाच्या चहापेक्षा कमी पित्तकारक असतो. त्यामुळे असे चहा पिणे पचनासाठी जास्त चांगले. बऱ्याच जणांचा लिंबू चहा आणि कोरा चहा चांगलाच फसतो. कारण त्यांची तो तयार करण्याची पद्धत जरा चुकते. तुम्ही केलेला कोरा चहाही जर कडू होत असेल तर पाहा कसा करायला हवा आणि काय चुकते. 

लेमन टी करताना तो जास्त कडू होऊ नये यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. जसे की  गरम पाण्यात चहा पूड उकळून घ्यायची. त्यात साखर घालायची. मात्र चहा जास्त उकळायचा नाही अगदी कमी उकळायचा. त्यात आलं घाला. आल्यामुळे लिंबाचा चहा एकदम फक्कड लागतो. साखरेऐवजी मध घालू शकता. त्याची चवही छान लागते. लिंबाचा रस उकळत्या पाण्यात न घालता गाळलेल्या चहातच घाला. त्यामुळे जीवनसत्त्व 'सी' टिकून राहते. लिंबू चहा पचन सुधारतो, फ्रेश ठेवतो, शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकतो आणि ऊर्जाही देतो. कोरा चहा आणि लिंबू चहा दुधाच्या चहापेक्षा हलके असल्यामुळे पचायला जास्त सोपे असतात. आम्लपित्त किंवा गॅसेसचा त्रास कमी होतो.

कोरा चहा करताना अनेक जण तो दुधाचा चहा जसा करतात तसाच करतात. त्यामुळे तो चहा एकदम बेचव लागतो. कोरा चहा करताना पाणी उकळायचे. आलं वगैरे जे आवडते ते घालायचे. साखर घालायची. सारे उकळल्यावर गॅस मंद आचेवर ठेवा आणि अगदी थोडा चहा पूड घाला. अगदी कमी चहा उकळवा आणि गॅस बंद करा. जास्त उकळल्यामुळे कोरा चहा एकदम कडू होतो. दोन्ही चहांमध्ये आले, तुळस, मध यांसारखे घटक घातल्यास आरोग्यासाठी फायदे अधिक मिळतात.

Web Title: 2 special tips for making black tea and lemon tea - a taste so strong that you'll forget about milk tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.