वजन संतुलित ठेवण्यासाठी, पचन चांगले राहण्यासाठी आणि शरीराला स्वच्छ, नैसर्गिक पोषण देण्यासाठी आहार हा घटक फार महत्त्वाचा असतो. जिभेचे चोचले पुरवायला हवेतच मात्र संतुलन राखणे गरजेचे असते. रोजच्या आहारात जेवण तयार करताना आपण अनेक कृती करतो. भाजणे, परतणे, शिजवणे, तळणे आणि वाफवणे. त्यातील वाफवण्याची क्रिया फार क्वचित केली जाते. (Why does Virat Kohli eat steamed vegetables? Check out his diet tips to stay fit like him)पण खरे तर वाफवलेले पदार्थ फार पौष्टिक आणि वजन कमी करण्यासाठी उत्तम असतात. वाफवलेले पदार्थ हा अतिशय सुरक्षित आणि परिणामकारक पर्याय मानला जातो. तळलेल्या किंवा जास्त तेलकट पदार्थांच्या तुलनेत वाफेवर शिजवलेल्या अन्नामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि नैसर्गिक चव जास्त प्रमाणात टिकून राहते. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारे पोषण कमी कॅलरीजमध्ये मिळते आणि वजन वाढण्याचा धोका कमी होतो.
वाफवलेले धान्य, भाज्या किंवा प्रोटीनयुक्त पदार्थ पोटासाठी हलके असतात. ते सहज पचतात आणि शरीरावर ताण न आणता दिवसभर ऊर्जा देतात. स्टीमिंगमध्ये तेलाचा वापर जवळजवळ नसतोच. त्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते, पोटफुगी, अॅसिडिटी किंवा जडपणा यांसारखे त्रासही कमी होतात. याच पद्धतीने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते कारण वाफवलेल्या अन्नात कृत्रिम मसाले, रंग किंवा जास्त तडका नसतो.
खेळाडूंचा आहार हलका, पौष्टिक आणि शिस्तबद्ध असतोच. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याचाच उत्तम उदाहरण आहे. फिटनेसला प्राधान्य देताना तो साधे अन्न निवडतो. त्याला वाफवलेले पदार्थ विशेष आवडतात, कारण अशा अन्नातून शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि खेळताना लागणारी ताकद व सहनशक्ती सुधारते. विराट म्हणतो तो भाज्या वाफवून त्यात थोडे मीठ आणि मिरपूड घालून सॅलेड खातो. दिवसातून तीनदा असे खायला त्याला आवडते.
स्टीमिंगचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची सुरक्षितता. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही हे अन्न सहज पचते. वाफेवर शिजवलेल्या भाज्या त्वचेचे आरोग्य सुधारतात, रक्तातील विषारी द्रव्ये कमी होतात, पचनशक्ती सुधारते आणि शरीराला ताजेपणा मिळतो. जगभरात ‘क्लीन ईटिंग’चा जो ट्रेंड वाढला आहे, त्यात वाफवलेले अन्न हा सर्वात सोपा आणि परिणामकारक पर्याय ठरतो आहे.
Web Summary : Virat Kohli favors steamed vegetables for fitness, aiding digestion and providing essential nutrients with fewer calories. Steaming retains vitamins and minerals, supporting energy, reducing cholesterol, and promoting detoxification. It's a safe, light, and nutritious choice for all ages, enhancing skin and overall health.
Web Summary : विराट कोहली फिटनेस के लिए उबली सब्जियां पसंद करते हैं, जो पाचन में मदद करती हैं और कम कैलोरी में आवश्यक पोषक तत्व प्रदान करती हैं। उबलने से विटामिन और खनिज बरकरार रहते हैं, ऊर्जा मिलती है, कोलेस्ट्रॉल कम होता है और डिटॉक्सिफिकेशन को बढ़ावा मिलता है। यह सभी उम्र के लिए सुरक्षित, हल्का और पौष्टिक विकल्प है, जो त्वचा और समग्र स्वास्थ्य को बढ़ाता है।