Join us

वर्षभरात 'ही' ५ योगासने लोकांनी अधिक केली फॉलो, पचनही सुधारलं अन् वजनही घटलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 14:27 IST

२०२४ मध्ये कोणत्या योगांना लोकांनी जास्त पसंती दिली तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही सुद्धा नव्या वर्षात हे योगासने करून फीट राहू शकाल.

२०२४ हे संपायला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. लोक नव्या वर्षाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. सरत्या वर्षात अनेकांनी वेगवेगळ्या गोष्टी केल्या असतील, आरोग्याची काळजी घेतली असेल त्यांच्या आठवणी ताज्या केल्या जात असतील. कारण २०२४ मध्ये अनेकांनी फीट राहण्यासाठी ट्रेडिंग योगा किंवा फिटनेस टिप्स फॉलो केल्या आहेत. २०२४ मध्ये कोणत्या योगांना लोकांनी जास्त पसंती दिली तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही सुद्धा नव्या वर्षात हे योगासने करून फीट राहू शकाल.

मलासन

२०२४ मध्ये लोकांनी मलासन खूप लोकांनी सर्च केलं. या योगाला स्क्वाटही म्हटलं जातं. हे योगासन नियमित केल्याने तुम्हाला फीट राहण्यास मदत मिळते. या आसनामुळे कंबरदुखी, गुडघेदुखी दूर होते. इतकंच नाही तर याने पचन तंत्रही मजबूत होतं. कारण पोटाच्या मांसपेशी मजबूत होतात.

पवनमुक्तासन

पवनमुक्तासन सुद्धा बरंच ट्रेंडमध्ये होतं. या योगाच्या मदतीने पोटासंबंधी समस्या जसे की, गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता इत्यादी दूर होतात. तसेच नियमितपणे हे आसन केल्याने पोटावर वाढलेली चरबी लवकर कमी करण्यासही मदत मिळते. 

ताडासन

२०२४ मध्ये सगळ्यात जास्त सर्च केल्या गेलेल्या आसनांमध्ये ताडासनाचाही समावेश आहे. या आसनाच्या मदतीने तुम्ही शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना मजबूती मिळते. इतकंच नाही तर या आसनाने उंची वाढण्यासही मदत मिळते आणि ब्लड सर्कुलेशनही चांगलं होतं. 

मत्स्यासन

मत्स्यासन सुद्धा २०२४ मध्ये लोकांच्या पसंतीस उतरलं. या आसनाने शारीरिक आणि मानसिक विकास चांगला होतो. जर नियमितपणे तुम्ही हे आसन केलं तर घशात आणि खांद्यांमध्ये होणारी समस्या दूर होते. तसेच पोटाचा समोरील भागही कमी होऊन बॉडी टोन होते.

पश्चिमोत्तानासन

वरील आसनांसोबतच २०२४ मध्ये पश्चिमोत्तानासनही लोकांनी खूप फॉलो केलं. या आसनाने पचन तंत्र मजबूत करण्यास मदत मिळते. तसेच पाठीचा कणाही आणि हाडंही लवचिक होतात. इतकंच नाही तर या योगाने पोटावरील चरबी कमी करण्यासही मदत मिळते. त्यासोबतच या आसनाने झोप न येण्याची समस्याही दूर होते.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्स