सध्या थंडीचा कडाका सगळीकडेच खूप वाढला आहे. दिवसभर तर गार वारा आणि थंड वातावरण असतेच, पण सकाळच्या वेळी आणि रात्री तर गारठा खूपच वाढतो. काही जणांना तो अजिबातच सहन हाेत नाही. त्यासाठी ते दारं- खिडक्या लावून घेतात. अंगावर शाल पांघरतात, स्वेटर घालतात. पायमोजे आणि पायातल्या चपला तर असतातच. पण तरीही त्यांच्या अंगातली थंडी काही कमी होत नाही. अशा लोकांसाठी सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी एक सोपा उपाय सांगितला आहे.. यामध्ये त्यांनी एक योगमुद्रा करायला सांगितली असून विशिष्ट पद्धतीने श्वासोच्छवास करण्याचा सल्ला दिला आहे. बघूया तो उपाय नेमका कोणता (pranayam or yogmudra that hels to keep your body warm from inside in winter)
अंगातली थंडी कमी करण्यासाठी योगमुद्रा
यासाठी अंशुका सांगतात की सगळ्यात आधी ताठ बसा. पायाची मांडी घाला. यानंतर डाव्या हाताची तर्जनी आणि अंगठा यांची टोके एकमेकांना जोडा आणि तो हात गुडघ्यावर ठेवा.
थंडीमुळे हात कोरडे पडले, सुरकुतल्यासारखे दिसू लागले? 'हे' घरगुती स्क्रब वापरा, हात होतील मुलायम
आता दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करा आणि उजव्या नाकपुडीने श्वास घ्या. आता उजव्या हाताच्या तर्जनीने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. असं साधारण १५ ते २० मिनिटे करा. तुम्हाला छान उबदार वाटेल...
हे उपायही करून पाहा..
थंडीमध्ये तुमचा आहार खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आहाराकडेही लक्ष द्या. शरीर आतून उबदार ठेवण्यासाठी कित्येक पदार्थही खूप उपयुक्त ठरतात.
बाजरीच्या खमंग भाताची रेसिपी! हिवाळ्यातला पारंपरिक मेन्यू- पचायला सोपा, चविष्ट आणि पौष्टिक..
जसे की या दिवसात बाजरी, तीळ, गूळ असे उष्ण पदार्थ जास्त प्रमाणात खायला हवे. या दिवसांत केले जाणारे डिंकाचे लाडू, मेथ्याचे लाडू, सुकामेव्याचे लाडूही नियमितपणे खा. तसेच हिवाळ्याच्या दिवसांत सुकामेवा खाण्यावरही भर द्या. यामुळे शरीराला उर्जा तर मिळेलच पण शरीर उबदार राहण्यासही मदत होईल.
