Lokmat Sakhi >Fitness > भरपूर चालूनही वजन कमी होत नाहीये? ट्राय करा चालण्याच्या 'या' वेगळ्या पद्धती, मग बघा कमाल

भरपूर चालूनही वजन कमी होत नाहीये? ट्राय करा चालण्याच्या 'या' वेगळ्या पद्धती, मग बघा कमाल

Weight Loss Walking Methods : अनेक एक्सपर्ट  सांगतात की, फक्त पायी चालून फारसे फायदे मिळत नाहीत. तर पायी चालण्याच्या वेगवेगळ्या पद्धती अधिक फायदेशीर ठरतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 20:44 IST2025-05-29T13:46:07+5:302025-05-29T20:44:53+5:30

Weight Loss Walking Methods : अनेक एक्सपर्ट  सांगतात की, फक्त पायी चालून फारसे फायदे मिळत नाहीत. तर पायी चालण्याच्या वेगवेगळ्या पद्धती अधिक फायदेशीर ठरतात.

Weight Loss Walking Methods : Interval to weighted five best walking style for weight loss | भरपूर चालूनही वजन कमी होत नाहीये? ट्राय करा चालण्याच्या 'या' वेगळ्या पद्धती, मग बघा कमाल

भरपूर चालूनही वजन कमी होत नाहीये? ट्राय करा चालण्याच्या 'या' वेगळ्या पद्धती, मग बघा कमाल

Weight Loss Walking Methods : बिझी लाइफस्टाईल, कामाची वाढती वेळ, ट्रॅफिकमध्ये जाणारा वेळ, घरातील जबाबदाऱ्या या सगळ्या गोष्टींमुळे बरेच लोक इच्छा असूनही फिटनेससाठी जास्त वेळ काढू शकत नाहीत. जर तुम्हाला सुद्धा फिट राहण्यासाठी जास्त वेळ काढता येत नसेल तर एक सगळ्यात सोपा उपाय म्हणजे वॉकिंग. पण बरेच लोक असा विचार करतात की, फक्त चालून फार काही फरक पडत नाही. पण असं अजिबात नाहीये. चालण्याच्या जर वेगवेगळ्या पद्धती तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला वजन लवकर कमी करण्यास मदत मिळू शकते. तसेच तुमचं चालणं सुद्धा इंटरेस्टिंग होईल. अशात चालण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अनेक एक्सपर्ट  सांगतात की, फक्त पायी चालून फारसे फायदे मिळत नाहीत. तर पायी चालण्याच्या वेगवेगळ्या पद्धती अधिक फायदेशीर ठरतात. जर तुम्हाला चालण्यातून अधिक फायदा मिळवायचा असेल तर अशाच काही वेगळ्या पद्धती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून तुमची वजन कमी होण्याची प्रोसेस वेगानं होईल.

1) पॉवर वॉकिंग

पॉवर वॉकिंगचा अर्थ वेगानं चालणं, यात तुम्हाला सामान्य वेगापेक्षा जास्त वेगानं चालावं लागतं. इतकं की जरा दम लागावा. पण बोलण्यात समस्या होऊ नये. ही पद्धत कार्डियोसारखी काम करत आणि वेगानं कॅलरी बर्न होतात. अशा पद्धतीनं चालताना पाठ सरळ ठेवा, हात वाकवून मागे-पुढे करा आणि साधारण 67 किमी प्रति तासाच्या वेगानं चाला.

2) इनक्लाईन वॉकिंग

सामान्यपणे पायी चालण्यासाठी सरळ जागेची निवड केली जाते. पण यात तुम्हाला सरळ जागेऐवजी चढ-उतार असलेल्या जागेवर चालायचं आहे. असं केल्यानं शरीरातील वेगवेगळ्या स्नायू अ‍ॅक्टिव होतात. यानं पाय, मांड्या आणि ग्लूट्सवर जास्त प्रभाव पडतो. ज्यामुळे फॅट कमी होतं. यासाठी तुम्ही ट्रेकिंग ट्रेल्स किंवा ट्रेडमिलवर इनक्लाइन सेट करू शकता.

3) इंटरव्हल वॉकिंग

इंटरव्हल वॉकिंगमध्ये कॉमन वॉकिंग आणि फास्ट वॉकिंगचा क्रम आलटून पालटून केला जातो. जसे की, 2 मिनिटं वेगानं चालणं नंतर 1 मिनिट आरामात चालणं. यानं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि फॅट बर्निंगची प्रोसेस अधिक वेगानं होते. यासाठी 20 ते 30 मिनिटांच्या वॉकिंगमध्ये 45 इंटरव्हलचा समावेश करा. 

4) वेटेड वॉक

जर तुम्ही वॉक करत असताना काही वजन उचलत असाल तर तुमचा वर्कआउट आणखी प्रभावी होईल. यानं स्नायू मजबूत होतात आणि कॅलरी जास्त बर्न होतात. यासाठी 12 किलोचे डम्बल उचला किंवा वेट जॅकेट घाला. याची सुरूवात कमी वजन उचलूनच करावी.

5) नॉर्डिक वॉकिंग

चालण्याची ही एक यूरोपियन टेक्निक आहे. ज्यात चालताना खास पोल्स म्हणजे काठ्यांचा वापर केला जातो. यानं पाय, हात, पाठ आणि खांद्याचे स्नायू मजबूत होतात. तसेच पूर्ण शरीराचा व्यायाम होतो. यात काठी हातात घेऊन जमिनीवर पूश करत चाला. 

Web Title: Weight Loss Walking Methods : Interval to weighted five best walking style for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.