lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > आलिया-करीनासारखी फिगर हवी? ५ आसनांनी करा नव्या वर्षात व्यायामाची सुरुवात, राहाल फिट

आलिया-करीनासारखी फिगर हवी? ५ आसनांनी करा नव्या वर्षात व्यायामाची सुरुवात, राहाल फिट

Yoga Poses to start fitness journey in new year by Anshuka parwani : फिटनेसतज्ज्ञ अंशुका परवानी सांगतात १० मिनीटांत होणारे ५ महत्त्वाचे व्यायामप्रकार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2024 05:27 PM2024-01-03T17:27:08+5:302024-01-05T15:46:16+5:30

Yoga Poses to start fitness journey in new year by Anshuka parwani : फिटनेसतज्ज्ञ अंशुका परवानी सांगतात १० मिनीटांत होणारे ५ महत्त्वाचे व्यायामप्रकार...

Yoga Poses to start fitness journey in new year by Anshuka parwani : Want a figure like Alia-Kareena? Start exercise in the new year with 5 asanas, you will stay fit | आलिया-करीनासारखी फिगर हवी? ५ आसनांनी करा नव्या वर्षात व्यायामाची सुरुवात, राहाल फिट

आलिया-करीनासारखी फिगर हवी? ५ आसनांनी करा नव्या वर्षात व्यायामाची सुरुवात, राहाल फिट

नवीन वर्ष सुरू होऊन फक्त ३ दिवसच झाले आहेत. अनेकांनी येत्या वर्षात व्यायाम करायचा, फिट राहायचं, वजन कमी करायचं असे काही ना काही संकल्प नक्कीच केले असतील. हे संकल्प दिर्घकाळ टिकवायचे असतील तर खूप मोठ्या गोष्टी न ठरवता लहान गोष्टीच ठरवायला हव्यात. फिट राहण्यासाठी व्यायामाला पर्याय नाही. पण फिटनेससोबत आपण फिट दिसलो पाहिजे असेही आपल्याला साहजिकच वाटते. अनेकींना आपली फिगर आलिया भट आणि करीना कपूरसारखी असावी असं प्रत्येक तरुणीला वाटतं. पण त्यांच्या सौंदर्यामागे त्या करत असलेला व्यायाम, आहार अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो हे विसरुन चालणार नाही (Yoga Poses to start fitness journey in new year by Anshuka parwani). 

या दोघींची फिटनेस ट्रेनर असलेली अंशुका परवानी सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव्ह असते. आपल्या चाहत्यांना ती कायम काही ना काही टिप्स देऊन व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहन देत असते. नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या निमित्ताने आताही अंशुकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने योगासनांना किंवा व्यायामाची सुरुवात करताना कोणती ५ बेसिक आसनं करायला हवात याविषयी सांगितले आहे. विशेष म्हणजे या आसनांची नावं सांगत तिने स्वत: ही आसनं करुनही दाखवली आहेत. त्यामुळे तुम्ही नवीन वर्षात व्यायाम करण्याचा विचार करत असाल तर दिवसातला १० मिनीटे वेळ काढून ही आसनं नक्की करु शकता. त्याचा तुम्हाला फिटनेससाठी नक्कीच फायदा होईल. ही आसनं कोणती ते पाहूया...

१. ताडासन 

सायटीकाचा त्रास कमी करण्यास, शरीराची लवचिकता आणि बॅलन्स सुधारण्यास या आसनाची चांगली मदत होते.     शरीराची ठेवण सुधारण्यासाठी तसेच मांड्या, कंबरेचा मागचा भाग आणि पायाचे स्नायू बळकट होण्यासाठी उत्तम आसन असते. 

२. वृक्षासन 

पाय, खांदे आणि पाठ यांचे स्नायू बळकट करण्यासाठी आणि या स्नायूंना ताण पडावा यासाठी हे आसन अतिशय फायदेशीर असते. शरीराचा तोल राखण्यासाठी आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी हे आसन अतिशय छान ठरते. 

३. मार्जारीआसन

पाठीचा मणका आणि मानेचे स्नायू बळकट करणारे हे आसन आवर्जून करायला हवे. ओटीपोटात असणाऱ्या अवयवांना उत्तेजित करुन त्यातील समन्वय राखण्यासाठी फायदेशीर ठरतात.

४. बद्धकोनासन 

मांडीचे आतले स्नायू बळकट होण्यासाठी आणि कंबरेच्या आजुबाजीच्या भागाला ताण पडण्यासाठी आसन उपयुक्त ठरते. पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी आणि मासिक पाळीतील त्रास कमी होण्यास फायदेशीर.

५. भुजंगासन

दिसायला अतिशय सोपे दिसणारे हे आसन नियमित केल्यास शरीर रचना सुधारण्यास मदत होते. रक्तप्रवाह सुधारण्यास आणि फुफ्फुसांची ताकद वाढण्यास या आसनाचा चांगला उपयोग होतो. 

Web Title: Yoga Poses to start fitness journey in new year by Anshuka parwani : Want a figure like Alia-Kareena? Start exercise in the new year with 5 asanas, you will stay fit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.