>फिटनेस > Virat Kohli's Fitness Secret : समोर आलं विराट कोहलीचं फिटनेस सिक्रेट; फक्त ३० मिनिटांचा व्यायाम अन् काय खातो जाणून घ्या

Virat Kohli's Fitness Secret : समोर आलं विराट कोहलीचं फिटनेस सिक्रेट; फक्त ३० मिनिटांचा व्यायाम अन् काय खातो जाणून घ्या

Virat Kohli's Fitnss Secret :  विराटचे वजन कमी करण्याचे परिवर्तन एका रात्रीत झाले नाही. त्याने कमी कार्ब आहार, हेल्दी फॅट्स, उच्च तीव्रतेच्या कार्डिओ व्यायामाचा सातत्याने सराव केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 12:03 PM2021-09-21T12:03:58+5:302021-09-21T12:27:25+5:30

Virat Kohli's Fitnss Secret :  विराटचे वजन कमी करण्याचे परिवर्तन एका रात्रीत झाले नाही. त्याने कमी कार्ब आहार, हेल्दी फॅट्स, उच्च तीव्रतेच्या कार्डिओ व्यायामाचा सातत्याने सराव केला आहे.

Virat Kohli's Fitness Secret : Team india captain virat kohli approved 5 workout for weight loss know health benefits of these exercises | Virat Kohli's Fitness Secret : समोर आलं विराट कोहलीचं फिटनेस सिक्रेट; फक्त ३० मिनिटांचा व्यायाम अन् काय खातो जाणून घ्या

Virat Kohli's Fitness Secret : समोर आलं विराट कोहलीचं फिटनेस सिक्रेट; फक्त ३० मिनिटांचा व्यायाम अन् काय खातो जाणून घ्या

Next
Highlightsजेव्हा व्यायामाचा विचार केला जातो  तेव्हा पोहणे हा व्यायाम काही आठवड्यांत आपले वजन कमी करण्यास मदत करू शकतो. जॉगिंग किंवा धावण्याव्यतिरिक्त पोटातील चरबी कमी करण्यासाठी पोहणं सर्वोत्तम व्यायाम आहे. जर तुम्हाला देखील कोहली सारखे उत्तम शरीर हवे असेल तर वजन उचलण्याबाबत संकोच बाळगू नका. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार  शक्य तितके जड उचलण्याचे ध्येय ठेवा.

भारताचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं अखेरीस ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याचे जाहीर केले. मागील काही दिवसांपासून विराट आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडेल अशा चर्चा होत्या. विराट जगभरातील सगळ्यात फिट एथलिटपैकी एक आहे. प्रत्येकाने त्याला मैदानावर आक्रमकपणे खेळताना, विकेट्स दरम्यान अतुलनीय उर्जा घेऊन धावताना, रन-मशीन सारखा स्कोअर मिळवताना पाहिले आहे. पण विराट कोहली सारखे शरीर मिळवण्यासाठी काय लागते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत ज्याच्या आधारे तुम्हीही त्याच्याप्रमाणे  तंदुरुस्त आणि निरोगी राहण्याचा प्रयत्न करू शकता.

32 वर्षीय फलंदाज, जो जगभरातील लोकांचा फिटनेस आयकॉन आहे, इंटेस वर्कआउट्स आणि कंपाऊंड्स प्रॅक्टिससाठी आधी विराट तेवढा वेडा नव्हता जितका तो आता आहे.  विराटचे वजन कमी करण्याचे परिवर्तन एका रात्रीत झाले नाही. त्याने कमी कार्ब आहार, हेल्दी फॅट्स, उच्च तीव्रतेच्या कार्डिओ व्यायामाचा सातत्याने सराव केला आहे. ज्यामुळे तो कर्णधार बनला. तुम्ही देखील विराट कोहलीने फॉलो केलेल्या टिप्स आपल्या रोजच्या जीवनात वापरून आपली जीवनशैली सुधारू शकता.

