वाढतं वजन कमी कसं करायचं किंवा शरीराचा फिटनेस कसा टिकवून ठेवायचा हा अनेकांपुढचा मोठा प्रश्न आहे. काही जण आवर्जून त्यासाठी वेळ काढतात आणि नियमितपणे व्यायाम करतात. त्यासोबतच आहारावरही त्यांचा कंट्रोल असतोच. पण काही जणांच्या बाबतीत असंही होतं की त्यांना व्यायामाचा खूप कंटाळा येतो. महिलांच्या बाबतीत तर असंही होतं की घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून व्यायामाला कधी जावं हेच कळत नाही. कारण त्यांना त्यांच्या रोजच्या कामातून व्यायामासाठी पुरेसा वेळच देता येत नाही. अशी अडचण असणाऱ्या महिलांनी स्वयंपाक घरातल्या त्यांच्या कामाची पद्धत थोडी बदलली तर नक्कीच थोडाफार फायदा होऊ शकतो (tricky method to work in kitchen for weight loss). त्यासाठी नेमकं काय करायचं पाहा...(how to do weight loss while working in kitchen?)
वेटलॉससाठी रोजचीच कामं करा थोड्या वेगळ्या पद्धतीने
१. हल्ली आपण स्वयंपाक घरातली सगळी कामं उभ्याउभ्याच करतो. उदाहरणार्थ भाज्या चिरणे, भाज्या निवडणे, लसूण किंवा इतर शेंगा सोलणे अशी कामं उभ्याने करू नका. ती करण्यासाठी जमिनीवर मांडी, पद्मासन किंवा सुखासन घालून बसा. या पद्धतीने बसल्याने आपल्या पचनक्रियेवर खूप चांगला परिणाम होतो.
कॉम्पॅक्ट लावल्यानंतर तुमचाही चेहरा काळवंडून जातो? ४ गोष्टी टाळा- चेहरा दिसेल फ्रेश, उजळ
२. भाजी शिजेपर्यंत, वरण किंवा चहा उकळेपर्यंत बऱ्याचदा गॅससमोर तसंच उभं राहावं लागतं. कारण पुढच्या काही मिनिटांत आपल्याला लगेच गॅस बंद करायचा असतो. अशावेळी तुम्ही तिथे उभ्याउभ्याच हात गोलाकार फिरवणे, मान फिरवणे, ताडासन किंवा वृक्षासन करून उभे राहाणे असे काही छोटे छोटे स्ट्रेचिंग करू शकता.
३. इतर घरं पुसण्यासाठी, झाडण्यासाठी तुमच्याकडे मदतनीस असले तरी स्वयंपाक झाडणे आणि खासकरून ते पुसणे ही कामं तुम्ही करा. स्वयंपाक घर पुसताना ते वाकून पुसू नका. तर मलासनामध्ये बसा आणि मग पुसा. यामुळे पचन, चयापचय तर चांगले होतेच पण मासिक पाळीतला त्रास कमी करण्यासाठीही ते फायदेशीर ठरते.
पदार्थ करपल्याने स्टीलची कढई जळकट झाली? १ भन्नाट उपाय- न घासता कढई होईल स्वच्छ
४. यासोबतच आहारावर नियंत्रण ठेवणे, जेवणाच्या वेळा पाळणे, गोडधोड पदार्थ, मसालेदार पदार्थ, बेकरीचे पदार्थ खाताना स्वत:वर मर्यादा ठेवणे.. या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. कारण आपल्याला व्यायामाला जर वेळ मिळत नसेल तर डाएटिंगच्या बाबतीत तरी आपण काही नियम पाळायलाच हवेत.
