Walking for Weight Loss : वजन कमी करायचं म्हटलं तर काय काय करामती कराव्या लागतात हे काही आता नवीन नाही राहिलं. सोशल मीडियावरील पोस्ट, वेगवेगळे व्हिडीओ, एक्सपर्टचे सल्ले यावरून या वजन कमी करण्याच्या टिप्स सतत दिल्या जात असतात. ज्यातील बऱ्याच टिप्स लोक नियमित फॉलो करतात. वजन कमी करण्यासाठी किंवा फिट राहण्यासाठी जास्तीत जास्त लोक एक गोष्ट नियमित फॉलो करतात, ती म्हणजे पायी चालणं. पायी चालल्यानं वजन तर कमी होतंच, सोबतच एकंदर आरोग्यही चांगलं राहतं. मात्र, अनेकांच्या डोक्यात हा विचार येतो की, वजन कमी करायला असो वा फिट राहण्यासाठी असो किती वेळ पायी चालायला हवं?
अर्थात लोकांच्या मनात असा प्रश्न येणं कॉमन बाब आहे. कारण बरेच लोक वेगवेगळे सल्ले देतात. कुणी सांगतं की, 45 मिनिटं चाला तर कुणी सांगतं केवळ 15 मिनिटंही पुरेसे आहेत. वजन कमी करायचं असेल तर कॅलरी बर्न करणं अधिक महत्वाचं असतं. तर किती वेळात किती कॅलरी बर्न होतील आणि वजन कमी करण्यास मदत मिळेल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सोबतच पायी चालण्याचा एकंदर काय प्रभाव पडतो हेही जाणून घेऊया.
वजन कमी करण्यासाठी किती वेळ चालणं जास्त फायदेशीर?
आधीच वर सांगितल्याप्रमाणे वजन कमी करण्यासाठी कॅलरी बर्न करणं सगळ्यात महत्वाचं असतं. हे केल्याशिवाय तुमचं वजन कधीच कमी होणार नाही. अशात तुम्ही जर रोज 45 मिनिटं चालत असाल तर साधारण 150 ते 200 कॅलरी बर्न होतात. तेच 15 मिनिटं हळूवार चालल्यानं 120 ते 180 कॅलरी बर्न होतात. तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुमच्यासाठी 15 मिनिटं वॉक करणं एक चांगलं पर्याय आहे. जर जास्त वेळ असेल तर तुम्ही 45 मिनिटं वॉक करून जास्त कॅलरी बर्न करू शकता.
हृदयासाठी वेगानं चालणं की हळू चालणं फायदेशीर?
अनेक एक्सपर्ट सांगतात की, हळू चालल्यानं हार्ट रेट लवकर वाढतो, ज्यामुळे कार्डियोवस्कुलर सिस्टम अधिक अॅक्टिव होतं. ज्यामुळे हृदयाचं आरोग्य अधिक चांगलं राहतं. तेच थोडं वेगानं चालल्यानं हार्ट रेट हळूहळू वाढतो आणि तणाव कमी करण्यास मदत मिळते. ज्या लोकांना हाय बीपी किंवा हृदयासंबंधी समस्या आहे, त्यांच्यासाठी वॉक करणं बेस्ट ठरतं. जर तुमचं वय 40 च्या वर असेल आणि हृदय चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही वेगानं चाललं पाहिजे.
वेळ कमी असल्यावर 15 मिनिटं स्लो वॉक
आजकाल कामाच्या वाढत्या पसाऱ्यामुळे लोकांकडे वेळ कमी असतो, अशात तुम्ही निदान 15 मिनिटं स्लो जॉगिंग करू शकता. यानं तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. पण यात नियमितता असणं गरजेचं आहे. तेच फास्ट वॉक तुम्ही सकाळी आणि सायंकाळी कधीही करू शकता.
मानसिक आरोग्यासाठी काय बेस्ट?
शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर वॉक करणं खूप फायदेशीर ठरू शकतं. यानं तणाव कमी होतो आणि डोकं शांत राहतं. जे लोक जास्त चिंतेत असतात किंवा तणावात असतात त्यांनी वॉक केला पाहिजे. तेच स्लो जॉगिंगनं एंडोर्फिन हार्मोन रिलीज होतात, ज्याला हॅपी हार्मोन म्हटलं जातं. म्हणजे मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी दोन्ही पर्याय फायदेशीर आहेत.