धावण्याचा व्यायाम 

आधी मूलभूत गोष्टींपासून सुरुवात करणे महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी, आपल्या व्यायामामध्ये धावणं समाविष्ट करणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक व्यायामांमध्ये धावणं हा सर्वात महत्वाचा आणि सोपा व्यायाम आहे. धावणे आपल्याला मजबूत स्नायू तयार करण्यास मदत करते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. ट्रेडमिलवर धावल्याने एका तासात सरासरी 705 ते 865 कॅलरीज बर्न होतात आणि मन शांतही होते.

तुमच्याकडे कदाचित स्टार क्रिकेटरसारखी समृद्ध जीवनशैली नसेल पण तुम्हाला विराट कोहलीसारखे सिक्स-पॅक अॅब्स मिळू शकतात. क्रंच किंवा सिट-अप करण्यासाठी कोणत्याही फॅन्सी जिम उपकरणांची आवश्यकता नसते. आपल्याला फक्त तंदुरुस्त राहण्यासाठी थोडी जागा आणि निर्धार हवा आहे. दररोज 10 मिनिटांचे क्रंचेस व्यायाम  54 कॅलरीज बर्न करू शकते. हे आपल्या मुख्य स्नायूंना बळकट करण्यास आणि आपल्या शरीराची गतिशीलता आणि लवचिकता वाढविण्यात मदत करते.

स्विमिंग

जेव्हा व्यायामाचा विचार केला जातो  तेव्हा पोहणे हा व्यायाम काही आठवड्यांत आपले वजन कमी करण्यास मदत करू शकतो. जॉगिंग किंवा धावण्याव्यतिरिक्त पोटातील चरबी कमी करण्यासाठी पोहणं सर्वोत्तम व्यायाम आहे. कारण पोहणे तुम्हाला तुमच्या स्नायूंना बळकटी देण्यास फायदेशीर ठरते. 

हेवी लिफ्टींग

जर तुम्हाला देखील कोहली सारखे उत्तम शरीर हवे असेल तर वजन उचलण्याबाबत संकोच बाळगू नका. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार  शक्य तितके जड उचलण्याचे ध्येय ठेवा. जड वजन उचलण्याद्वारे, तुम्हाला काही दिवसांत कोहलीसारखे स्नायू आणि टोन्ड पाय मिळतील. विराटने म्हटल्याप्रमाणे, 'मेहनतीला शॉर्टकट नाहीत', वेट ट्रेनिंगसाठी सतत प्रयत्न आणि खूप संयम आवश्यक असतो.

आहार

कोहलीने आपल्या डाएटमध्ये पूर्णपणे हिरव्या भाज्यांचा समावेश केला आहे. व्हेजिटेरीयन आणि वेगन दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वेगन डाएटमध्ये दुधापासून तयार कोणत्याही पदार्थांचं सेवन केलं जात नाही तर व्हेजिटेरीयनमध्ये या पदार्थांचा समावेश केला जाऊ शकतो. विराट कोहलीच्या डाएटमध्ये आता वेगवेगळे धान्यांचाही समावेश करण्यात आला आहे. फळांच्या सेवनावरही तो जास्त भर देत आहे. सोया पनीरचाही यात समावेश करण्यात आला आहे. वेगन डाएटमध्ये जनावरांपासून तयार कोणताही पदार्थ खाल्ला जात नाही. 

वेगन डाएट पूर्णपणे फायबरने युक्त असते. याने पचनक्रिया अधिक मजबूत होते. विराटने वनस्पती तेलाचा वापर करणे सुरु केले आहे. त्याच्यासोबत आणखीही काही खेळाडूंनी या डाएटवर लक्ष केंद्रीत केलं आहे. टेनिस खेळाडू सेरेना विलियम्स सुद्धा हा डाएट प्लॅन फॉलो करते. वेगन डाएट फॉलो करणारे सांगतात की, हा डाएट प्लॅन माणसाला आनंदी ठेवण्यासाठी फार मदत करतो. 

