lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > वजन खूप वाढलंय ? जपानी महिलांच्या फूड हॅबिट्सना करा फाॅलो, वजन राहील नियंत्रणात

वजन खूप वाढलंय ? जपानी महिलांच्या फूड हॅबिट्सना करा फाॅलो, वजन राहील नियंत्रणात

Japanese Women Eating Habits बिघडलेल्या लाईफस्टाईलमुळे अनेकांचं वजन वाढत चाललंय. जपानी महिलांचे फूड हॅबिट्स शरीराला फिट ठेवण्यास मदत करतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2022 04:06 PM2022-11-17T16:06:15+5:302022-11-17T16:07:32+5:30

Japanese Women Eating Habits बिघडलेल्या लाईफस्टाईलमुळे अनेकांचं वजन वाढत चाललंय. जपानी महिलांचे फूड हॅबिट्स शरीराला फिट ठेवण्यास मदत करतील

Too much weight gain? Follow the food habits of Japanese women, weight will be under control | वजन खूप वाढलंय ? जपानी महिलांच्या फूड हॅबिट्सना करा फाॅलो, वजन राहील नियंत्रणात

वजन खूप वाढलंय ? जपानी महिलांच्या फूड हॅबिट्सना करा फाॅलो, वजन राहील नियंत्रणात

आजकाल अनेक लोक त्यांच्या वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहेत. बिघडलेली लाईफस्टाईल असो या आणखी काही. अनेकांना व्यायाम शाळेत जाऊन घाम गाळुन वजन कमी करावे लागत आहे. बऱ्याच स्त्रिया त्यांच्या वाढलेल्या वजनासाठी हाडांच्या संरचनेला दोष देतात. तर, काही स्वतःकडे दुर्लक्ष करतात, वेळेवर न जेवणे हे देखील वजन वाढण्याचे मुख्य कारण बनू शकते. मात्र, जपानी महिलांची खाण्याची पद्धत जर दैनंदिन जीवनात अवलंबली तर, वजन नियंत्रणात येण्यास मदत होऊ शकते. जपानी महिलांच्या खाण्याच्या सवयींबद्दल या लेखात जाणून घेणार आहोत. ज्याचा आपण दैनंदिन जीवनात वापर करू शकता.

शिळे अन्न खाणे टाळावे

जपानी महिला पॅक केलेले अन्न किंवा फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न खात नाहीत, लेखिका नाओमी मोरियामा यांनी त्यांच्या Japanese Women Don’t Get Old Or Fat या पुस्तकात शिळे अन्नाबद्दल उल्लेख करत लिहले  की, ‘’जपानी स्त्रिया या नेहमी ताज्या अन्नाला महत्त्व देतात. दरम्यान, भारतात तसेच अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न खाण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. शिळ्या अन्नामध्ये विषाचे प्रमाण अधिक असते. पॅक फूड अथवा शिळे अन्न खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते. मात्र, सारखं शिळे अन्न खाणे आरोग्यासाठी चांगले नाही.’’

शिळे अन्न का खाऊ नये?

शिजवलेल्या अन्नाचे पौष्टिक मूल्य काही काळानंतर कमी होऊ लागते. अन्नामध्ये असलेली अनेक जीवनसत्त्वे खराब होतात आणि विषारी बनतात. दुसरीकडे, रेडी टू इट जेवण हे प्रक्रियेतून बनलेले अन्न असल्यामुळे ते खाल्ल्याने रक्तदाबासारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे घरगुती ताजे जेवण खाणे केव्हाही उत्तम.

हेल्थी कुकिंगला महत्व

2005 मध्ये न्यूट्रिशन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, जपानी लोक शाकाहारी पदार्थ अधिक खातात. त्यांच्या प्रत्येक पदार्थात फरसबी, गाजर, पालक, कांदे, टोमॅटो आणि इतर अनेक भाज्यांचा समावेश असतो. त्यांना फळे भाज्या खायला प्रचंड आवडतात. वाफवलेल्या भाज्या खाण्यास ते जास्त प्राधान्य देतात.

Web Title: Too much weight gain? Follow the food habits of Japanese women, weight will be under control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.