Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fitness > ना झिरो फिगर, ना सिक्स पॅक्स! फिट राहण्यासाठी इतके सेकंद 'एका पायावर' उभे राहून दाखवा; बघा तुम्हाला जमते का?

ना झिरो फिगर, ना सिक्स पॅक्स! फिट राहण्यासाठी इतके सेकंद 'एका पायावर' उभे राहून दाखवा; बघा तुम्हाला जमते का?

what your balance says about your health : simple home test to check fitness and balance : एका पायावर उभं राहून 'असा' ओळखा तुमचा फिटनेस, रिसर्च सांगतो नेमकं काय करायचं....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2026 15:32 IST2026-04-02T15:28:11+5:302026-04-02T15:32:26+5:30

what your balance says about your health : simple home test to check fitness and balance : एका पायावर उभं राहून 'असा' ओळखा तुमचा फिटनेस, रिसर्च सांगतो नेमकं काय करायचं....

what your balance says about your health simple home test to check fitness and balance | ना झिरो फिगर, ना सिक्स पॅक्स! फिट राहण्यासाठी इतके सेकंद 'एका पायावर' उभे राहून दाखवा; बघा तुम्हाला जमते का?

ना झिरो फिगर, ना सिक्स पॅक्स! फिट राहण्यासाठी इतके सेकंद 'एका पायावर' उभे राहून दाखवा; बघा तुम्हाला जमते का?

जेव्हा आपण फिटनेस असा शब्द ऐकतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर सिक्स पॅक्स ॲब्स, झिरो फिगर अशा याच संकल्पनांना प्रमाण मानतो. अनेकदा आपण आपल्या बाह्य रूपावरून फिटनेस ठरवतो, मात्र खरा फिटनेस आपल्या शरीराच्या आत नेमकं काय चालू आहे यावर अवलंबून असतो. सध्याच्या धावपळीच्या आणि बिझी लाईफस्टाईलमध्ये आपण खरंच फिट आहोत की नाही, हे ओळखणं अनेकदा कठीण होतं. वजन काट्यावर दिसणारा आकडा किंवा डोळ्यांना  दिसणारा बॉडी शेप ही फिटनेसची खरी ओळख नसते. शरीराची ताकद, स्टॅमिना, लवचिकता आणि एकूणच आरोग्य या सगळ्या गोष्टींवरूनच आपली फिटनेस लेव्हल ठरते. पण यासाठी नेहमीच जिम किंवा महागड्या टेस्ट्सची गरज नसते(what your balance says about your health).

तुमच्या आरोग्याचे सर्वात अचूक मोजमाप म्हणजे तुमच्या शरीराचे संतुलन म्हणजेच बॅलन्स. मेयो क्लिनिक आणि इतर संशोधन संस्थांच्या अहवालातून एक गोष्ट समोर आली आहे की, एखादी (simple home test to check fitness and balance) व्यक्ती किती काळ एका पायावर उभी राहू शकते, हे तिच्या न्यूरोमस्कुलर एजिंग (नसा आणि स्नायूंच्या वृद्धत्वाचा वेग) चे सर्वात मोठे लक्षण आहे. जर तुम्ही तुमच्या वयानुसार ठरवलेल्या वेळेपर्यंत संतुलन राखू शकत नसाल, तर हे तुमच्या फिटनेसबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करू शकते आणि भविष्यात पडणे, दुखापत होणे किंवा इतर आरोग्य समस्यांचे संकेत असू शकते. संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, एका पायावर बॅलन्स राखण्याची तुमची क्षमता ही भविष्यातील आरोग्य समस्यांची पूर्वसूचना देऊ शकते. तुमच्या आरोग्याचा (one leg standing test benefits) हा 'बॅलन्स' नेमकं काय सांगतो, हे समजून घेणं देखील गरजेचं आहे. 

कोणत्या वयात किती वेळ उभे राहणे आवश्यक आहे?

मेयो क्लिनिक आणि इतर संशोधन संस्थांच्या अहवालातून एक गोष्ट समोर आली आहे की, वयानुसार काही निकष ठरवण्यात आले आहेत. जसे की,

१. जर तुमचे वय १८ ते ३९ वर्षांच्या दरम्यान असेल, तर तुम्ही कमीत कमी ४३ सेकंद एका पायावर उभे राहिले पाहिजे.

 २. या वयोगटातील व्यक्तींसाठी हा वेळ ४० सेकंद इतका आहे.

३. जसजसे वय वाढते तसतशी ही क्षमता कमी होऊ लागते, त्यामुळे ५० ते ५९ वर्षांच्या लोकांसाठी ३७ सेकंद, ६० ते ६९ वर्षांच्या लोकांसाठी ३० सेकंद आणि ७० ते ७९ वयोगटातील वृद्धांसाठी १८ ते १९ सेकंदाचा वेळ चांगला मानला जातो. जर एखादी व्यक्ती ८० वर्षांपेक्षा जास्त वयाची असेल आणि ती कोणत्याही आधाराशिवाय ५ सेकंद जरी उभी राहू शकली, तर तिची स्थिती समाधानकारक मानली जाते.

पदार्थ दिसतात हेल्दी पण किडनीसाठी विष! पौष्टिक डाएट फूडही ठरू शकते किडनी स्टोनचे कारण - पाहा ते पदार्थ कोणते ? 

हेल्दी लिव्हरसाठी खायलाच हव्यात 'या' ३ भाज्या! सर्वात स्वस्त आणि घरगुती उपाय - लिव्हर राहील सुपरहेल्दी... 

१० सेकंदांचा तो धोकादायक इशारा... 

'ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासामध्ये असे सांगण्यात आले आहे की, मध्यमवयीन किंवा वृद्ध अवस्थेत जे लोक कमीत कमी १० सेकंदांपर्यंत एका पायावर उभे राहू शकत नाहीत त्यांच्यात कमकुवत हाडे आणि अगदी हृदयाच्या आजारांशी संबंधित समस्या होण्याची अधिक जास्त शक्यता असते. 

कंबरेचे माप २८ व्हावे असे वाटते? पण जिमचं नको आणि डाएटिंगही नको, मग रोज १५ मिनिटं करा ३ उपाय...

रिसर्च रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार, संतुलन राखण्यासाठी आपला मेंदू, दृष्टी आणि शरीराच्या नसा यांच्यात एक उत्तम ताळमेळ असणं गरजेचं असतं. यामध्ये सुधारणा केली जाऊ शकते. दररोज एका पायावर उभे राहण्याचा सराव केल्याने शरीराचा बॅलेन्स सुधारण्यासोबतच, ही सवय तुमच्या मेंदूलाही ॲक्टिव्ह ठेवते.

Web Title : संतुलन परीक्षण: फिटनेस जाँचने के लिए एक पैर पर खड़े रहें!

Web Summary : फिटनेस केवल दिखावा नहीं है; संतुलन महत्वपूर्ण है। एक पैर पर खड़े होकर अपनी स्थिरता का परीक्षण करें। समय उम्र के अनुसार बदलता है; 10 सेकंड तक संतुलन बनाए रखने में असमर्थता संभावित स्वास्थ्य जोखिमों का संकेत देती है। अभ्यास से संतुलन और मस्तिष्क स्वास्थ्य में सुधार होता है।

Web Title : Balance Test: Stand on One Foot to Gauge Your Fitness!

Web Summary : Fitness isn't just about looks; balance is key. Test your stability by standing on one foot. Time varies by age; inability to balance for 10 seconds signals potential health risks. Practice improves balance and brain health.