Web Title: Virat Kohli's Fitness Secret : Team india captain virat kohli approved 5 workout for weight loss know health benefits of these exercises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

मलायकाचं 'रॉक ॲण्ड रोल' फिटनेस चॅलेंज! कमाल फिटनेस, तिला जमलं आपल्याला जमेल? - Marathi News | Malaika Arora gives rock and roll fitness challenge, also told the benefits of utkatasan! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायकाचं 'रॉक ॲण्ड रोल' फिटनेस चॅलेंज! कमाल फिटनेस, तिला जमलं आपल्याला जमेल?

Fitness Freak मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच सोशल मिडियावर (social media) तिचा जबरदस्त फिटनेस दाखवत असते. असाच एक workout व्हिडियो तिने नुकताच सोशल मिडियावर शेअर केला असून तिच्या चाहत्यांना फिटनेस चॅलेंज (fitness challenge) दिलं आहे.  ...

How to lose Belly Fat : महिनाभरात झरझर कमी होईल Belly fat; फिटनेस एक्सपर्ट्सनी सांगितलं वजन कमी करण्याचं सिक्रेट - Marathi News | How to lose Belly Fat : Lifestyle coach luke coutinho shares the biggest secret to burn belly fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिनाभरात झरझर कमी होईल Belly fat; फिटनेस एक्सपर्ट्सनी सांगितलं वजन कमी करण्याचं सिक्रेट

How to lose Belly Fat : शरीरातील चरबी कशी जाळली जाते आणि कोणते हार्मोन वजन कमी करण्यास मदत करू शकतात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. ...

थंडीत आणि मसाला ताक? करून तर पाहा, थंडीत उबदार ठेवणारे हे खास 'मसाला ताक' - Marathi News | Recipe : How to make spicy buttermilk specially for winter | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत आणि मसाला ताक? करून तर पाहा, थंडीत उबदार ठेवणारे हे खास 'मसाला ताक'

Food: थंडीमध्ये मसाला ताक (winter special recipe) बनविण्याची ही बघा सोपी पद्धत... थंडीतही उबदार राहण्यासाठी ताकाला (How to make spicy buttermilk) द्या असा झकास तडका.... ...

व्यायाम करता पण स्ट्रेचिंग करता का? ५ सोपे स्ट्रेचिंग प्रकार, राहा दिवसभर फ्रेश - Marathi News | Do you exercise, but do stretching? 5 Easy Stretching Types, Stay Fresh All Day | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्यायाम करता पण स्ट्रेचिंग करता का? ५ सोपे स्ट्रेचिंग प्रकार, राहा दिवसभर फ्रेश

अतिशय सोपे आणि १० मिनिटांत होणारे हे व्यायाम करा, दिवसभर टवटवीत राहायला होईल मदत ...

How to lose weight Faster : फक्त ३ महिन्यात पोटाचा वाढलेला घेर होईल कमी; हे घ्या फिगर मेंटेन ठेवण्याचे सोपे उपाय - Marathi News | How to lose weight Faster : Weight loss guaranteed stomach will be inside in 3 months just follow these3 effective tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त ३ महिन्यात पोटाचा वाढलेला घेर होईल कमी; हे घ्या फिगर मेंटेनं ठेवण्याचे सोपे उपाय

How to lose weight Faster :  रातोरात तुम्ही बारीक होऊ शकत नाही त्यासाठी काही महिने तुम्हाला व्यायाम आणि आहारावर  पुरेपूर लक्ष द्यायची गरज आहे. ...

दंड ओघळले आहेत, स्लिव्ह्जलेस कपडे घालताना संकोच वाटतो? रोज ४ व्यायाम,  दंड दिसतील छान! - Marathi News | Fitness: How to reduce fats on arms? simple exercise | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दंड ओघळले आहेत, स्लिव्ह्जलेस कपडे घालताना संकोच वाटतो? रोज ४ व्यायाम,  दंड दिसतील छान!

How to reduce fats on arms: हाताच्या दंडावरची चरबी वाढू लागली की हात अतिशय बेढब दिसू लागतात. म्हणूनच हे काही व्यायाम (exercise)नियमितपणे करा.. हात दिसू लागतील आकर्षक... ...