Health Tips : प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. दैनंदिन जीवनातील रोजची कामं त्या त्या वेळी केली गेली नाही तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. जेवण करणं हे आपल्या रोजच्या जीवनातील एक महत्वाचं काम आहे. योग्यवेळी जेवण केलं तर आरोग्य चांगलं राहतं. अनेकांना जेवणाची योग्य वेळच माहीत नसते किंवा माहीत असेल तर ती वेळ फॉलो केली जात नाही. रात्रीच्या जेवणात आणि झोपण्याच्या वेळ योग्य अंतर ठेवलं गेलं नाही तर आरोग्यासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आयुर्वेदानुसार, जेवण केल्यानंतर लगेच झोपण्याची सवय तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. अशात जेवणात आणि झोपण्याच्या वेळेत किती तासांचं अंतर असाव हे जाणून घेऊ.
जेवल्यावर किती तासांनी झोपावं?
हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, रात्री जेवण केल्यावर साधारण दोन ते तीन तासांनंतरच झोपायला हवं. त्याशिवाय जेवण केल्यावर लगेच बेडवर पडून राहणंही टाळलं पाहिजे. जेवण झाल्यावर थोडावेळ वॉक करणं गरजेचं असतं. निरोगी राहण्यासाठी जेवण केल्यावर साधारण १० ते १५ मिनिटं वॉक करणं गरजेचं आहे.
रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ
आयुर्वेदानुसार, सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत जेवणाची योग्य वेळ असते. रात्री ९ वाजतानंतर जेवण करू नये. जर तुम्ही रात्री ८ वाजता जेवण करत असाल तर १० ते ११ वाजता झोपायला हवं. तेव्हा तुम्ही ७ ते ८ तासांची झोप घेऊ शकता. हे रूटीन फॉलो केलं तर इम्यून सिस्टीमही मजबूत राहतं.
आरोग्याचं होईल नुकसान
जर तुम्ही रात्री उशीरा जेवण करत असाल किंवा जेवणानंतर लगेच झोपत असाल, तर यानं आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. रात्री जेवण केल्यावर लगेच झोपल्यानं गेट हेल्थ डॅमेज होऊ शकते आणि तुम्हाला पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जेवण केल्यानंतर लगेच झोपल्यानं तुमच्या स्लीप सायकलवरही वाईट प्रभाव पडतो. तसेच ही चूक नेहमीच केली तर पचन तंत्रही बिघडतं आणि वजनही वाढतं.