Join us

वयाच्या तिशीनंतर महिलांसाठी गरजेचे 'हे' ३ व्हिटामिन्स, थकवा-कमजोरी जवळही फिरकणार नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 19:35 IST

Vitamins For Women : कमी वयातच जास्त वयाची लक्षणं दिसू लागतात आणि शरीरात इतरही आजार घर करतात. अशात प्रत्येक महिलेला शरीर फिट ठेवण्यासाठी 30 वयानंतर 3 व्हिटामिन्सची अधिक गरज असते.

Vitamins For Women : जसजसं वय वाढत जातं महिलांच्या शरीरात हार्मोन्स वेगानं बदलतात. 30 वयानंतर जेव्हा पहिलं बाळ होतं त्यानं महिलांना वेगवेगळ्या शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. वेदना, थकवा आणि कमजोरी सतत जाणवत राहतात. कमी वयातच जास्त वयाची लक्षणं दिसू लागतात आणि शरीरात इतरही आजार घर करतात. अशात प्रत्येक महिलेला शरीर फिट ठेवण्यासाठी 30 वयानंतर 3 व्हिटामिन्सची अधिक गरज असते.

कारण वाढत्या वयासोबत त्वचेवर आणि शरीरावर एजिंग दिसू लागते. वय वाढलं की, शरीराचा शेप आधीसारखा राहत नाही हे तुम्हीही अनुभवलं असेल. जसे की, पोट बाहेर निघतं, त्वचेवर हलक्या सुरकुत्याही दिसू लागतात. दिवसभर घरातील आणि ऑफिसचं काम करून जास्त थकवा जाणवतो. जास्तीत जास्त महिलांसोबत हेच होतं. पण अनेक महिलांना हे माहीत नसतं की, काही व्हिटामिन्स घेतल्यास या समस्या दूर होऊ शकतात. हे व्हिटामिन्स कोणते तेच जाणून घेऊया.

महिलांसाठी आवश्यक 3 व्हिटामिन्स

मॅग्नेशिअम

मॅग्नेशिअम BHB नियमितपणे घेतल्यास भूक कंट्रोल होते. तसेच काही गोड खाण्याची क्रेविंगही कमी होते. पोटात होणारा गॅस आणि पोट फुगण्याची समस्या देखील कमी होते. सगळ्यात चांगली बाब म्हणजे मॅग्नेशिअमनं शरीरातील वॉटल रिटेंशन कमी होतं. ज्यामुळे तुम्हाला हलकं वाटतं आणि तुम्ही फिट राहता.

कॅल्शिअम

कॅल्शिअममुळे शरीरात भरपूर कोलेजनचं उत्पादन होतं. ज्यामुळे केस मुलायम आणि हायड्रेट राहतात. नखं मजबूत होतात. त्वचेवरील सुरकुत्या दूर होतात. इतकंच नाही तर चेहऱ्यावरील लाइन्सही दूर होतात.

सोडिअम

महिलांसाठी तिसरं सगळ्यात महत्वाचं व्हिटामिन्स आहे सोडिअम. सोडिअममुळे पाठ आणि कंबरेचं दुखणं दूर केलं जाऊ शकतं. सोडिअमनं जॉइंट्समध्ये लवचिकता येते आणि हाडांमधील वेदना दूर होतात. तसेच कंबरेचं दुखणंही दूर होतं. ज्यांना व्हेरिकोज व्हेन्स आणि स्ट्रेच मार्क्सची समस्या आहे त्यांच्यासाठी हे व्हिटामिन खूप महत्वाचं आहे. यानं ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्स