Squats Benefits : जसजसं वय वाढत जातं, तशी शरीराची एनर्जी आणि स्पीड कमी होत जातो. वाढत्या वयात सततची सांधेदुखी, स्नायूंमध्ये कमजोरी आणि बॅलन्स जाणं अशा समस्या डोकं वर काढत असतात. पण जर आपल्याला वाढत्या वयातील या समस्या टाळायच्या असतील आणि तंदुरूस्त रहायचं असेल तर एक सोपा व्यायाम आपल्या खूप कामात येऊ शकतो. स्क्वॉट्स हा एक सोपा आणि शरीराला मजबूती देणारा असा व्यायाम आहे. महत्वाची बाब म्हणजे हा व्यायाम आपण सहजपणे घरातच करू शकता. यासाठी ना कुठे जाण्याची गरज आहे, ना जास्त वेळ घालवण्याची गरज. चला तर पाहुयात स्क्वॉट्सचे फायदे आणि त्याची योग्य पद्धत.
रोज स्क्वॉट्स करण्याचे फायदे
पाय मजबूत राहतात
वाढत्या वयात सगळ्यात आधी त्रास जाणवतो तो पायांमध्ये. पायांचे स्नायू कमजोर झाल्यानं पाय सतत दुखतात. जास्त वेळ चालताही येत नाही. अशात स्क्वॉट्स केल्याने मांडी, कंबर आणि पोटऱ्यांचे स्नायू मजबूत होतात. मजबूत पाय तुम्हाला लांब चालणं, जिने चढणं आणि रोजचे काम सहज करणं शक्य करतात.
हाडं मजबूत होतात
स्क्वॉट्स हा एक वेट-बेअरिंग व्यायाम आहे. जो हाडांवर हलका दाब आणून त्यांची डेंसिटी वाढवतो. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिससारख्या हाडांच्या आजारांचा धोका कमी होतो.
संतुलन सुधारतं
म्हातारपणात बॅलन्स अनेकदा बिघडून पडण्याचा धोका वाढतो. स्क्वॉट्स केल्याने कोर मसल्स मजबूत होतात आणि शरीराचा बॅलन्स सुधारतो, त्यामुळे पडण्याची शक्यता कमी राहते.
सांधेदुखीपासून आराम
योग्य पद्धतीने नियमित स्क्वॉट्स केल्याने गुडघे आणि कंबरेजवळील सांधे मजबूत होतात. यामुळे सांध्यांमध्ये लवचिकता येते आणि वेदना कमी होतात.
पचनसंस्था सुधारते
स्क्वॉट्स करताना पोटाच्या स्नायूंवर नॅचरल दाब पडतो, ज्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
कसे सुरू करावे आणि कोणत्या काळजी घ्याव्यात
जर आपल्याला आधीपासून सांधेदुखी किंवा इतर कोणतीही गंभीर समस्या असेल, तर डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या. सुरुवातीला बॉडीवेट स्क्वॉट्स (विना वजन) ने सुरुवात करा.
योग्य पद्धत
पाठ सरळ ठेवून, पाय खांद्याएवढ्या अंतरावर ठेवून उभे राहा. हात समोर पसरवा. हळूहळू खाली बसा जणू तुम्ही खुर्चीवर बसत आहात.
चेअर स्क्वॉट्स: बॅलन्स राखण्यासाठी खुर्चीसमोर उभं राहून स्क्वॉट्सचा सराव करा. सुरुवातीला 5–8 स्क्वॉट्सपासून प्रारंभ करा आणि हळूहळू सेट वाढवा.
व्हिडिओत व्यायामाची पद्धत बघू शकता.
