Join us

नेहमीच तरूण आणि फिट दिसायचंय? 30 वयानंतर रोज खा 'या' गोष्टी, लवकर येणार नाही म्हातारपण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 12:16 IST

Healthy Foods : तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात अशा काही गोष्टींचा समावेश करू शकता. ज्यांद्वारे तुम्ही अनेक वर्ष तरूण दिसू शकता. 

Healthy Foods : कितीही वय वाढलं तरी आपण तरूण दिसावं असं सगळ्यांना वाटत असतं. पण हे काही सोपं काम नाही. यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. फक्त एक्सरसाईज करून काम भागत नाही. वाढतं वय हे काही थांबवता येत नाही. पण वाढत्या वयाची प्रोसेस कमी नक्कीच करता येते. यासाठी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपल्या आहारात काही गोष्टी नियमित असायला हव्यात. तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात अशा काही गोष्टींचा समावेश करू शकता. ज्यांद्वारे तुम्ही अनेक वर्ष तरूण दिसू शकता. 

बरेच सेलिब्रिटी आपण बघत असतो जे 50 किंवा 55 वयानंतरही तरूण आणि फिट दिसतात. पण त्यासाठी त्यांना डाएटची खूप काळजी घ्यावी लागते. 30 वयानंतर महिलांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची खूप गरज पडते. कारण या काळादरम्यान शरीरात अनेक बदल होतात आणि वाढत्या वयानुसार शरीराचं मेटाबॉलिज्मही स्लो होतं. सोबतच शरीरात कोलेजनचं उत्पादनही कमी होतं. ज्याचा प्रभाव त्वचेवर दिसून येतो.

वाढत्या वयातही तरूण दिसायचं असेल आणि फिट रहायचं असेल तर 30 वयानंतर महिलांनी डाएटमध्ये कशाचा समावेश करावा याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही नेहमीच तरूण दिसाल.

फायबर

फायबर हे एक असं तत्व आहे जे तुम्हाला फिट ठेवण्यासाठी आणि तुमचं वजन कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट असतं. पोटासंबंधी अनेक समस्या जसे की, गॅस, अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता या समस्या दूर करण्यास मदत मिळते. इतकंच नाही तर फायबरनं ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहते, हृदय निरोगी राहतं आणि वजनही कमी होतं. इतकंच नाही तर वाढलेली कोलेस्टेरॉल लेव्हलही कमी होते. फायबर मिळवण्यासाठी तुम्ही शेंगा, वेगवेगळी फळं, हिरव्या पालेभाज्या, कडधान्य आणि ड्रायफ्रुट्स नियमित खाल्ले पाहिजेत.

ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड

ओमेगा 3 फॅटी अॅसिड शरीरासाठी खूप महत्वाचं असतं. यानं मेंदू, हृदय निरोगी राहतं, शरीरातील सूज कमी होते. अनेक शोधातून समोर आलं आहे की, जे लोक ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड घेतात त्यांना कोलोन कॅन्सरचा धोका 55 टक्के कमी असतो. ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड तुम्हाला ड्रायफ्रुट्स, बीया, प्लांट ऑइल, फोर्टिफाइड फूड्स जसे की, दही, ज्यूस ,दूध , सोया बेवरेज इत्यादीमधून मिळू शकतं.

व्हिटामिन सी

व्हिटामिन सी शरीरासाठी किती महत्वाचं आहे हे काही कुणाला वेगळं सांगायला नको. यानं शरीराची इम्यूनिटी वाढते. इतकंच नाही तर शरीराला कोलेजनचं उत्पादन अधिक करण्यास मदत करतं. जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं. आंबट फळांमधून व्हिटामिन सी तुम्हाला भरपूर मिळू शकतं. लिंबू, संत्री, शिमला मिरची, हिरवे मटार, पालक आणि इतरही पालेभाज्यांमधून तुम्हाला व्हिटामिन सी मिळू शकतं.

कॅल्शिअम

आजकालच्या खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, पोषक तत्वांची कमतरता यामुळे 30 वयानंतर हाडं कमजोर होण्यास सुरूवात होते. त्यामुळे 30 वयानंतर कॅल्शिअमच्या इनटेकवर अधिक लक्ष देण्याची गरज असते. त्यामुळे या वयात दूध, पनीर असे डेअरी प्रोडक्ट्स, हिरव्या पालेभाज्या ब्रोकली, भेंडी, सोयाबीन, टोफू, नट्स, प्लांट बेस्ड ड्रिंक्स यांचा आहारात समावेश करावा.

आयर्न

आयर्नची कमतरता झाल्यावर एनीमियाची समस्या होते. महिलांमध्ये ही समस्या अधिक बघायला मिळते. मासिक पाळी आणि प्रेग्नेंसी दरम्यान रक्ताची कमतरता अधिक होते. अशात आयर्न असलेल्या फूड्सचा आहारात समावेश करावा. हे तुम्हाला पालक, शेंगा, भोपळ्याच्या बीया, ब्रोकली, टोफू, मनुके, खजूर, अंजीर, टोमॅटो, बदाम यातून अधिक मिळेल.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्स