Lokmat Sakhi >Fitness > सतत होणाऱ्या कंबरदुखीनं जीव नको केलाय? औषधापेक्षाही वेगानं दुखणं कमी करणारे ५ उपाय

सतत होणाऱ्या कंबरदुखीनं जीव नको केलाय? औषधापेक्षाही वेगानं दुखणं कमी करणारे ५ उपाय

Back Pain Home Remedies : अशात औषधं खाण्याऐवजी ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यांनी तुम्हाला लगेच आराम मिळेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 15:38 IST2025-03-04T14:36:50+5:302025-03-04T15:38:31+5:30

Back Pain Home Remedies : अशात औषधं खाण्याऐवजी ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यांनी तुम्हाला लगेच आराम मिळेल.

Women's can use these home remedies to get rid off from lower back pain fast at home | सतत होणाऱ्या कंबरदुखीनं जीव नको केलाय? औषधापेक्षाही वेगानं दुखणं कमी करणारे ५ उपाय

सतत होणाऱ्या कंबरदुखीनं जीव नको केलाय? औषधापेक्षाही वेगानं दुखणं कमी करणारे ५ उपाय

Back Pain Home Remedies : सकाळी झोपेतून उठल्यापासून घरातील वेगवेगळी काम करून, ऑफिसमध्ये दिवसभर एका जागी बसून काम करून अनेक महिला कंबरदुखीनं वैतागलेल्या असतात. एका रिसर्चनुसार, कंबरदुखीची समस्या पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये जास्त बघायला मिळते. अनेकदा शरीरात कमजोरी आणि पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे कमी वयातच कंबरदुखीची समस्या होऊ लागते. अशात औषधं खाण्याऐवजी ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यांनी तुम्हाला लगेच आराम मिळेल.

कंबरदुखीवर घरगुती उपाय

हीटिंग पॅड

कंबरदुखीची समस्या दूर करण्याचा एक बेस्ट उपाय म्हणजे हीटिंग पॅड आहे. यानं पाठ आणि कंबरदुखी दूर होऊन लगेच आराम मिळतो. शेकल्यामुळं ब्लड सर्कुलेशनही चांगलं होतं. ज्यामुळे ऑक्सीजन आणि इतर पोषक तत्व कंबरेच्या स्नायूंपर्यंत सहज पोहोचतात. ज्यामुळे वेदना कमी होतात.

गरम पाण्यानं आंघोळ

ज्या लोकांना नेहमीच कंबरदुखीची समस्या असती किंवा जॉइंट्समध्ये वेदना होत असेल तर त्यांनी गरम पाण्यानं आंघोळ करावी. या पाण्यात थोडं मीठ टाकलं तर अधिक फायदा मिळेल. असं केल्यास स्नायूंमधील आखडलेपणा आणि वेदना कमी होतील.

आइस पॅक लावा

कंबरदुखीची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही गरम ऐवजी थंड बर्फानंही शेक घेऊ शकता. आइस पॅकचा वापर करून स्नायूंमधील वेदना, कंबरदुखी आणि जखमही लवकर बरी होते. जळजळ, सूज आणि वेदनेत यानं आराम मिळतो.

उशी घेऊन झोपा

पाठीखाली उशी ठेवून सरळ झोपल्यासही तुम्हाला कंबरदुखी करण्यास मदत मिळेल. तसेच नंतर उशी पायांखालीही ठेवू शकता. या उपायानं तुम्हाला लगेच आराम मिळेल.

एक्सरसाईज करा

कंबरदुखीची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही सोप्या एक्सरसाईज करू शकता. यात कंबर गोल फिरवणे, उभे राहून हाताची बोटं पायाच्या बोटांना चिटकवणे यांचा समावेश करू शकता.

Web Title: Women's can use these home remedies to get rid off from lower back pain fast at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.