lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > ना जिम - ना डाएट, रोज सकाळी ५ पैकी १ मॉर्निंग ड्रिंक प्या, वजन आणि पोटही होईल कमी

ना जिम - ना डाएट, रोज सकाळी ५ पैकी १ मॉर्निंग ड्रिंक प्या, वजन आणि पोटही होईल कमी

Weight loss: 5 simple morning drinks to melt belly fat : वजन कमी करताना डाएट आणि जिमला वेळ मिळत नाही, नियमित वेट लॉस ड्रिंक प्या, फरक दिसेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2023 05:05 PM2023-09-24T17:05:46+5:302023-09-24T17:06:53+5:30

Weight loss: 5 simple morning drinks to melt belly fat : वजन कमी करताना डाएट आणि जिमला वेळ मिळत नाही, नियमित वेट लॉस ड्रिंक प्या, फरक दिसेल

Weight loss: 5 simple morning drinks to melt belly fat | ना जिम - ना डाएट, रोज सकाळी ५ पैकी १ मॉर्निंग ड्रिंक प्या, वजन आणि पोटही होईल कमी

ना जिम - ना डाएट, रोज सकाळी ५ पैकी १ मॉर्निंग ड्रिंक प्या, वजन आणि पोटही होईल कमी

वजन वाढणे ही जागतिक समस्या बनली आहे. वजन वाढल्याने फक्त शरीर लठ्ठ होत नाही तर, अनेक गंभीर आजार देखील छळतात. त्यामुळे वेळीच वजनावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. बहुतांश लोकं वजन कमी करण्याकडे एक टार्गेट म्हणून पाहतात. पण याकडे एक हेल्दी हॅबिट म्हणून पाहणं गरजेचं आहे.

मुख्य म्हणजे जीवनशैलीत बदल करणे गरजेचं आहे. आपण वेळेवर जेवत आहोत की नाही, आहारात योग्य पदार्थांचा समावेश आहे की नाही, हे पाहणं गरजेचं आहे. वजन कमी केल्यानंतर अनेक समस्या सुटतात. वेट लॉस करण्यासाठी आपण अनेक उपायांना फॉलो करतो. ज्यात व्यायाम आणि योग्य आहाराचा समावेश आहे. जर आपल्याला हे दोन्ही करायला जमत नसेल तर, सकाळच्या वेळीस ५ वेट लॉस ड्रिंक्स पिण्याची सवय लावा. या मॉर्निंग ड्रिंक्समुळे काही दिवसात शरीरातील चरबी झरझर घटेल(Weight loss: 5 simple morning drinks to melt belly fat).

लिंबू पाणी

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने चयापचय बुस्ट होते. नियमित लिंबाचा रस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते, यासह व्हिटॅमिन सी मिळते. ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.

रोज सकाळी नकळत ५ चुका होतात आणि वजन वाढायला लागते, पाहा नेमके काय चुकते?

ग्रीन टी

ग्रीन टी अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. त्यात ईजीसीजी नावाचे कॅटेचिन असते. ज्यामुळे चयापचय बुस्ट होते. नियमित ग्रीन टी प्यायल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण राहते. ज्यामुळे लठ्ठपणा कमी होतो.

ब्लॅक कॉफी

ब्लॅक कॉफी हे एक लो कॅलरी ड्रिंक आहे. जे शरीराला कॅफीन आणि अँटिऑक्सिडंट्स प्रदान करते. कॅफिन चयापचय वाढवते आणि चरबी जाळण्याच्या प्रक्रियेस गती देते. तर अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून संरक्षण करतात.

दालचिनी चहा

जर आपल्याला सामान्य चहा पिऊन कंटाळा आला असेल तर, दालचिनी चहा पिण्यास सुरुवात करा. नियमित दालचिनी चहा प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते. दालचिनी चहा प्यायल्याने पचनशक्ती वाढते आणि पोटाच्या समस्या दूर होतात. ज्यामुळे पोटाची चरबी जाळण्यास मदत होते.

सुटलेले पोट कमी करायचे? ४ पैकी १ डाळ रोज खा, पोट होईल सपाट लवकर

चिया सीड्स पाणी

वजन कमी करण्यासाठी प्रोटीन खूप गरजेचं आहे. नियमित चिया सीड्सचं पाणी प्याल्याने वजन लवकर कमी होण्यास मदत होते. चिया सीड्समध्ये प्रोटीनसह फायबर आणि ओमेगा ३ फॅटी ऍसिड सारखे आवश्यक पोषक तत्वे आढळतात.

Web Title: Weight loss: 5 simple morning drinks to melt belly fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.