Join us  

भरपूर झोप काढली तरी थकवा जातच नाही? थकल्यासारखं वाटण्याची 5 कारणं आणि त्यावरचे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2022 4:59 PM

Health Tips: रात्रभर चांगली ७ ते ८ तासांची गाढ, शांत झोप घेऊनही थकवा (tiredness after sleep) जातच नसेल तर तुमच्या रुटीनमध्ये नक्कीच काहीतरी चुकतंय...

ठळक मुद्देशरीरात काही अत्यावश्यक घटकांची कमतरता असल्याने आणि रुटीनमध्ये काही गोष्टी सातत्याने चुकत असल्यामुळे हा थकवा तुमची पाठ सोडत नाही...

आपल्या सभोवती आपण अनेक जण पाहतो किंवा आपणही बऱ्याचदा तसा अनुभव घेतो की खूप छान, शांत आणि भरपूर झोपलं तरी सकाळी उठल्यानंतर काही तासांतच पुन्हा झोपावंसं वाटतं. किंवा मग सकाळी झोपून उठल्यावरही फ्रेश, उत्साही वाटत नाही..(not feeling fresh after sound sleep?) एक प्रकारचा थकवा सतत जाणवत राहतो... यामुळे मग कामातही लक्ष लागत नाही. असं जर होत असेल तर त्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नका. तुमच्या शरीरात काही अत्यावश्यक घटकांची कमतरता असल्याने आणि तुमच्या रुटीनमध्ये काही गोष्टी सातत्याने चुकत असल्यामुळे हा थकवा तुमची पाठ सोडत नाही, हे लक्षात घ्या. आहारात आणि रोजच्या रुटीनमध्ये (change your diet and routine) बदल करणे हाच त्यावरचा उत्तम उपाय ठरू शकतो. 

 

रोजच्या आहारात काही चुकतंय का?- आहाराचा आणि झोपेचा आणि त्यानंतर वाटणाऱ्या एनर्जीचा खूप जवळचा संबंध आहे. जर आहार योग्य आणि सात्विक असेल तर शांत झोप लागते आणि थकवा दूर होतो. उदाहरणार्थ एखाद्या सणाच्या दिवशी किंवा लग्नकार्यात आपण खूप मसालेदार, चमचमीत, तेलकट असं हेवी जेवतो. जेवण झाल्यानंतर डोळे लगेच जड होतात आणि झोप येऊ लागते. यानंतर झोप काढली तरी सुस्तपणा, अंगातला आळस गेला नसल्याचं जाणवतं.. असंही काहीसं तुमच्या बाबतीत रोज घडतं त्यामुळे मग झोप घेऊनही थकवा जात नाही. 

 

आहारात करून बघा काही बदल१. रात्रीच्या वेळी खूप जास्त फॅट्स असणारे पदार्थ खाणं टाळा. तेलकट पदार्थही रात्रीच्या वेळी खाणं टाळा.२. मसालेदार जेवण रात्रीच्या वेळी घेऊ नये. हे जेवण पचायला जड असतं. शिवाय अशा जेवणामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. त्याचाही झोपेवर वाईट परिणाम होतो. ३. रात्रीच्या वेळी कॉफी घेणं टाळा. कॉफीमध्ये असणारं कॅफेन शांत झोप न येण्यासाठी कारणीभूत ठरतं. चॉकलेट, आईस्क्रिमच्या काही फ्लेवरमध्येही कॅफिनचा अंश असतो. त्यामुळे ते पदार्थही रात्रीच्यावेळी खाणं टाळा.४. रात्रीच्या वेळी ड्रिंक्स घेण्याची सवय अनेक जणांना असते. आता महिलाही याला अपवाद नाहीत. ही सवयही शांत आणि आरोग्यदायी झोपेसाठी घातक आहे.५. डाएटच्या नावाखाली डॉक्टरांचा सल्ला न घेता मनानेच आहारात काही बदल केला असेल तरी झोप घेऊनही थकवा जाणवू शकतो. 

 

रुटीनमध्येही करा बदल...थकवा घालविण्यासाठी आहारात बदल करणं तर गरजेचं आहेच, पण त्यासोबतच तुमच्या दैनंदिन रुटीनमध्येही बदल करणं आवश्यक आहे. म्हणूनच काही गोष्टी आवर्जून करा तर काही टाळा..१. झोपण्याआधी मोबाईल बघणे टाळा.२. खोलीत संपूर्ण अंधार करून झोपण्याचा प्रयत्न करा. कारण अंधार असेल तर शरीरात मेलॅटोनिन हा हार्मोन स्त्रवू लागतो आणि तो हार्मोन आपल्या झोपेला कंट्रोल करत असतो. शांत, आरोग्यदायी झोपेसाठी मेलॅटोनिन योग्य प्रमाणात असणं गरजेचं असतं. ३. तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पिता आहात की नाही ते एकदा तपासा.४. दररोज किमान १५ ते २० मिनिटे तरी व्यायाम करा किंवा घराबाहेर जाऊन वॉकिंग करा.५. डाएटमध्ये फळांचे प्रमाण वाढवा.  

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सआहार योजनाअन्ननाईटलाईफ