Lokmat Sakhi >Fitness > सकाळी की रात्री, कधी चालायला जाणं जास्त चांगलं? बघा तज्ज्ञ सांगतात ‘वॉक’ची योग्य वेळ

सकाळी की रात्री, कधी चालायला जाणं जास्त चांगलं? बघा तज्ज्ञ सांगतात ‘वॉक’ची योग्य वेळ

What Is The Best Time To Walk?: दररोज नियमिपणे वॉकिंग करण्याची सवय चांगलीच आहे. पण सकाळच्या वेळी चालायला जाणं जास्त चांगलं असतं की रात्रीच्या वेळी ते एकदा लक्षात घ्यायला हवं..(which is more beneficial- morning walk or evening walk?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2025 17:22 IST2025-04-09T17:02:23+5:302025-04-09T17:22:10+5:30

What Is The Best Time To Walk?: दररोज नियमिपणे वॉकिंग करण्याची सवय चांगलीच आहे. पण सकाळच्या वेळी चालायला जाणं जास्त चांगलं असतं की रात्रीच्या वेळी ते एकदा लक्षात घ्यायला हवं..(which is more beneficial- morning walk or evening walk?)

what is the best time to walk? which is more beneficial- morning walk or evening walk? health benefits of walking | सकाळी की रात्री, कधी चालायला जाणं जास्त चांगलं? बघा तज्ज्ञ सांगतात ‘वॉक’ची योग्य वेळ

सकाळी की रात्री, कधी चालायला जाणं जास्त चांगलं? बघा तज्ज्ञ सांगतात ‘वॉक’ची योग्य वेळ

Highlightsकोणत्या वेळी चालायला जाणे आरोग्यासाठी अधिक लाभदायी ठरू शकते?

दररोज कोणता ना कोणता शारिरीक व्यायाम झालाच पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञ नेहमीच देतात. पण प्रत्येकाचं रुटीन, कामाची गडबड यातून व्यायामासाठी वेळ काढणं अनेकांना अवघड जातं. त्यामुळे मग काही जण इच्छा असूनही व्यायाम करू शकत नाही. तर काही जण अतिशय सोयीचा असणारा 'चालणे' किंवा 'वॉकिंग' हा व्यायाम निवडतात. सकाळची किंवा रात्रीची एखादी वेळ ठरवतात आणि त्या वेळेला नियमितपणे ठराविक अंतरावर जाऊन वॉकिंग करून येतात (health benefits of walking). तुमच्याकडून इतर कोणताही व्यायाम होत नसेल तर चालायला जाणे कधीही चांगले (which is more beneficial- morning walk or evening walk?). पण त्यातही कोणत्या वेळी चालायला जाणे आरोग्यासाठी अधिक लाभदायी ठरू शकते, हे एकदा जाणून घ्यायला हवे.(What Is The Best Time To Walk?)

 

कोणत्या वेळी वॉकिंग करणं जास्त चांगलं?

वॉकिंगला जाण्याची योग्य वेळ कोणती याविषयीची माहिती नुकतीच टाईम्स ऑफ इंडियाने प्रकाशित केली असून त्यानुसार रात्रीपेक्षा सकाळच्या वेळी फिरायला जाणे अधिक चांगले असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार सकाळच्या वेळी सगळीकडे जास्त शांतता असते.

सनस्क्रिन लावल्यानंतर चेहरा जास्तच काळपट, तेलकट दिसतो? 'या' पद्धतीने लावा- चेहरा दिसेल फ्रेश 

अशा शांत वातावरणात फिरायला गेल्यास मन फ्रेश होते. शिवाय कोणताही गोंगाट, कलकलाट आजुबाजुला नसल्याने स्वत:शी संवाद साधायला वेळ मिळतो. यातून अनेक मानसिक लाभ होतात. मन शांत होते.

उन्हामुळे टॅनिंग होऊन हात खूप काळे पडले? २ सोपे घरगुती उपाय- हात होतील स्वच्छ, उजळ

सकाळच्या वेळी फिरायला जाण्याचा आणखी एक मुख्य फायदा म्हणजे सकाळी तुम्ही जेवढं लवकर घराबाहेर पडाल तेवढी शुद्ध हवा तुम्हाला मिळू शकते. हे तुमच्या फुफ्फुसांसाठी आणि हृदयासाठी जास्त चांगले ठरते. कारण सकाळी प्रदुषण कमी असल्याने हवा चांगली असते. रात्रीच्यावेळी मात्र सकाळच्या तुलनेत हवा बरीच प्रदुषित झालेली असते.

 

सकाळच्या कोवळ्या सुर्यप्रकाशात तुम्ही फिरायला जात असाल तर शुद्ध हवेसोबतच व्हिटॅमिन डी सुद्धा मिळते आणि हाडांच्या मजबुतीसाठी ते जास्त फायदेशीर ठरते. 

७ वर्षांनंतर कॅन्सरने ताहिरा कश्यपला पुन्हा गाठलं! भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली माझा सेकंड राऊंड...

सकाळी तुम्ही अगदी फ्रेश असता. त्यामुळे अधिक चांगल्याप्रकारे वॉकिंग करू शकता. दिवसाची सुरुवात जोमात झाल्याने पुढे सगळा दिवस चांगला जातो आणि चालून आल्यानंतर जी एनर्जी मिळते ती पुढे दिवसभर कामातला उत्साह टिकवू ठेवण्यास मदत करते. त्यामुळे शक्य असेल तर रात्रीऐवजी सकाळीच चालायला जा.. 

 

Web Title: what is the best time to walk? which is more beneficial- morning walk or evening walk? health benefits of walking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.