Hands and feet numb reason : अनेकदा सकाळी झोपेतून उठल्यावर असं जाणवतं की, एक हात सुन्न झाला आहे किंवा निर्जीव झाला आहे? असं थोड्या वेळासाठी जाणवत असेल तर सामान्य आहे. ही स्थिती तंत्रिका दबावामुळे होते. मात्र, अनेकदा याचं कारण शरीरात वाढत असलेल्या काही गंभीर आरोग्यासंबंधी समस्याही असू शकतात. झोपेतून उठल्यावर हातांमध्ये सुई टोचल्यासारखं वाटणे, हात-पाय सुन्न होत असेल तर तंत्रिकेसंबंधी समस्या असू शकते. अनेकदा तुम्ही अशा स्थितीत झोपतात, ज्यामुळे तंत्रिकांवर दबाव पडतो. झोपेत ब्लड फ्लो कमी झाल्या कारणानेही असं होऊ शकतं.
हात-पाय सुन्न होण्याची कारणं
कार्पल टनल सिंड्रोम
डायबिटीस
रूमेटायड संधिवात
मनगटात ट्यूमर किंवा सिस्ट
थायरॉइड ग्रंथी कमी सक्रीय असणं
हार्मोनमध्ये बदल
मोनोपॉज किंवा गर्भावस्था
एखादं इन्फेक्शन
व्हिटॅमिनची कमतरता
जास्त मद्यसेवन
एखादी जखम किंवा औषधांचं सेवन
कार्पल टनल सिंड्रोम काय आहे?
कार्पल टनल सिंड्रोम तेव्हा होतो जेव्हा मनगटातील एक तंत्रिका संकुचित होते किंवा दाबली जाते. यामुळे हात आणि बोटांमध्ये सुन्नपणा, झिणझिण्या आणि वेदना जाणवते. खासकरून अंगठे आणि बोटांमध्ये असं जाणवू लागतं. ही समस्या त्या लोकांमध्ये जास्त दिसते जे टायपिंग किंवा बोटांची चालवल्या जाणाऱ्या उपकरणांचा वापर करतात. जास्त काळ असं करणाऱ्या लोकांमध्ये तंत्रिकावर दबाव पडू लागतो.
आराम मिळवण्यासाठी व्यायाम
जर तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यावर ही समस्या जाणवत असेल तर काही वेळ व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. जसे की, सकाळी उठून वार्म-अप स्ट्रेचिंग करा. यात हाताचं मनगट गोल फिरवणे, खाली-वर करणे यांचा समावेश करता येईल. बोटं एकमेकांपासून दूर पसरवा, जवळ आणा आणि पुन्हा पसरवा. याने आराम मिळेल. अंगठे मागे खेचू शकता. अशा क्रिया करून हातांना आराम देऊ शकता.