Join us

हाय हिल्स घातल्याने पाय दुखतात? करा ३ व्यायाम, पायांच्या दुखण्याला आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2022 15:23 IST

Leg pain due to high heels: कितीही पाय दुखत असले, तरी उंच टाचांच्या चपलांचा मोह काही सुटत नाही.. म्हणूनच तर पाय दुखायला लागले की हे ३ व्यायाम करा, असा सल्ला देत आहे अभिनेत्री भाग्यश्री (3 exercise suggested by actress Bhagyashree).

ठळक मुद्देअभिनेत्री असल्याने साहजिकच भाग्यश्रीचा हायहिल्सचा वापर जास्त आहे. त्यामुळे तिने सांगितलेले हे व्यायाम तिच्या अनुभवातून आलेले असल्याने नक्कीच फायदेशीर ठरतील.

प्रत्येक स्त्री ला कधी ना कधी हाय हिल्स घालण्याचा मोह होतोच.. विशेषत: साडी नेसली किंवा एखादा ट्रॅडिशनल पायघोळ ड्रेस घातला तर लग्नकार्य किंवा पार्टी- समारंभ अशा प्रसंगी हमखास हाय हिल्स घालावी वाटते. हाय हिल्स खूप अधिक काळ कॅरी करणं खरोखरंच कठीण आहे. पण तरीही आपली हौसच एवढी दांडगी असते, की त्यापायी आपण नंतरचं दुखणं (leg pain due to high heels) सहन करायला अगदी हसत हसत तयार असतो..

 

तुमच्याही बाबतीत कधी ना कधी असं झालंच असेल ना.. म्हणूनच तर हाय हिल्स घाला पण त्यानंतरचं पायांचं दुखणं सहन करत बसू नका. पाय दुखत असतील तर त्यासाठी कसा आणि कोणता व्यायाम करायचा, हे सांगते आहे अभिनेत्री भाग्यश्री. तिने नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर (instagram share) केली असून यामध्ये तिने हायहिल्स घातल्यानंतर पायांना आराम कसा द्यायचा, त्यांना रिलॅक्स कसं करायचं यासाठी ३ साधे- सोपे व्यायाम सांगितले आहेत. अभिनेत्री असल्याने साहजिकच भाग्यश्रीचा हायहिल्सचा वापर जास्त आहे. त्यामुळे तिने सांगितलेले हे व्यायाम तिच्या अनुभवातून आलेले असल्याने नक्कीच फायदेशीर ठरतील.

 

उंच टाचेच्या चपला घातल्याने पाय दुखत असल्यास करून बघा हे ३ व्यायाम..१. पहिल्या प्रकारचा व्यायाम करण्यासाठी जमिनीवर ताठ बसा. पाय समोरच्या बाजूने पसरवा. आता एक बेल्ट घ्या. हा बेल्ट तुमच्या पायाच्या बोटांच्या खाली ठेवा. बेल्टची दोन्ही टाेकं तुमच्या हातात ताणून धरा. यानंतर पाय पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला बेंड करत व्यायाम करा. पाय रिलॅक्स होईल. १० ते १२ वेळा हा व्यायाम करा. 

 

२. दुसरा व्यायाम तुम्हाला पायऱ्यांवर उभे राहून करायचा आहे. यासाठी पायरीवर तुमच्या तळपायाचा पुढचा भाग म्हणजेच बोटांच्या खालचा भाग ठेवा. हातांनी कशाचा तरी आधार घ्या आणि तोल सावरण्याचा प्रयत्न करा. आता अर्धा तळपाय पायरीच्या खाली घेऊन पायाला ताण द्या. त्यानंतर पुन्हा तळपायाचा पुढचा भाग पायरीवर टेकवूनच ठेवा आणि आता तळपायाचा मागचा भाग वर उचलण्याचा प्रयत्न करा. ७ ते ८ वेळा ही स्टेप रिपिट करा. 

 

३. तिसऱ्या प्रकारच्या व्यायामात तुम्हाला बॉलचा वापर करायचा आहे. बॉल जमिनीवर ठेवा आणि तुमच्या तळपायाच्या मदतीने तो रोल करण्याचा प्रयत्न करा. असं करताना तळपायाचे सगळे स्नायू दबले जातील, याकडे लक्ष ठेवा. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यव्यायामभाग्यश्रीइन्स्टाग्राम