वजन कमी करायचे असेल तर एक्सरसाइज करणे अतिशय गरजेचे असते. वेटलॉससाठी आपण वेगवेगळे एक्सरसाईजचे प्रकार करत असलो तरी देखील यातही धावणे आणि वॉकिंग हे सगळ्यात कॉमन एक्सरसाइजचे प्रकार आहेत. अनेकांना वाटते की धावणे हा जलद वजन कमी करण्याचा एकमेव सोपा मार्ग आहे, तर काही लोक मानतात की चालणे हा हळूहळू पण शरीराला कमी त्रास देणारा आणि दीर्घकाळ वजन नियंत्रणात ठेवण्याचा चांगला पर्याय आहे. परंतु अनेकदा असा गोंधळ होतो की, वजन जलद आणि योग्य पद्धतीने कमी करण्यासाठी धावणे योग्य आहे की चालणे? (walking vs running for weight loss).
धावण्यामुळे आपल्याला जलद परिणाम दिसून येतेय हे खरे असले तरी, धावण्याने सांध्यांवर ताण येतो आणि दुखापत होण्याची शक्यता वाढते. याउलट, चालणे हा एक हलका - फुलका एक्सरसाइज असला तरी, तो सातत्याने आणि योग्य वेगाने केल्यास तितकाच (running or walking which burns more calories) फायदेशीर ठरू शकतो. वजन कमी करण्यासाठी धावणे योग्य की चालणे, या दोघांपैकी नेमके काय आहे बेस्ट ते पाहूयात...
वेटलॉस करण्यासाठी धावणे चांगले की चालणे ?
'हेल्थलाइन' मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, चालणे किंवा धावणे हे दोन्ही कार्डिओ एक्सरसाइज असले तरी, त्यांचा शरीरावर होणारा परिणाम वेगळा असतो. जर हे व्यायाम योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी केले, तर वजन कमी करण्याची प्रक्रिया जलद गतीने होऊ शकते. या शारीरिक हालचालींमुळे फक्त वजनच कमी होत नाही, तर अनेक आजारांचा धोका देखील कमी होतो. एकंदरीत आरोग्यासाठी या दोन्ही क्रिया अत्यंत फायदेशीर असतात.
वेटलॉस करण्यासाठी चालण्याची योग्य पद्धत कोणती ?
तज्ज्ञांच्या मते, चालणे हा एक 'लो-इम्पॅक्ट' एक्सरसाइज आहे, जो प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी सुरक्षित मानला जातो. हळू आणि जलद गतीचे चालणे (Brisk Walk) कॅलरी बर्न करण्यास मदत करते आणि मेटाबॉलिज्मचा वेग वाढवते. रोज ३० ते ४५ मिनिटांच्या जलद गतीने चालण्याने सुमारे १५० ते २५० कॅलरी बर्न होतात. हा एक्सरसाइज स्टॅमिना वाढवण्यासाठी, चिंता कमी करण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील चांगला पर्याय आहे. वजन कमी करू इच्छिणाऱ्या नवीन व्यक्तींसाठी सुरुवातीच्या दिवसांत चालणे हा एक सोपा आणि उपयुक्त पर्याय आहे.
धावण्याने वजन वेगाने कमी होते का ?
हेल्थलाईनमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, धावणे हा 'हाय-इम्पॅक्ट' कार्डिओ एक्सरसाइज आहे, जो खूप वेगाने कॅलरीज बर्न करतो. ३० मिनिटांच्या धावण्याने सुमारे ३०० ते ४५० कॅलरी बर्न होऊ शकतात, जे चालण्याच्या तुलनेत खूप जास्त आहेत. धावणे स्नायूंना मजबूत करतात, फॅट बर्निंग वाढवते आणि 'आफ्टर - बर्न इफेक्ट' देखील देते म्हणजेच, एक्सरसाइज संपल्यानंतरही शरीर कॅलरी बर्न करत राहते. त्यामुळे, जर तुम्हाला जलद गतीने वजन कमी करायचे असेल तर धावणे हा चालण्यापेक्षा एक उत्कृष्ट पर्याय असू शकतो.
कोणासाठी कोणता एक्सरसाइज आहे बेस्ट ?
जर तुमचे वय जास्त असेल, वजन खूप वाढलेले असेल, सांध्यांमध्ये वेदना असतील किंवा एक्सरसाइज करायला नुकतीच सुरुवात करत असाल, तर चालणे हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. चालण्यामुळे दुखापत होण्याचा धोका कमी होतो आणि शरीराला हळूहळू व्यायामाची सवय लागते.जास्त वजन असलेले लोक जर थेट धावणे सुरू करतील, तर गुडघे आणि कमरेवरचा दाब वाढू शकतो. त्यामुळे, आधी चालण्याने एक्सरसाइची सुरुवात करणे फायद्याचे ठरते.
फराह खानने सांगितला IVF चा भयंकर अनुभव, असह्य वेदना-मांडीत इंजेक्शनं..! IVF वेदनादायी असतं का..
याउलट, जर तुमचे वजन खूप अधिक नसेल, स्टॅमिना चांगला असेल आणि तुम्ही आधीपासून सक्रिय असाल, तर धावण्याने वजन वेगाने कमी होईल. धावणे शरीराला चॅलेंज देते, फॅट बर्निंगला प्रोत्साहन देते आणि शरीराची कार्यक्षमता देखील सुधारते. ज्यांना कमी वेळेत जलद परिणाम हवे आहेत आणि जे हाय इंटेंसिटी वर्कआऊट सहज करु शकतात, त्यांच्यासाठी हा विशेषतः चांगला पर्याय आहे. जर तुम्ही हेल्दी असाल, तर तुम्ही दोन्ही एक्सरसाइज प्रत्येकी ३० - ३० मिनिटे करू शकता.
Web Summary : Walking and running are both effective cardio exercises for weight loss. Running burns more calories quickly, while walking is gentler and sustainable. The best choice depends on fitness level, joint health, and weight loss goals. Start with walking if you're new to exercise or have joint issues.
Web Summary : वजन घटाने के लिए दौड़ना और चलना दोनों ही प्रभावी कार्डियो व्यायाम हैं। दौड़ने से कैलोरी जल्दी बर्न होती है, जबकि चलना सौम्य और टिकाऊ है। सबसे अच्छा विकल्प फिटनेस स्तर, जोड़ों के स्वास्थ्य और वजन घटाने के लक्ष्यों पर निर्भर करता है। यदि आप व्यायाम करने में नए हैं या जोड़ों की समस्या है तो चलना शुरू करें।