आपण दिवसाची सुरूवात कशी करतो याचा परीणाम संपूर्ण दिवसात दिसून येतो. जर तुमची झोप पूर्ण झाली नसेल तर संपूर्ण दिवस कंटाळवाणा वाटू शकतो. सकाळी जर तुम्ही सकाळी योग्य प्रकारे नाश्ता केला तर दिवसभर एनर्जेटीक वाटतं. जर तुम्ही सकाळी योगा किंवा व्यायाम केला तर तुमचा मेंदू जास्त फोकस्ड राहतो याशिवाय तुम्ही एक्टिव्ह फिल करता.
सकाळी सकाळी तुम्हाला कोणतीही गुड न्यूज मिळाली तर तुमचा मूड दिवसभर चांगला राहतो. याबाबत युट्युबर सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी अधिक माहिती दिली आहे. सद्गुरू जग्गी वासुदेव नेहमीच आरोग्याबाबत महत्वाच्या टिप्स सोशल मीडिया युजर्स तसंच फॉलोअर्सशी शेअर करत असतात. रोज सकाळी एक खास पद्धत फॉलो करून तुम्ही उठू शकता. ज्यामुळे शरीराच्या एनर्जीवरही परिणाम होतो. याबाबत सविस्तर माहिती समजून घेऊ. (Which Side Is Good To Wake Up In The Morning Sadhguru Jaggi Vasudev Explains Correct Way To Wake Up)
सकाळी कोणत्या कुशीवर उठायचं?
एका संशोधनाचा हवाला देत सद्गुरू सांगतात की सकाळी उठताना नेहमी उजव्या कुशीवर उठायला हवं. असं म्हणतात की योगाच्या परंपरांमध्ये अनेक आसनांची सुरूवात उजव्या बाजूनं करण्याचा सल्ला दिला जातो. म्हणूनच सकाळची पहिली मुव्हमेंट उजवीकडे केल्यास शरीरावर अतिरिक्त दबाव येत नाही. दिवसाची सुरूवातही चांगली होते. शरीराचा डावा भाग उजव्या भागाच्या तुलनेत अधिक कमकुवत असतो. म्हणून अतिरिक्त भार डाव्या बाजूला न देता उजव्या बाजूनं उठायला हवं.
झोपेतून उठल्यावर घाई करणं टाळा
अनेकदा उशिरा जाग आली की आपण वेळ वाचवण्यासाठी खूप घाईघाईत तयारी करतो. सद्गुरू सांगतात की सकाळी झोपेतून उठल्यानंतर घाई करणं टाळा. सकाळी उठल्यानंतर मोबाईल वापरू नका किंवा धावपळ करू नका, काही वेळ बेडवर बसून मेडिटेट करा. आपल्या हात एकमेकांवर रगडून डोळ्यांवर चोळा मगच उठा. काहीवेळ बेडवरच मेडीटेशन करा. हात एकमेकांना रगडून नंतर डोळ्यांना लावा. असं केल्यानं तुमचं शरीर लगेच एक्टिव्ह होईल. असं केल्यानं दिवसाची सुरूवात चांगली होईल. पूर्ण दिवस तुम्ही स्वत:ला शांत आणि एक्टिव्ह फिल कराल.
