आपल्यापैकी काहीजणींचे डेली रुटीन हे घरकाम, कुटुंबाची जबाबदारी, आणि इतर अनेक गोष्टींमुळे अगदी बिझी होऊन जाते. या सगळ्या पसाऱ्यात बऱ्याच महिलांना स्वतःसाठी वेळ काढणं शक्य होतेच असे नाही. विशेषतः शारीरिक व्यायामासाठी वेळ मिळणं हे तर अनेक महिलांसाठी अवघडच झालं आहे. कितीही ठरवून, प्लॅनिंग करून देखील दिवसभरात वेगवेगळ्या कामांच्या जबाबदाऱ्यांतून एक्सरसाइजसाठी वेळ काढणं फारसे शक्य होत नाही. असे असले तरी (Women Should Do These 3 Types Of Walk Daily To Stay Fit & Lose Weight) निरोगी आणि ॲक्टिव्ह राहण्यासाठी व्यायाम हा तितकाच महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत, स्वतःकडे लक्ष देण्यासाठी किंवा आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळ कमी असला तरी देखील 'चालणं' हा एक साधासोपा आणि फायदेशीर असा व्यायाम आहे(What is the best type of walking to lose weight For Women).
'चालणं' ही एक नैसर्गिक आणि कोणतेही उपकरण न लागणारी व्यायामाची पद्धत आहे, जे सहजपणे आपण आपल्या डेली रुटीनमध्ये फॉलो करु शकतो. 'चालणं' ही एक अशी क्रिया आहे जी सहज, नैसर्गिक आणि कोणत्याही वयात, कोणत्याही वेळेला करता येते. योगा एक्सपर्ट नताशा कपूर यांनी 'HerZindagi' दिलेल्या मुलाखतीनुसार महिलांचे आरोग्य निरोगी आणि फिट राहण्यासाठी कोणत्या ३ पद्धतींनी चालणे फायदेशीर ठरू शकते, या विषयावर अधिक माहिती सांगितली आहे.
महिलांनी कोणत्या ३ खास पद्धतीने वॉकिंग करणे गरजेचे...
१. नॉर्मल वॉकिंग :- योगा एक्सपर्ट नताशा कपूर यांच्यामते, महिलांनी दररोज किमान १००० पावलं चालणं आवश्यक आहे. सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री दिवसांतील कोणत्याही वेळेस चालण्यासाठी महिलांनी थोडा वेळ नक्की काढावा. दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर थोडंसं चालणं देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते, हृदय निरोगी राहतं आणि शरीरही सतत ॲक्टिव्ह राहतं. दररोज चालण्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. पचनक्रिया सुधारते आणि झोपही चांगली लागते. त्याचबरोबर प्रतिकारशक्ती वाढते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज दिसू लागते.
२. मलासनात बसून वॉकिंग करणे :- सर्वातआधी योगा मॅटवर सरळ उभे राहा. पाय सरळ ठेवत पोट आतमध्ये घ्या. खांदे ताणून घ्या आणि दीर्घ श्वास घ्या. हात जोडून नमस्कार करा. श्वास सोडत गुडघे दुमडून खाली बसा. पायांच्या जांघेमध्ये ताण येईल अशा पद्धतीने दोन्ही पाय बाहेरच्या दिशेने ताणून घ्यावेत. मग याच स्थितीत बसून हळुहळु पावलं टाकत चालावे. ह्याच पोझिशनमध्ये एक पाऊल पुढे आणि मग दुसरं पाऊल पुढे टाका. अशा प्रकारे हळूहळू चालण्याचा प्रयत्न करा.
सेलिब्रिटी फिटनेस गुरु मिकी मेहता सांगतात, वेटलॉससाठी ७-७-७ चा मंत्र! म्हणून तर ते दिसतात फिट...
३. ब्रिस्क वॉकिंग करा :- ब्रिस्क वॉकिंग म्हणजेच जोरात चालणे, या पद्धतीने वॉकिंग आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. जर तुम्ही दररोज फक्त २० मिनिटं जोरात चालत असाल, तर त्यामुळे शरीरातील कॅलरीज झपाट्याने बर्न होतात. ब्रिस्क वॉकमध्ये तुम्हाला थोडं वेगात चालावं लागतं, जेणेकरून शरीराच्या प्रत्येक भागावर ताण पडतो. हे करत असताना स्पोर्ट्स शूज घालणं अत्यंत गरजेचं आहे आणि चालण्याचा वेग हळूहळू वाढवावा. ब्रिस्क वॉकिंग केल्याने वेटलॉस करण्यास मदत होते, तणाव कमी होतो, रक्तदाब नियंत्रणात राहतो, हाडं मजबूत होतात आणि पाठदुखीपासून आराम मिळतो.
वजन कमी करण्यासाठी 'असं' प्या पाणी, वजन होईल झरझर कमी - तब्येत राहील ठणठणीत...
जर महिला दररोज या ३ प्रकारच्या चालण्याचा सराव करतील, तर त्यांना आरोग्याचे अनेक फायदे मिळू शकतात आणि वजनही नियंत्रणात येऊ शकतं. रोजच्या कामातून स्वतःसाठी वेळ मिळत नसेल तरी थोडा वेळ काढून त्याचा स्वतःसाठी सदुपयोग करा. जर एक्सरसाइज करण्यास पुरेसा वेळ नसेल तर किमान या ३ पद्धतीने चालण्याचा व्यायाम तर प्रत्येकीने केलाच पाहिजे.