Join us

जिममध्ये असो वा घरी वर्कआउट करताना 'या' दोन चुका टाळा, येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 11:03 IST

Fitness Tips : हेल्थ एक्सपर्टनुसार,  वर्कआउट दरम्यान केल्या गेलेल्या काही चुकांमुळे आरोग्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. 

Fitness Tips : फिट आणि निरोगी राहण्यासाठी रोज वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेक अशा घटनांबाबत आपण ऐकलं किंवा वाचलं असेल की, जिममध्ये वर्कआउट करताना काहींना हार्ट अ‍ॅटॅक आला. याचा धोका आपल्याच काही चुकांमुळे वाढतो. हार्ट हेल्दी ठेवण्यासाठी नियमितपणे वर्कआउट करणं फायदेशीर मानलं जातं. पण वर्कआउट करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. हेल्थ एक्सपर्टनुसार,  वर्कआउट दरम्यान केल्या गेलेल्या काही चुकांमुळे आरोग्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. 

लोकांचं असं मत असतं की, वर्कआउटदरम्यान शरीराचं तापमान जेवढं वाढेल, घाम तेवढा जास्त येईल. यासाठी लोक पाणीही कमी पितात. काही लोक तर शरीर उष्ण ठेवण्यासाठी जाड आणि पूर्ण शरीर झाकणारे कपडे घालतात. या गोष्टींचा थेट प्रभाव हृदयावर पडतो.

वर्कआउट करताना टाळायच्या चुका

पहिली चूक

वर्कआउट करताना केली जाणारी सगळ्यात कॉमन चूक म्हणजे पाणी न पिणे. वर्कआउट दरम्यान शरीर घामानं शरीराचं तापमान कंट्रोल करतं. अशात या स्थितीत पाणी पिणं टाळाल तर ब्लड फ्लो कमी होतो आणि याचा प्रभाव थेट हृदयावर पडतो. रक्त घट्ट होऊ लागतं, ज्यामुळे ते पंप करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. या स्थितीत हार्ट बीट वाढतात आणि हृदयावर दबाव वाढतो. एक्सपर्ट सांगतात की, एक्सरसाईज करताना मधून मधून थोडं पाणी प्यायला हवं. जर १ तास एक्सरसाईज करत असाल तर १० ते १५ मिनिटांनी थोडं थोडं पाणी प्यायला हवं.  

दुसरी चूक

दुसरी चूक कपड्यांबाबत केली जाते. काही लोकांना असं वाटतं की, जाड किंवा गरम कपडे घालून एक्सरसाईज केल्यानं जास्त घाम येईल. शरीर गरम राहील आणि कॅलरी जास्त बर्न होतील. पण हा मोठा गैरसमज आहे. असं करणं हृदयासाठी घातक ठरू शकतं. एक्सरसाईज करताना शरीराचं तापमान वेगानं वाढतं. शरीराला तापमान कंट्रोल करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेत. ज्यामुळे हार्ट बीट वाढतात. अशात हृदयावर अधिक दबाव पडतो. या दोन्ही चुकांमुळे हृदयाचे ठोके २० पॉइंट्सनी वाढतात.

काय सांगतात डॉक्टर?

हेल्थ एक्सपर्टनुसार, वर्कआउट असं करा ज्यानं हृदयावर अधिक दबाव पडणार नाही. यादरम्यान हार्ट रेट आणि शरीराचं तापमान जेवढं कमी असेल, तेवढं हृदयासाठी चांगलं असतं. या दोन्ही चुकांमुळे हृदयावर दुप्पट दबाव पडू शकतो. ज्यामुळे हृदयाचं काम बिघडतं आणि हार्ट अ‍ॅटॅकचा धोकाही वाढतो.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सहृदयविकाराचा झटका