टॉलीवूडपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या मिल्की सौंदर्याने आणि फिट बॉडीने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. तमन्नाची पांढरीशुभ्र मिल्की स्किन आणि तिची टोन्ड फिगर पाहून अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की, तिचे डाएट रूटीन नेमकं काय असेल? तमन्ना भाटिया तिच्या फिट बॉडी, एनर्जेटिक लूक आणि हेल्दी लाईफस्टाईलसाठी बरेच परिश्रम घेताना दिसते. सतत शूटिंग, प्रवास आणि बिझी डेली रुटीन असूनही तिचे वजन नेहमी नियंत्रणात कसे राहते, याची अनेकांना उत्सुकता असते. यामागे केवळ वर्कआउटच नाही, तर तिचा सकाळचा खास ब्रेकफास्टही महत्त्वाची भूमिका बजावतो(Tamannaah Bhatia trainer shares celebrity high protein breakfast recipe).
तमन्ना तिच्या दिवसाची सुरुवात एका अशा खास पदार्थाने करते, जो केवळ तिचे वजन नियंत्रणात ठेवत नाही, तर तिला दिवसभर उत्साही ठेवण्यासही मदत करतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा पदार्थ बनवण्यासाठी अत्यंत सोपा आहे आणि कोणीही आपल्या रोजच्या आहारात त्याचा समावेश करू शकते. स्वतः तमन्नाच्या पर्सनल फिटनेस ट्रेनरने सुचवलेला खास पदार्थ मेटाबॉलिझम अॅक्टिव्ह ठेवतो, चरबी वाढू देत नाही आणि दिवसभर फिट राहण्यास मदत करतो. तमन्ना भाटिया सकाळी (Tamannaah Bhatia weight control breakfast) नाश्त्यात नेमकं काय खाते आणि तमन्नाच्या फिटनेस ट्रेनरने शेअर केलेली ती 'स्पेशल ब्रेकफास्ट रेसिपी' आणि त्याचे फायदे काय आहेत ते पाहूयात.
आपल्या शरीराला रोज किती प्रोटीनची गरज असते?
मायोक्लिनिकच्या (Mayo Clinic) मते, एका सरासरी प्रौढ व्यक्तीला शरीरातील प्रोटीनची कमतरता टाळण्यासाठी प्रति किलो वजनामागे ०.८ ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता असते. जर एखाद्या व्यक्तीचे वजन १६५ पाउंड किंवा ७५ किलो असेल, तर त्याने दररोज ६० ग्रॅम प्रोटीन आपल्या आहारातून घेतले पाहिजे. हेच प्रमाण ॲथलीट (खेळाडू) आणि जास्त शारीरिक कसरत करणाऱ्या लोकांसाठी वेगळे असू शकते. त्याचप्रमाणे, वयाची ४० ते ५० वर्षे ओलांडल्यानंतर स्नायूंचे आरोग्य टिकवण्यासाठी ही गरज वाढते आणि प्रति किलो वजनामागे १ ते १.२ ग्रॅम इतके प्रोटीन आवश्यक असते.
नैसर्गिक पद्धतीने आपल्या शरीराला प्रथिने मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात फक्त काही छोटे बदल करण्याची गरज आहे. भारतीय अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचे ट्रेनर सिद्धार्थ सिंह यांनी अशाच एका खास नाश्त्यासाठीच्या पदार्थाची रेसिपी शेअर केली आहे, ज्यातून आपल्याला ४० ग्रॅमपर्यंत प्रोटीन मिळू शकते. दिवसाची सुरुवात प्रोटीनयुक्त नाश्त्याने करणे हे आरोग्यासाठी सर्वात उत्तम मानले जाते. यामुळे तुमचे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि तुम्ही दिवसभर उत्साही राहता.
फळ सडलं तर तेवढा भाग कापून बाकीचं फळ खाता? ही काटकसर जीवावर बेतते कारण...
अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या आवडती 'स्पेशल ब्रेकफास्ट रेसिपी'...
फिटनेस ट्रेनर सिद्धार्थ सिंह यांनी इंस्टाग्रामवर एक अतिशय सोपी आणि चविष्ट रेसिपी शेअर केली आहे, जी चवीला अगदी आइसक्रीमसारखी लागते. या रेसिपीबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, ही डिश प्रोटीनचा एक पॉवरहाऊस आहे.
ग्रीक योगर्ट २०० ग्रॅम, व्हे प्रोटीन एक स्कूप, ब्लूबेरीज, अननस किंवा तुमच्या आवडीची फळं इतकं साहित्य लागेल. एका बाऊलमध्ये ग्रीक योगर्ट आणि व्हे प्रोटीन घालून एकत्रित चमच्याने कालवून मिक्स करून घ्यावे. त्यात दालचिनी पावडर मिक्स करा (दालचिनी फॅट लॉससाठी उत्तम असते). वरून भरपूर प्रमाणात भिजवलेले बदाम, अक्रोड आणि ताज्या फळांचे काप घाला, गोडव्यासाठी वरून थोडे मध घाला.
तमन्नाच्या ट्रेनरच्या मते, ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन्स आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचा समतोल असणे गरजेचे आहे. तमन्ना कधीही आपला ब्रेकफास्ट 'स्किप' करत नाही, ज्यामुळे तिची शुगर लेव्हल मेंटेन राहते आणि तिला अनहेल्दी क्रेव्हिंग्स होत नाहीत. एकाच मील मधून शरीराची प्रोटीनची मोठी गरज पूर्ण होते. सकाळी घेतलेले प्रोटीन रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवते आणि थकवा जाणवू देत नाही. कोणत्याही सप्लिमेंटशिवाय घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांतून उत्तम आरोग्य मिळवण्याचा हा सोपा मार्ग आहे.
