Benefits Of Walking Yoga: वजन कमी करणं असो वा एकंदर आरोग्य चांगलं ठेवणं असो यासाठी पायी चालण्याला सगळ्यात बेस्ट मानलं जातं. कारण पायी चालल्यानं शरीरातील वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत मिळते. पायी चालण्यासोबतच फिटनेस चांगली ठेवण्यासाठी लोक योगाही नियमितपणे करतात. पण तुम्ही कधी पायी चालणं आणि योगाच्या कॉम्बिनेशनबाबत ऐकलं नसेल? त्याबाबतच आज आपण जाणून घेणार आहोत.
वॉकिंग योगा (Walking Yoga) असं या अॅक्टिविटीचं नाव असून जी तुम्ही चालता चालता करू शकता. महत्वाची बाब म्हणजे ही अॅक्टिविटी करण्यासाठी तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज नाही. फक्त पायी चालत असताना तुम्हाला तुमच्या पावलांवर आणि श्वासावर लक्ष केंद्रीत करायचं आहे. ही अॅक्टिविटी करून तुम्हाला पायी चालण्याचे आणि योगाचे दोन्ही फायदे एकत्र मिळतात.
काय आहे वॉकिंग योगा? (What Is Walking Yoga)
वॉकिंग योगा म्हणजे योगा आणि वॉकिंग म्हणजे पायी चालण्याचं एक खास कॉम्बिनेशन आहे. यात तुम्ही चालता चालता काही सोपी आसनं आणि ब्रीदिंग एक्सरसाईज करू शकता. ही अॅक्टिविटी करून शरीर तर फिट राहतं, सोबतच मेंदुही शांत आणि रिलॅक्स राहतो.
योगा एक्सपर्ट सांगतात की, वॉकिंग योगा एक असा अभ्यास आहे जो कधीही आणि कुठेही केला जाऊ शकतो. ज्यात तुम्हाला पायी चालताना प्रत्येक पावलासोबत श्वासावर फोकस करायचा आहे.
वेगळेपण काय?
- सामान्य योगा तुम्ही एका मॅटवर वेगवेगळी आसनं करून करता. पण वॉकिंग योगामध्ये तुम्हाला स्थिरता आणि श्वासांवर कंट्रोल करायचा आहे.
- वॉकिंग योगामध्ये तुम्हाला सगळं चालता चालता करायचं आहे. तुम्ही प्रत्येक पावलांसोबत श्वास जोडता. जसे की, चार पावलं चालल्यावर श्वास आत घ्या आणि पुढच्या चार पावलांव श्वास सोडा. ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करा.
- यानं शरीर अॅक्टिव राहतं आणि मेंदुलाही शांत करतं. वॉकिंग योगा तुम्ही ओपन स्पेस, गार्डन किंवा घराच्या कॉरिडोरमध्येही करू शकता.
कधी आणि कुठे करावा वॉकिंग योगा?
- वॉकिंग योगा करण्यासाठी सकाळची वेळ सगळ्यात बेस्ट मानली जाते. कारण यावेळी ताजी हवा असते आणि वातावरण शांत असतं.
- वॉकिंग योगा तुम्ही गार्डन किंवा पार्कमध्ये करू शकता.
- जर गार्डनमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही वॉकिंग योगा घराच्या छतावरही किंवा अंगणातही करू शकता.
- वॉकिंग योगा तुम्ही ऑफिसमधील ब्रेक दरम्यानही करू शकता. दर 2 ते 3 तासांनी तुम्ही 5 मिनिटं वॉकिंग योगा केला पाहिजे.
वॉकिंग योगा करण्याचे फायदे
वॉकिंग योगा ही एक वेगळी आणि परिपूर्ण अशी अॅक्टिविट आहे. ज्याद्वारे स्नायू मजबूत होतात, स्ट्रेस कमी होतो, मेंदुला आराम मिळतो, फोकस वाढतो, शरीराचं एकंदर आरोग्य चांगलं राहतं, हृदय निरोगी राहतं, फुप्फुसांचं आरोग्यही चांगलं राहतं