Lokmat Sakhi >Fitness > वजन कमी केल्यावरही पुन्हा का वाढू लागतं? एक्सपर्टनी सांगितलं यामागचं मुख्य कारण!

वजन कमी केल्यावरही पुन्हा का वाढू लागतं? एक्सपर्टनी सांगितलं यामागचं मुख्य कारण!

Weight Loss : तुम्हीही अशाच लोकांपैकी असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. कारण यात आम्ही एकदा कमी केलेलं वजन पुन्हा का वाढतं, याची काही कारणं सांगणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 14:15 IST2024-12-10T14:13:49+5:302024-12-10T14:15:36+5:30

Weight Loss : तुम्हीही अशाच लोकांपैकी असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. कारण यात आम्ही एकदा कमी केलेलं वजन पुन्हा का वाढतं, याची काही कारणं सांगणार आहोत.

Weight Loss : Why do some people gain back the weight they lose, Expert tells the reason | वजन कमी केल्यावरही पुन्हा का वाढू लागतं? एक्सपर्टनी सांगितलं यामागचं मुख्य कारण!

वजन कमी केल्यावरही पुन्हा का वाढू लागतं? एक्सपर्टनी सांगितलं यामागचं मुख्य कारण!

Why do some people gain back the weight they lose : वाढलेलं वजन कमी करणं हे काही सोपं काम नाही. मात्र, तेवढं अवघडही नाही. जर एक्सरसाईज आणि आहाराची व्यवस्थित काळजी घेतली तर सहजपणे वजन कमी करता येऊ शकतं. बरेच लोक हेल्दी रूटीन फॉलो करून वजन कमी करतात. मात्र, काही लोक असेही असतात ज्यांचं वजन कमी तर होतं, पण काही महिन्यांनी पुन्हा वाढू लागतं. काही लोकांचं वजन एक ते दीड वर्षात पुन्हा वाढू लागतं. तुम्हीही अशाच लोकांपैकी असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. कारण यात आम्ही एकदा कमी केलेलं वजन पुन्हा का वाढतं, याची काही कारणं सांगणार आहोत. हेल्थ एक्सपर्ट प्रशांत देसाई यांनी एका व्हिडिओद्वारे याबाबतची काही कारणे सांगितली आहेत.

वजन पुन्हा का वाढतं?

प्रशांत देसाई यांनी सांगितलं की, वजन कमी केल्यावर पुन्हा वाढण्यामागचं मुख्य कारण तुमची सवय आहे. लोक वजन कमी करण्यासाठी काही काळासाठी आपल्या सवयींमध्ये सुधारणा करतात. पण वजन कमी झाल्यावर पुन्हा त्याच सवयी पुन्हा फॉलो करू लागतात. वजन कमी करण्यासाठी लोक एक आठवडा किंवा एक महिन्यापर्यंत शुगर आणि जंक फूड्सचं सेवन बंद करतात. ही सवय त्यांनी नेहमी फॉलो केली पाहिजे. सोप्या भाषेत सांगायचं तर जी सवय तुम्ही वजन कमी करण्याच्या दरम्यान फॉलो करत होते, तिच सवय रोज फॉलो करा. 

वजन कसं नियंत्रित ठेवाल?

जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचं कमी झालेलं वजन पुन्हा वाढू नये तर यासाठी हेल्दी सवयी फॉलो करा. त्यासाठी रोज साधारण ६ ते ८ तासांची झोप घ्यावी. एकही दिवस जंक फूड न खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रोज समान प्रमाणात जेवण करावे आणि एकही दिवस ओव्हरइटिंग करू नये. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे नियमितपणे पायी चालावे आणि एक्सरसाईज करावी.

Web Title: Weight Loss : Why do some people gain back the weight they lose, Expert tells the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.