Join us

काय आहे पिलेट्स एक्सरसाईज ज्याची अनेक सेलिब्रिटींमध्ये आहे क्रेझ? जाणून घ्या फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 11:12 IST

Pilates Exercise Benefits : पिलेट्स एक्सरसाईजच्या माध्यमातून एकाचवेळी पूर्ण शरीराचा व्यायाम होतो. जर तुम्हाला वजन कमी करून स्लीम दिसायचं असेल तर तुम्ही नियमितपणे ही एक्सरसाईज करू शकता.

Pilates Exercise Benefits : तुम्ही फिटनेस फ्रीक असाल तर पिलेट्स एक्सरसाईजबाबत नक्कीच ऐकलं असेल. आजकालच्या लोकांमध्ये पिलेट्स एक्सरसाईजची चांगलीच क्रेझ बघायला मिळते. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट, जान्हवी कपूर, सारा अली खानहीत अनेक सेलिब्रिटी पिलेट्स एक्सरसाईज करतात. अशात या एक्सरसाईजचे फायदे काय आहेत, हे माहीत असणं गरजेचं आहे.

पिलेट्स एक्सरसाईजच्या माध्यमातून एकाचवेळी पूर्ण शरीराचा व्यायाम होतो. जर तुम्हाला वजन कमी करून स्लीम दिसायचं असेल तर तुम्ही नियमितपणेही एक्सरसाईज करू शकता. पिलेट्सच्या माध्यमातून मांसपेशी मजबूत होतात आणि त्यात लवचीकपणाही वाढतो. सोबतच जॉईंट्समधील दुखणंही दूर होतं. हेल्थलाईनच्या एका रिपोर्टमध्ये वृद्ध आणि वयस्कांसाठी पिलेट्स एक्सरसाईजचे फायदे सांगण्यात आले आहेत. तेच जाणून घेऊ. 

हाडं मजबूत होतात

बोन डेंसिटी हाडांच्या आत असलेल्या बोन मिनरल्सच्या प्रमाणाला म्हटलं जातं. हाडांचं घनत्व कमी झाल्यानं हाडं कमजोर होऊ लागतात. तसेच हाड मोडण्याचाही धोका असतो. जर तुम्हालाही बोन डेंसिटीमध्ये सुधारणा करायची असेल तर पिलेट्स एक्सरसाईज करू शकता.

पॉश्चरमध्ये सुधारणा

पिलेट्स एक्सरसाईज केल्यानंतर पॉश्चर चांगलं होतं. याने मणका आणि मांसपेशी मजबूत होतात. सोबतच शरीर लवचिक होतं. पिलेट्स केल्यानं पाठीचं दुखणंही दूर होण्यास मदत मिळते.

वजन होईल कमी

पिलेट्स एक्सरसाईज केल्यानं कॅलरी बर्न होतात. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. तसेच पोटावरील चरबी सुद्धा या एक्सरसाईजनं कमी होते.

इम्यूनिटी वाढेल

काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, पिलेट्स एक्सरसाईजनं इम्युनिटी बूस्ट होण्यास मदत मिळते. खासकरून वृद्धांमध्ये.

मूड चांगला राहतो

पिलेट्स केल्यानं सेल्फ अवेअरनेस निर्माण होतो आणि नर्वस सिस्टीम शांत होतं. २०१८ मधील एका विश्लेषणानुसार, पिलेट्स केल्यानं मानसिक आरोग्य चांगलं राहतं. चिंता आणि डिप्रेशन कमी करण्यास मदत मिळते. 

कशी कराल पिलेट्स एक्सरसाईज?

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामवेट लॉस टिप्स