Who Should Avoid 10k Steps : पायी चालणं हा फिट राहण्यासाठी चालणे सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय मानला जातो. त्यामुळे अनेकजण दररोज 10,000 पावलं चालण्याचं टार्गेट ठेवतात. वेगवेगळ्या संशोधनातही सांगण्यात आलं आहे की, रोज किमान 10 हजार पावलं चालाल तर वजन कमी करण्यास मदत मिळेल आणि अनेक आजारांचा धोकाही कमी होईल. पण आपल्याला माहीत नसेल की, प्रत्येक व्यक्तीसाठी 10 हजार पावलं चालणं योग्य नसतं. काही लोकांसाठी इतकं चालणं शरीरावर ताण आणू शकतं आणि त्यामुळे फायदे होण्याऐवजी आरोग्य बिघडू शकतं. अशात आज आपण पाहणार आहोत की, कोणत्या लोकांनी दररोज 10,000 पावलं चालणं टाळावं.
पेरिफेरल आर्टरी डिसीज
पेरिफेरल आर्टरी डिसीज ही एक अशी स्थिती असते, ज्यात पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये फॅट जमा होऊन रक्तप्रवाह कमी होतो. अशा लोकांना जास्त चालल्यावर पायात क्रॅम्प, ताण किंवा तीव्र वेदना जाणवतात, खासकरून जास्त चालल्यास. म्हणून पेरिफेरल आर्टरी डिसीज असणाऱ्यांनी एकदम 10,000 पावलं चालू नयेत. याऐवजी थोडं चालणं, मग थोडा आराम घेणं अशी पद्धत ठेवावी.
स्नायू किंवा हाडांच्या वेदना
ज्यांना ऑस्टिओआर्थरायटिस, सांधेदुखी किंवा हाडांचे आजार आहेत, त्यांच्यासाठी जास्त चालणं हानिकारक ठरू शकतं. गुडघे, कंबर, किंवा पाठीच्या वेदनांनी त्रस्त लोकांनी लांब चालण्याचं टार्गेट ठेवल्यास सांध्यांवर अधिक ताण येतो, सूज आणि वेदना वाढतात. अशा लोकांनी आपल्या शारीरिक क्षमतेनुसारच चालावं.
हृदयविकार असणारे लोक
साधारण चालणं हृदयासाठी चांगलं असतं, पण ज्यांना एनजायना, हार्ट अॅटॅक झाला आहे किंवा हार्ट फेल्युअर आहे, त्यांनी काळजी घ्यावी. जास्त चालल्याने छातीत वेदना, दम लागणे किंवा थकवा वाढू शकतो. अशा लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच चालण्याचं ठरवावं.
जखम किंवा सर्जरी
जर पायाला लचक भरली असेल, फ्रॅक्चर झालं असेल किंवा अलीकडे सर्जरी झाली असेल, तर जास्त चालल्याने जखम बरी होण्याची प्रक्रिया मंदावते आणि सूज वाढते. त्यामुळे अशा काळात 10,000 स्टेप्सचं लक्ष्य ठेऊ नये.
एकंदर काय दररोज चालणं आरोग्यासाठी उत्तम आहे, पण प्रत्येकासाठी 10,000 स्टेप्स योग्यच असतात असं नाही. आपल्या शरीराच्या स्थितीनुसार, आजारानुसार आणि वयाप्रमाणे चालण्याचं लक्ष्य ठरवणं आवश्यक आहे.